श्वासांची उलथापालथ का ?
श्वास...श्वास....श्वासावर लक्ष केंद्रित करा... शांतता...शांतता... श्वास घ्यायचा...श्वास सोडायचा...मनातले सगळे विचार सोडून द्या... शांतता...शांतता... अरे देवा,काय करावे...माझ्या पाठीला खाज सुटली..आता काय.. शिंक पण आताच यायची होती का ?(आक..छी SSSS....) हे कसले कसले विचार येतात ,कुणाचे काय कर्ज,कुणाची बारावी,अरे आज दहावीचा निकाल आहे...त्या पिंट्याला किती मार्क पडतील बरे ! जाऊ द्या त्याने काय चांगला अभ्यास केला नव्हता...जाऊ द्या किती ही मार्क घेऊ दे ,मला काय करायचे..... श्वास घ्या ....श्वास सोडा.... शांतता...शांतता.... अरे,मला तर आज भिशीचा हफ्ता भरायचा.. गाडी सर्विसिंग ला पण टाकायची...मग काय रिक्षाने जायचं ऑफिसला...अरे १५ मिनिट झाले असतील की आता ध्यानाला ...बघू का एकदा घड्याळाकडे... श्वास घ्या...श्वास सोडा... शांतता...शांतता... श्वासावर लक्ष केंद्रित करा...Inhale... and ..Exhale... अरे,हे काय ?ध्यानाला बसल्यावर इतके विचार.मग माझ्या ध्यानाचा काय उपयोग होणार अशाने.मग ध्यान पाहिजे तितके प्रभाव माझ्या मनावर करणार नाही.मला माझ्या ह्या ध्यानाने एकाग्र चित्त ,शांतता,Concentratio...