पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खेळाडूंची एकाग्रता वाढण्यासाठीच्या जबरदस्त 3 टीप्स

इमेज
  तुम्ही खेळाडू आहात आणि खेळावर व्यवस्थित लक्ष एकाग्र होत नाही का ? खूप गोंधळ, चिडचिड आणि मन सैरभैर होत आहे का ? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर नक्कीच आजचा माझा हा ब्लॉग खास तुमच्यासाठीच.  नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.  आजच्या या ब्लॉगमध्ये आपण तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी काय काय करावे लागेल ते पाहूया.  मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकता हाकेना फैरी येतं पिकावर.. ह्या कवितेच्या ओळीप्रमाणे मन हे एकाच चित्तावर राहत नाही. मनाला खूप आर्जव करावे लागते.  मनाला सतत एकाच कामात  गुंतवून ठेवण्यासाठी नेहमी मनाला वळवावे लागते. तुमच्यातील एकाग्रता जास्तीत जास्त असेल तर तुम्ही एकच काम चांगल्याप्रकारे करू शकता.  खालील 3 गोष्टीचा वापर करून तुम्ही  तुमची एकाग्रता वाढवू शकता, ह्याची मला खात्री आहे.  1} झोप सुधारा  : झोपेचा अभाव असणे हेसुद्धा एकाग्रता कमी होण्यासाठीचे कारण आहे. झोप पुरेशी झाली नसेल तर चिडचिड होणे, कामात लक्ष न लागणे , राग येणे, मन एकाग्र न होणे ...