ह्या जबरदस्त ५ उपायांनी मुलांमध्ये खेळाची गोडी निर्माण होईल
आपल्या मुलांना खेळात कशी आवड निर्माण करायची? त्यांच्या खेळाच्या सरावात सातत्य कसे टिकवायचे? खेळाबाबत ची गोडी कायम कशी टिकवायची? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असतील तर माझा हा लेख पूर्ण वाचा. माझे मिशन आहे की,येत्या 2025 च्या ऑलिंपिक खेळाच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर मुले पाठवायची आणि त्याकरिता मी माझा फेसबुक ग्रुप मिशन100 ऑलिंपिक गेम्स 2025 हा निर्माण केलेला आहे त्याकरिता मी सतत कार्यरत आहे. प्रत्येक पालकांना वाटत असते की आपली मुले खेळाडू खायला हवी खेळाच्या प्रॅक्टिस साठी मुलांना जोर जबरदस्ती पण केले जाते परंतु खेळाच्या प्रॅक्टिसमध्ये सर्वांमध्ये सातत्य टिकवण्यासाठी आणि त्या खेळांची आवड आणि गोडी निर्माण करण्यासाठी काय काय उपाय करायला पाहिजेत. चला तर मग त्या जबरदस्त ५ उपायांना जाणून घेऊया. १)खेळाबाबत वातावरण निर्मिती : कोणत्याही गोष्टीसाठी घरातूनच वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे. मग ती कला असेल शिक्षण असेल किंवा खेळ असेल खेळाबाबत वातावरण निर्मिती कशी करायची? त्यासाठी तुम्हाला खेळाच्या बाबत घरात सतत चर्चा करावी...