पुढील दिवाळीपर्यंत आपल्या मुलांना सुदृढ आणि निरोगी बनवा या 5 टिप्स वापरुन
नमस्कार, दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!!!! दिवाळी म्हटलं की फटाक्यांची अतिषबाजी, फराळाचा खमंग सुवास, पाहुण्यांची रेलचेल, लहानांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत उत्साहच उत्साह!!!! तुम्ही या दिवाळीत आपल्या मुलांना फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काय करत आहात? आपली मुले पुढील येत्या दिवाळीपर्यंत तंदुरुस्त राहण्यासाठी सुदृढ राहण्यासाठी तुम्ही काय प्लॅन केलेला आहे? या सर्वांची उत्तरे/प्लॅनिंग तुमच्या मनात घोळत असतील, तर नक्कीच माझा हा ब्लॉग पूर्ण वाचा.तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळणार. मी माया दणके,माझे मिशन आहे येत्या 2025 च्या ऑलम्पिक खेळांमध्ये महाराष्ट्रातून शंभर मुले पाठवणे त्यासाठी मी कार्यरत आहे. आपण आपल्या मुलांसाठी पुढील येत्या दिवाळीपर्यंत तंदुरुस्त उत्साही आणि सुदृढ राहण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागेल. १) दिवाळी पहाटेचा आस्वाद घ्या : आपण आपल्या मुलांना उशिरापर्यंत झोपण्यासाठी मुभा दिलेली आहे गेली आठ महिने झालं. आपल्या मुलांना आपल्या सोबतच दिवाळी पहाट पाहण्यासाठी पहाटे उठवायला सुरुवात करा.या दिवाळी पहाटेचा आनंद घ्या. प...