खेळाडूंची आत्मप्रतिमा प्रभावी बनवण्याचे प्रभावी ५ उपाय
डॉ . अल्फ्रेड अडलर यांना लहानपणापासूनच गणित सोडवायला खूप अवघड जायचे. त्यांनी त्यांच्या स्वतः ची आत्मप्रतिमा गणितासाठी अगदी नकारात्मक बनवली होती. त्यांच्या मनात गणीताबद्दल खूप भीती होती. मग त्यांनी पक्का निर्धार करून गणिताचा सराव करायला सुरुवात केली. आणि मग त्यांच्या मनातली गणिताबद्दलची भीती संपून गेली. गणिताचा दररोज सराव केल्याने त्यांना गणित खूप आवडू लागले. त्यांच्या आत्मप्रतीमेतील गणिताची भीती त्यांनी स्वतः च्याच आतील सकारात्मकतेने दूर केली. तुमचे mind हे एक मशिनप्रमाणे काम करत असते. तुमच्या मनाला नकारात्मक भावना जाणवत नाहीत. त्यामुळे तुमच्या मनातील positive energy चा जास्तीत जास्त वापर करा. तुमच्यातील स्वतः च बनवलेली नकारात्मक प्रतिमा तुम्हाला नकारात्मक बनवत आहे का? अनेक प्रभावशाली खेळाडूंना पाहिल्यानंतर तुम्हाला तुम्ही खूप मागे आहे अशी भावना मनात निर्माण होत आहे का? तर नक्कीच माझा हा ब्लॉग खास तुमच्यासाठीच. नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics स्पर्धेत महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे. अनेक खेळाच्या सामन्यांमध्ये केवळ ...