पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दान का करावे ?

इमेज
        एक भिकारी घरातून निघतानाच आपल्या झोळीत थोडेशे धान्य टाकतो झोळी सोबत घेऊन भिक मागण्यासाठी घराबाहेर पडतो. भिकाऱ्याच्या झोळीमध्ये जेव्हा कोणीतरी भिक दिलेली असते तेव्हाच माणसाला ही जाणीव होते की, हा भिकारी काही असातसा नाही ह्याला पण अनेक लोकांनी भीक दिलेली आहे मग आपण पण द्यावी हि भावना तुमच्यात निर्माण व्हायला हवी म्हणूनच भिकारी लोकं घरातून निघतानाच थोडेशे धान्य आपल्या झोळीत घेत असतात. त्या दिवशीी त्या भिकार्‍याचे खूूूप मोठे भाग्य की वाटेतच त्याला राजा भेटतो आणि भिकाऱ्याला खूप आनंद होतो की, आता आपल्याला चांगली भीक मिळणार म्हणून. राजाला काय मागावे ह्या विचारातच तो भिकारी मग्न होता आनंदीत होता. वाटेतच राजा भेटला म्हणून तो भिकारी खूप खुश झाला होता कारण त्याने त्या अगोदर खूप प्रयत्न करूनही त्याला राजा भेटला नव्हता. राजा आपल्या समोर भेटलायच तर आता खूप मोठी भीक मागायचा संकल्प तो भिकारी करत होता, पण होते उलटेच. तो भिकारी जवळ येताच राजाच त्याच्या रथावरून खाली उतरतो आणि त्या भिकाऱ्याला  भीक मागू लागतो. राजा म्हणतो, मी दरबारातून बाहेर पडतानाच ठरवले होते कि, प्रथम जो व...

खेळाडूंना व्हिजन बोर्ड बनवण्यासाठी पावरफुल ५ टीप्स

इमेज
तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी तुमचा फोकस होत  नाही  का ?  तुमच्या लक्ष्यावर टिकून राहण्यासाठी तुमच्या मनातील प्रतिमा निरंतर कशारीतीने सक्रीय ठेवायच्या हे कळत नाही का ? ह्या दोन प्रश्नांचे उत्तर जर हो असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.  नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे, येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे. तुम्हाला तुमच्या लक्ष्यावर टिकून राहायचे असेल, आणि सतत सतत तुमच्या मनाला आठवण करून द्यायची असेल कि हेच तुझे ध्येय आहे, तर तुम्हाला तुमचा Vision Board तयार ठेवावा लागेल. हा व्हिजन बोर्ड तुम्हाला सतत एक एक पाऊल ध्येयाच्या दिशेने टाकण्यास भाग पाडेल.तर तुमचा व्हिजन बोर्ड पावरफुल बनवा खालील टीप्स वापरून.  १)ध्येयाची स्पष्टता : तुम्हाला तुमचा व्हिजन बोर्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम स्पष्ट ध्येय लागेल. स्पष्ट ध्येयाचा उल्लेख तुमच्या व्हिजन बोर्डमध्ये करा. व्हिजन बोर्ड मध्ये तुमचे सर्वात मोठे ध्येय ज्याचा उल्लेख तुमच्या व्हिजन बोर्डमध्ये करा आणि ते ध्येय हे स्पष्ट असायला हवे ढोबळ, मोघम नसावे, म्हणजेच ध्य...

खेळाडूंनी केलेच पाहिजेत हे ५ प्राणायाम

इमेज
जेव्हा अवकाशात विमान उड्डाण घेण्यास तयार असते तेव्हा विमानाची पूर्ण आंतरिक चाचणी घेतली जाते. एकही fault विमानात आढळून आला तर विमानाचे उड्डाण केले जात नाही, तर ते रद्द केले जाते. ज्याप्रमाणे विमानाची आंतरिक चाचणी गरजेची असते  तसेच माणसाचेही असते. तुमच्या आंतरिकतेत  fault दिसत असेल तर तुम्ही पुढचे पाऊल टाकू शकत नाही. तुमच्यात शारीरिक कमजोरी येईल, अशक्तपणा असेल, तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम नसाल किंवा खूप जास्त थकला असाल  तर नक्कीच तुम्ही तुमच्यातील क्षमता वाढवू शकत नाही किंवा खेळातील तुमचे प्रदर्शन अत्यंत वाईट होईल. तुम्हाला पण खेळाच्या स्पर्धांच्या वेळेस अशाच समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. महर्षी पतंजलींचा अष्टांग योगा मानवाच्या श्वासावर आधारित योगासने सांगतो. तुमचा श्वास हाच तुम्हाला सुदृढ बनवण्याचे काम करत असतो. श्वास तुम्हाला जगण्याचे बळ देतो. तुमच्यातील आंतरिक शक्तीच तुमच्यातील क्षमता अजमावत असते. अनेकांना असे वाटते की योगासने किंवा प्राणायामामुळे आपल्या मन आणि बुद्धी वर काहीही चांगले परिणाम होत नाहीत परंतु हा तुमचा गै...

खेळाडूंनी यशाकडे वाटचाल करण्यासाठी अंगिकाराव्याच लागतील ह्या जबरदस्त ६ सवयी

इमेज
         बाळ जिराफाला मादी जिराफ जेव्हा जन्म देते तेव्हा मादी जिराफ तिच्या बाळाला दुध पाजणे किंवा चारा चारणे हे लाड कधीच करत नाही. तर ह्याउलट मादी जिराफ तिच्या बाळाला एक जोरात लाथ मारते, मग ते बाळ लडखडते. अजून एक लाथ मारते मग ते बाळ उठायला बघते. त्या जन्मलेल्या छोट्याशा बाळाला लाथेचा अर्थ पण कळत नसतो. त्याची आई ह्या लाथा का मारते हे पण त्याला कळत नसते. आणि त्या बाळाला जाणीव होते की, मी जर लवकर उठून उभा राहिलो नाही तर हा लाथा मारायचा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे. मग ते बाळ शेवटच्या लाथेला खाडकन उभे राहते आणि पळायला लागते. बाळ जिराफ जेव्हा उठून पळायला लागते तेव्हाच मादी जिराफ बाळ जिराफाला जवळ घेवून प्रेमाने कुरवाळते आणि मिठी मारते. कारण ते अवघे जन्मलेले बाळ उठून पळण्यात  यशस्वी झालेले असते. ते अवघे जन्मलेले बाळ जन्मतःच यशाचे धडे गिरवते आणि अनेक लाथारूपी संघर्षातूनी जाते. तुम्हाला पण असेच झोपेतून उठून, मरगळलेल्या अवस्थेतून उठून, पेंगाळलेल्या अवस्थेतून यशाकडे झेप घ्यायची आहे का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. नमस्कार मी माया दणके, माझे मिशन आहे, येत्य...

खेळाडूंना ध्यानाच्या जबरदस्त ५ पायऱ्या

इमेज
  प्रत्येक स्पर्धेच्या वेळी माझी घाबरगुंडी सुटते, मी खेळताना नेहमी चुकीचे निर्णय घेतो ज्यामुळे माझ्या हातात आलेली मॅच सुटून जाते, प्रतिस्पर्ध्याच्या खेळीला पाहूनच मी घाबरतो मला असे वाटते की, तो प्रतिस्पर्धी आता माझ्यापुढे जाणार, अशी नेहमी भीती वाटत राहते,आणि मग येणाऱ्या अपयशामुळे मन खचून जाते, असे माझ्या ग्रुप मधील एक रनर विशाल सांगत होता. माझ्या मनात येणाऱ्या विचारांना मी कंट्रोल करू शकत नाही त्यामुळेच असे होत असेल असे मला वाटते (विशाल म्हणतो )  तुमची पण अशीच अवस्था आहे का ? मॅचच्यापूर्वी तुमची पण घाबरगुंडी सुटते का ? प्रतिस्पर्ध्याच्या खेळीला पाहूनच तुमची घाबरगुंडी सुटते का ? मग अपयशाने तुम्ही खचून जाता का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या paris olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे. मी कुठेतरी वाचले होते की, प्राचीन भारतीय संस्कृतीतील ओम उच्चारण हा सुध्दा ध्यानाचा खूप चांगला प्रकार आहे.  तुमच्या मनात सुटणाऱ्या घाबरगुंडीमुळे तुम्ही तुमच्या मनावरचा ताबा हरवून बसता, मग ते खेळात असो वा कोणत्याही ...

ह्या जबरदस्त ५ गोष्टी तुमच्या खेळाच्या सरावात सातत्य टिकवतील

इमेज
मी सकाळी दररोजच्या प्रमाणे आज पहाटे लवकर घराबाहेर न पडता दररोजच्या पेक्षा तासभर तरी उशीरा बाहेर पडले होते. कारण की, मी गेली आठ दिवस झाले श्री. केतन गावंड सरांचे सकाळचे morning rituals पहाटे पाच वाजल्यापासूनच attend करत असते. माझ्या दररोजच्या दिनश्चर्येप्रमाणे मी आमच्या घराजवळील मैदानात माझ्या सरावासाठी जात असते. तिथे माझा चांगला ग्रुप बनला आहे. माझ्या ग्रुप मधील सौरभी आणि वैभवी गेली चार दिवस झाले येत नव्हत्या, म्हणून त्यांची मैत्रीण वैष्णवीला विचारले असता तिने सांगितले की, सौरभी आणि वैभवी ला खूप शारीरिक इन्जुरी झाल्यात पायात क्रम्प येऊन तिचे पाय दुखत आहेत. त्यामुळे तिला सतत असे गैरहजेरी टाकावी लागते. मी थोडीशी चिंतेत पडले. कारण हे कारण केवळ सौरभी आणि वैभवीचेच नव्हते तर अशा प्रकारच्या अडचणींना सतत खेळाडूंना सामोरे जावे लागते. हे मी अनुभवले आहे. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारच्या इंजुरीजना सतत सामोरे जावे लागत आहे का ?  त्यामुळे तुमच्या खेळाच्या सरावात खंड पडल्याने तुम्ही हवे त्या उद्दिष्टांपर्यंत पोहचू शकत नाहीत का ?  तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. तुमच्या सरावात सातत्य...