ह्या जबरदस्त २५ गोष्टी तुमच्या मनात महिला खेळाडूंबद्दल आदर निर्माण करतील भाग : ३ .
महिला खेळाडूंना जॉब सिक्युरिटी खूप कमी आहे. त्या मानाने पुरुष खेळाडूंना नोकरी लवकर मिळते आणि त्यामुळे अनेक महिला खेळाडू ह्या contract basis वर काम करतात किंवा इतर daily wages वर काम करत आहेत, ही सत्य परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टी मुळे महिला खेळाडूंना अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे खेळामध्ये carrier करण्यासंदर्भात महिलांचा नकार जास्त असतो.
१५) No friends :
Asian Games 2010 च्या 400mtr.hurdles मध्ये गोल्ड मेडल मिळवलेली अश्विनी आकुंजी म्हणते की, आम्ही हॉस्टेलवर राहायचो . आम्ही खेळाडू असल्यामुळे आमच्याशी मैत्री करायलाही मुलं तयार होत नव्हती. एक मुलगी खेळाडू म्हणून लग्न करायला पण मुलं लवकर तयार होत नाहीत,अशी महिला खेळाडू बद्दल एक वाईट प्रतिमा समाजात निर्माण झालेली आहे.मुली खेळांमध्ये असतील तर, त्यांच्याशी मैत्री करायला लवकर कोणी तयार होत नाही आणि समाजामध्ये त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण सुद्धा बदलतो,ही सत्य परिस्थिती आहे.
ही सत्यता आपण बदलू शकतो,जर आपण आपल्या मुलींना मुलांइतकाच मान दिला. मुलांइतकाच मुलींच्या करीयरबाबत विचार करायला सुरुवात केली, तर निश्चितच ही परिस्थिती बदलेल.
१६)No Stable Income :
महिला खेळाडूंना कोणत्याही प्रकारचे Stable Income नसते.
१७) सामजिक धारणा :
मुली खेळ खेळायला तर त्यांच्या शरीरामध्ये पुरुषांसारखा रांगडेपणा येतो, पुरुषांसारखी वर्तणूक होते, त्या पुरुषांसारख्या वागतात. असे अनेक गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. महिलांनी फक्त चूल आणि मूल यावर जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे.महिलांसाठी त्यांचे घर पती, सासु-सासरे ,आई-वडील, भाऊ,नवरा हे नाते जास्त महत्त्वाचे आहेत. त्यांचे करिअर ला जास्त महत्त्वाचं दिले जात नाही.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुली खेळ खेळायल्या म्हणजे त्यांच्या शारीरिक व्यायामामुळे गर्भधारणा पिशवीवर वाईट परिणाम होऊ शकतो. जेणेकरून मुलींमध्ये गर्भधारणा न होणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात,अशी धारणा आपल्या समाजामध्ये आहे.परंतु आजपर्यंत विज्ञानाने हे कुठेच सिद्ध केलेले नाही की, खेळामुळे महिलांच्या गर्भधारणेवर परिणाम होतो.किंवा खेळामुळे महिलांमध्ये अनेक शारीरिक विकृती निर्माण होतात.त्यामुळे अशाप्रकारच्या समाजातील समज-गैरसमजाना आपण दूर करूया. महिलांना खेळासाठी, खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करूया, प्रोत्साहन देऊया.
१८)No Livecasting :
महिला खेळाडूंच्या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी तर खूपच कमी असते. त्यासोबतच सोशल मीडिया व्दारे महिला खेळाडूंच्या स्पर्धांचे लाईव्ह कास्टिंग होत नाही. त्यामुळे महिला खेळाडूंच्या स्पर्धा कधी होतात,कुठे होतात,केव्हा होतात, याबाबत लोकांना माहिती होत नाही आणि त्यामुळे महिला खेळाडूंच्या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत नाहीत.
ह्या जबरदस्त ६ मुद्द्यांचा अवलंब तुम्ही करायला सुरुवात केली तर, नक्कीच तुमच्या मनात महिला खेळाडूंबद्दलचा आदर जास्त वाढेल, ही मला खात्री आहे. माझ्या या ब्लॉगचा हा तिसरा भाग तुम्ही पूर्ण वाचलात याबद्दल धन्यवाद. 🙏 🙏
माझा हा ब्लॉग खूप मोठा होईल, यासाठी मी माझ्या ब्लॉगला ४ भागात विभाजित करून प्रकाशित करत आहे. शेवटचा आणि भाग ४ साठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. 🙏 🙏
ऑलिंपिक खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिंपिक गेम्स हा नक्की जॉईन करा. त्याची लिंक येथे दिलेली आहे.



Thanks नेहल ताई
उत्तर द्याहटवा