Inner Balance काय असते
क्लेब्यं मा स्म गमः पार्थ नेतृत्त्तव्य्युपपद्धते/ क्षुद्रम दद्द्य्दौर्ब्ल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप// असे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हटले आहे.याचा अर्थ आहे की,अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, हे भगवान या युद्धभूमीवर माझ्यासोबत लढायला कोण कोण आले आहेत हे मला पाहायचे आहे. तेव्हा माझा हा रथ युद्धभूमी च्या मधोमध घेऊन चला, जेणेकरून मला माझे विरोधी सगळे स्पष्टपणे दिसतील. तेव्हा सारथी असलेल्या श्रीकृष्णाने रथाला युद्धभूमीवर मधोमध घेऊन जातात. तर अर्जुनाला त्याच्यासमोर युद्धभूमीवर सगळे त्याचे आप्तेष्ट दिसतात. तेव्हा अर्जुनासारखा सर्वोत्कृष्ट धनुर्धारी घायाळ होतो, व्याकूळ होतो, भावनावश होतो आणि रडायला लागतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना (क्लेब्यम)असा नपुसंकासारखा करू नकोस तुझ्यासारख्या सर्वोत्कृष्ट क्षत्रियाला हे शोभत नाही.हे अर्जुना, तू युद्धभूमीवर आहेस तुझ्या समोर जे कोणी असतील ते सगळे आता तुझे शत्रू आहेत. तू लढ.तू अस...