पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीनिमित्त लेख

सांगा, मुलांनो ७+५ किती ? गुरुजी मी..मी.. (तोंड वाकडे करून गुरुजी काही लक्ष देत नाहीत..) सांगा, मुलांनो ८+५ किती ? गुरुजी मी..मी.. तरीपण गुरुजी लक्ष देत नाहीत.. बाबा मला नाही जायचे त्या शाळेत.. काय झाले भीमा ? मला उत्तर येत होते मी गुरुजींना म्हणतो मी सांगतो तरीपण गुरुजींनी मला सांगू दिले नाही,उलट म्हणले की, तुला शाळेच्या बाहेर बसून ऐकायला मिळते तेच नशीब समज.तुझी लायकी पण नाही असे म्हणले..शुद्र कुठला...असे म्हणले.पण बाबा मला सगळी उत्तरे येत होती..मला नाही जायचे त्या शाळेत.. भीमा तुला उत्तरे येत असताना पण तुला सांगू दिले नाही ना.. तर हेच बदलायचे आहे भीमा तुला..तुला शिकून खूप मोठे व्हायचं आहे.. आणि तिथून पुढे भीमराव शिक्षणासाठी पेटून उठले..अनेक अडचणींवर मात करत त्यांनी भारतातील सर्वात जास्त म्हणजेच ३२ पदव्या प्राप्त केल्या. ९ भाषांवर प्रभुत्व मिळवले.अनेक पुस्तके लिहिली.त्यापैकी " The evolution of Provincial Finanace in British India" आणि   "The Problem of Rupee"  ही दोन पुस्तके अर्थतज्ञांसाठी म्हणजे पर्वणीच आहेत.आजही ह्या पुस्तकांमधील बरयाचशा गोष्टींचे आजही  आपली अर्थ...

तुम्ही जिंकण्यासाठी तयार आहात का ?

इमेज
  जिंकायला आवडणे ही मानवी प्रवृत्तीच आहे,प्रत्येकालाच जिंकायला आवडते.जिंकणे म्हणजेच तुमच्या कमतरतेवर मात करणे होय. मला जिंकायला आवडते,तुम्हाला जिंकायला आवडते,परंतु कुठेतरी वाटत असते  की माझ्यात जिंकण्याची पात्रता नाही किंवा मी जिंकण्यास लायक नाही असे वाटत असते तर ही तुमच्यातील कमतरता आहे हे लक्षात घ्या.ही तुमच्यातील कमतरता दूर करा आणि जिंकण्यासाठी तयार राहा.तुम्हाला जर जिंकायचे असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. आपण जेव्हा लहाणाचे मोठे होत असतो,तेव्हा तुम्हाला तुमच्या घरची मंडळी,मित्र,मैत्रिणी,नातेवाईक तुम्हाला सगळ्या खोट्या गोष्टी बोलत असतात,त्या म्हणजे पहिली तर तुमच्या हातून काहीही होऊ शकणार नाही,आणि दुसरी म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही कोणीही बनू शकता.पण माझ्या मते ह्या दोन्हीही गोष्टी खोट्याच असतात,कारण की,ह्यातील खरे हेच असते की,तुम्ही तुम्हाला हवे ते बनू शकत नाही,पण तुमच्यात असलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही बनू शकता,हे खरे आहे.तुमच्यात असलेली प्रत्येक गोष्ट मिळवणे म्हणजेच जिंकणे होय.ह्या जिंकण्यासाठी तुम्हाला तुमच्यात असलेल्या सगळ्याच गोष्टी माहिती पाहिजेत, तरच तु...

तुम्ही संध्याकाळचा दिनक्रम करता का ?

इमेज
        प्रत्येक संध्याकाळ ही तुमची टीव्ही समोर बसून जेवण करणे,जेवण करताना हजारो कोरोना रुग्णांचा मृत्यू...मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नवीन घोषणा लॉकडाऊन..लॉकडाऊन.. कुठला अपघात...हेलीकॉपटरचा अपघात वगैरे...ह्या  सगळ्या बातम्यांमुळे तुमच्या  मनात अनेक चित्रे  झळकून जात ,एक कार्यक्रम झाला की दुसरा सुरु होतो,मग परत टीव्ही पुढेच..असे करत करत मध्यरात्र होते.तुमचे मन झोपण्यासाठी तयार असते.पण तुम्ही त्याच्यावर जोरजबरदस्ती करत असता, नाही हा खूप छान कार्यक्रम आहे.. एवढा पाहून मगच  झोपूया..,असाच दिनक्रम तुमचा गेली कित्येक वर्षांपासून चालू आहे.मग तुमची दुसरया दिवसाची सकाळ तशीच कंटाळवाणी आणि कोणत्याही नियोजनाविना. फक्त वेळेच्या सपाट्यात सापडलेलो आपण फक्त वेळ  घालवायचे काम करतो.वेळेच्या प्रवाहात  वाहत जातो,पण कुठल्याही नियोजानाविनाच... कदाचित तुम्हाला संध्याकाळचे नियोजन ही संकल्पना नवीन वाटत असेल, पण नाही ही खूप खूप वर्षांपूर्वीपासून चालत आलेली आहे.अगदी गुरुकुल पद्धतीपासून म्हणले तरीही चालेल.प्रत्येक यशस्वीतेमागे संध्याकाळचे नियोजन ही संकल्पना प्रभ...

खेळाडूंसाठीचा पॉवरफुल GREAT फॉर्म्युला

इमेज
"THE WAY YOU MANAGE DAY IS THE WAY YOU MANAGE YOUR LIFE."     तुम्हाला तुमचा दिवस powerful,energetic करायचा आहे का ?संपूर्ण दिवसातील फक्त एकच वेळ अशी आहे जी तुमच्या हातात आहे. ती जर तुमची वेळ सुंदर आणि fresh असेल, तर निश्चितच संपूर्ण दिवस छान जाईल.तुम्हाला ती वेळ आणि तुमची ती वेळ कशी powerful बनवायची हे जाणून घ्यायचे असेल,तर नक्कीच माझा हा ब्लॉग पूर्ण वाचावा लागेल.   तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहचायचे आहे तर तुम्हाला मी आज ह्या माझ्या ब्लॉग मध्ये एकदम powerful/जबरदस्त formula सांगणार आहे. जो तुम्ही वापरायला सुरुवात केली, तर तुमच्या अनेक समस्या केवळ ७ दिवसातच दूर होतील आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचाल.तो formula आहे GREAT फॉर्म्युला.चला तर मग जाणून घेऊया GREAT formula. तुम्हाला माहित आहे मित्रांनो,तुमच्या हातात दिवसातील ती एकच वेळ असते जी तुम्ही कशाप्रकारे घालवता ह्यावरून तुमचे व्यक्तिमत्व घडत असते.ती वेळ म्हणजेच "सकाळ" ची वेळ.ह्याच वेळेशी संबधित हा GREAT formula आहे. १)G-Gratitude (कृतज्ञता) : "रोज जागे झाल्यानंतर असा विचार करा की,आज मी सुदैवी आहे...

प्रत्येक खेळाडूमध्ये असलेच पाहिजेत हे जबरदस्त ७ गुण

इमेज
      माझ्या आतापर्यंतच्या निरीक्षणानुसार,खेळामध्ये खेळाडू  मागे का पडतात ? किंवा त्यांच्या पदरी नैराश्य का येते ? खेळातील अपयशानंतर मानसिक खच्चीकरण का होते ? खेळाच्या स्पर्धांमध्ये मागे का पडताहेत ? ह्या सगळ्या समस्यांवरचे उपाय जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्हाला माझा हा ब्लॉग पूर्ण वाचावा लागेल. मी अनेक खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना आजपर्यंत पाहिले आहे,त्यांच्यातील काही खास गुणांमुळेच ते पुढे जातात.चला तर मग ते ७ गुण कोणते ते पाहूया : १) उत्साह  : तुमच्यात तुम्हाला उत्साह आणायचा आहे.जेव्हा तुम्ही एखाद्या कामाची सुरुवात नकारात्मकतेने कराल तर नक्कीच नकारात्मकतेलाच सामोरे जावे लागेल.तुम्ही एखादे  भुंकणारे कुत्रे पाहिले असेल, त्याचे कान पूर्ण वरती ताठ झालेले असतात,आवाज जोरात निघतो,पूर्ण शरीर ताठ झालेले असते,डोळे विस्फारलेले असतात.तर याउलट,उत्साह नसलेल्या कुत्र्याची नजर खाली असेल,आवाज बारीक असेल,आणि तो भुंकणार ही नाही. म्हणजेच तुम्हाला कोणतेही काम करताना बाहु विस्फारून, शारीरिक हालचाली वाढवायच्या आहेत,आवाज खणखणीत काढायचा आहे,मग कितीही तुम्हाला आळसवाणे वाटले,...

कल्पनाशक्तीची शक्ती

इमेज
माझ्या जीवनातील एका प्रसंगाने माझे जीवनच बदलून टाकले.ती घटना म्हणजे अशी की,मी १५ ते १६ वर्षांचा असेल त्यावेळी मी एका रेल्वेतून बिनातिकीट प्रवास करत होतो,तिकीट चेकर आल्यानंतर मी  लपून बाकड्याखाली झोपलो,चेहरा लपवला होता,आणि घाबरून झोपण्याचे नाटक केले होते.त्यावेळी तिकीट चेकर माझ्याजवळ आला आणि राकट भाषेत म्हणाला,"Hey,young man Your ticket ?"मी वेळेचा अवकाश न घालवता,तिथेच  पडलेला पेपरचा तुकडा उचलला तेच माझे तिकीट अशी कल्पना केली,आणि ईश्वराला मनापासून प्रार्थना केली,की हा  पेपरचा तुकडा त्या तिकीट चेकरला तिकीट दिसू दे,आणि तो पेपरचा तुकडा मी तिकीट चेकरला दाखवला,त्या तिकीट चेकरने जे वाक्य बोलला  ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल."अरे मूर्ख माणसा, तुझ्याकडे तिकीट असताना असा बाकड्याखाली  का झोपलास ?आणि तिथून माझे सगळे जीवनच बदलून गेले. " About Myself ह्या पुस्तकाचा लेखक वूल्फ मैसीन ह्याने त्याच्या ह्या पुस्तकात हा त्याचा कल्पनाशक्तीचा अनुभव लिहिला आहे.त्यानंतरही मैसीन ह्याची त्यावेळेस अनेक लोकांनी थट्टा केली,खिल्ली उडवली,पण प्रत्येक वेळी मैसीन ने हेच सिद्ध केले की,कल्पनाशक...