दान का करावे ?
एक भिकारी घरातून निघतानाच आपल्या झोळीत थोडेशे धान्य टाकतो झोळी सोबत घेऊन भिक मागण्यासाठी घराबाहेर पडतो. भिकाऱ्याच्या झोळीमध्ये जेव्हा कोणीतरी भिक दिलेली असते तेव्हाच माणसाला ही जाणीव होते की, हा भिकारी काही असातसा नाही ह्याला पण अनेक लोकांनी भीक दिलेली आहे मग आपण पण द्यावी हि भावना तुमच्यात निर्माण व्हायला हवी म्हणूनच भिकारी लोकं घरातून निघतानाच थोडेशे धान्य आपल्या झोळीत घेत असतात. त्या दिवशीी त्या भिकार्याचे खूूूप मोठे भाग्य की वाटेतच त्याला राजा भेटतो आणि भिकाऱ्याला खूप आनंद होतो की, आता आपल्याला चांगली भीक मिळणार म्हणून. राजाला काय मागावे ह्या विचारातच तो भिकारी मग्न होता आनंदीत होता. वाटेतच राजा भेटला म्हणून तो भिकारी खूप खुश झाला होता कारण त्याने त्या अगोदर खूप प्रयत्न करूनही त्याला राजा भेटला नव्हता. राजा आपल्या समोर भेटलायच तर आता खूप मोठी भीक मागायचा संकल्प तो भिकारी करत होता, पण होते उलटेच. तो भिकारी जवळ येताच राजाच त्याच्या रथावरून खाली उतरतो आणि त्या भिकाऱ्याला भीक मागू लागतो. राजा म्हणतो, मी दरबारातून बाहेर पडतानाच ठरवले होते कि, प्रथम जो व...