डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीनिमित्त लेख
सांगा, मुलांनो ७+५ किती ?
गुरुजी मी..मी..
(तोंड वाकडे करून गुरुजी काही लक्ष देत नाहीत..)
सांगा, मुलांनो ८+५ किती ?
गुरुजी मी..मी..
तरीपण गुरुजी लक्ष देत नाहीत..
बाबा मला नाही जायचे त्या शाळेत..
काय झाले भीमा ?
मला उत्तर येत होते मी गुरुजींना म्हणतो मी सांगतो तरीपण गुरुजींनी मला सांगू दिले नाही,उलट म्हणले की, तुला शाळेच्या बाहेर बसून ऐकायला मिळते तेच नशीब समज.तुझी लायकी पण नाही असे म्हणले..शुद्र कुठला...असे म्हणले.पण बाबा मला सगळी उत्तरे येत होती..मला नाही जायचे त्या शाळेत..
भीमा तुला उत्तरे येत असताना पण तुला सांगू दिले नाही ना.. तर हेच बदलायचे आहे भीमा तुला..तुला शिकून खूप मोठे व्हायचं आहे..
आणि तिथून पुढे भीमराव शिक्षणासाठी पेटून उठले..अनेक अडचणींवर मात करत त्यांनी भारतातील सर्वात जास्त म्हणजेच ३२ पदव्या प्राप्त केल्या. ९ भाषांवर प्रभुत्व मिळवले.अनेक पुस्तके लिहिली.त्यापैकी "The evolution of Provincial Finanace in British India" आणि "The Problem of Rupee" ही दोन पुस्तके अर्थतज्ञांसाठी म्हणजे पर्वणीच आहेत.आजही ह्या पुस्तकांमधील बरयाचशा गोष्टींचे आजही आपली अर्थशाखा पालन करते.
भीमराव = भीमाबाई हे आईचे नाव होते आणि वडिलांचे नाव रामजी होते. म्हणून वडिलांनी खूप लाडाने हे नाव ठेवले होते.
मध्यप्रदेशातील महु ह्या गावी भिमरावांचा जन्म झाला होता.त्यांचे मूळगाव खरे तर रत्नागिरीतील आंबावडी हे आहे. ते एकूण १४ भावंडे होती १४ वे अपत्य म्हणजे भीमराव होय. परंतु त्यावेळेसच्या अनेक साथीच्या आजारांमुळे ३ बहिणी आणि २ भाऊ जिवंत राहिले होते, बाकीची भावंडे वारली.त्यांचे वडील रामजी हे British Indian Army मध्ये सुभेदार होते,सुभेदार म्हणजे त्यावेळेसचे खूप मोठे पद होते. भीमराव हे ९ वर्षांचे असतानाच त्यांची आई भीमाबाई ह्या देवाघरी गेल्या,त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या चुलतीने केला. लहानपणापासूनच भीमरावांना शाळेत जायची भारी हौस पण शुद्र असल्याने शाळेत प्रवेश मिळाला नाही.मग वडिलांनी एका ब्रिटीश अधिकारयाच्या वशिल्याने शाळेत कसाबसा प्रवेश मिळवला.
तिथून शुद्र म्हणून अत्यंत अन्यायकारक वागणुकीला त्यांना सामोरे जावे लागले.शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेण्याची जिद्द त्या वयात म्हणजे तुम्ही विचार करू शकता की,शिक्षणासाठी किती तळमळ असेल त्यांची.
एके दिवशी त्यांना विचार आला की, आपण मुंबईला जाऊन मिलमध्ये नौकरी करू,पण पैसे नसल्याने त्यांनी ठरवले की,काकीच्या बटव्यातून पैसे चोरायचे.तीन दिवस बटव्यातून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला पण त्यांना चोरता आले नाहीत.मग चौथ्या दिवशी त्यांनी बटवा चोरला आणि घर सोडून बाहेर पडले.थोडेसे अंतर गेल्यानंतर त्यांनी बटवा काढून पाहिला तर त्यात केवळ अर्धा आना होता.मग तेवढ्या पैश्यात जाणे शक्य नव्हते.त्यांना त्यावेळेस कळले की, माझा परिवार खूप गरीब आहे.माझ्या वडिलांनी मला ह्या गरिबीची जाणीव कधीच होऊ दिली नाही.कारण त्यांच्या वडिलांकडे पैसे असो वा नसो त्यांनी शिक्षणासाठी कधीच भीमरावांना पैश्याची चंगळ जाणवू दिली नव्हती.मग ते तसेच परत आले आणि त्यांनी ठरवले की,मी खूप शिकणार आणि माझ्या कुटुंबाचा आधार बनणार.ह्या एका प्रसंगाने त्यांचे जीवनच बदलले.मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
शाळेतील ब्राम्हण कृष्ण केशव आंबेडकर ह्या शिक्षकांचा भिमरावावर खूप जीव होता त्यांनी त्यांचे आंबेडकर हेच आडनाव त्यांना लावले आणि तेव्हांपासून आंबेडकर ह्याच आडनावाचा वापर करायला त्यांनी सुरुवात केली.
वयाच्या १६ व्या वर्षी ९ वर्षांच्या रमाबाईशी त्यांचा विवाह झाला. आणि १९१३ मध्ये त्यांचे वडील वारले.आणि १९१३ मध्येच ते बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड ह्यांच्या स्कॉलरशिपवर U.S ला गेले,२५रु. दर महिना ह्याप्रमाणे त्यांना स्कॉलरशिप मिळायची.तिथे त्यांनी Barister ची पदवी ग्रहण केली.
१९१७ ला त्यांची स्कॉलरशिप संपल्याने ते भारतात परत आले आणि सयाजीराव गायकवाड ह्यांच्या सैन्यात "सेना सचिव" म्हणून काम करायला सुरुवात केली. कारण त्यांना तसे वचन दिले होते.सेना सचिव ही आजच्या आय.ए.एस.दर्जाच्या पदाधिकाऱ्यांची पोस्ट आहे.तिथेही त्यांना त्यांच्या कार्यालयातील इतर शिपाई आणि अधिकारयांकडून खूप शुद्र्पणाची वागणूक मिळाली.त्यांचे शिपाई त्यांच्याकडे फाइल्स फेकून टाकायचे,पाणी पण वरून द्यायचे वगैरे..मग त्यांनी तिथे जास्त दिवस नौकरी केली नाही.
१९१८ मध्ये मुंबईच्या एलफिस्टन कॉलेज मध्ये इकोनोमी शिकवण्यासाठी गेले असता सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना शुद्र प्राध्यापक असल्याने विरोध दर्शवला होता.पण नंतर सगळेच विध्यार्थी त्यांचे चाहते झाले,त्यांच्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्वावर भाळले.
१९२० मध्ये त्यांच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना व्हायला हवा ह्या उद्देशाने त्यांनी कोल्हापूरचे शाहू महाराज ह्यांच्या सहकार्याने "मूकनायक " हे साप्ताहिक काढले.काही मोजकीच लोकं वाचायची पण ती सुरुवात आहे, म्हणून ह्यातच ते समाधानी असायचे.त्यानंतर त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा ह्या पहिल्या संघटीत सभेची स्थापना केली.
१९४६ मध्ये त्यांनी Who were the SHUDRAS ? हे पुस्तक लिहिले. त्यांनी स्वतः चे आत्मचरित्र Waiting for a VISA हे लिहिले.
K.V.Rao ह्यांनी बाबासाहेबांना संविधानाचे केवळ जनक म्हणले नाही तर आई आणि बाप असे दोन्हीही आहेत असे म्हणले आहे. संविधान समितीच्या निवडणुकीत बाबासाहेबांनी मुंबई मधून फॉर्म भरला होता परंतु मुंबईत हारले.हारले नाहीतर हरवले गेले होते त्यावेळेस पूर्ण शक्तीनिशी मुंबईतून त्यांना हरवण्याची तयारी केली होती.मग त्यांनी आताचा बांगलादेशातून (त्यावेळी बंगाल प्रोविन्स) फॉर्म भरला. बांगलादेश हा पूर्णपणे मुस्लीम लीग प्रभावित होता आणि तिथून ते निवडून आले. श्री. बेनेगल नरसिंग राव (खूप मोठे व्यक्तिमत्व ज्यांचा केवळ आपल्याच देशाच्या घटनेच्या drafting मध्ये सहभाग नाही तर इतर देशांच्या घटनेच्या drafting मध्ये ह्यांनी सहभाग घेतलेला होता.)ह्यांनी डॉ.राजेंद्र प्रसाद ह्यांच्यावर दबाव आणला.कारण बाबासाहेबांशिवाय घटना लिहिणे शक्य नाही हे त्यांना माहित होते. आणि म्हणूनच त्यांनी बाळ गंगाधर खेर हे त्यावेळेसचे मुंबईचे P.M.ह्यांच्यावर दबाव आणून M.R.Jykar ह्यांना राजीनामा द्यायला लावून डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांना संविधान समितीत घेण्यात आले.एवढे मोठे राजकारण त्यावेळेस घडलेले आहे आणि तेही केवळ शुद्र असल्यामुळेच. ह्या सगळ्या घटनांचा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रात केलेला आहे. शेवटी २९ ऑगस्ट १९४७ च्या संविधान समितीच्या प्रारूप समितीचे ते अध्यक्ष बनले.
तत्पूर्वी ते एल्फिन्स्टन कोलेजात असताना दादा केळुस्कर ह्यांनी "बुद्ध की जीवनी" हे पुस्तक त्यांना दिले होते,तेव्हापासून त्यांच्या विचारांवर गौतम बुद्धांच्या विचारांचा खूप मोठा पगडा होता.आणि त्यांनी आपल्या ५ लाख अनुयायान्सोबत नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
६ डिसेम्बर १९५६ रोजी बी.पी.शुगर आणि अनेक आजारांनी त्यांना ग्रासले गेल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली.
१९९० मध्ये त्यांच्या महान कार्याला उद्देशून त्यांना मरणोत्तर "भारतरत्न " ही महान पदवी बहाल करण्यात आली.
डॉ.आंबेडकर ह्यांचे कार्य खूप मोठे आहे ह्या माझ्या छोट्याशा लेखात मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.त्यांनी महिला,दलित वर्ग,समाजासाठी, देशासाठी, खूप मोठे काम केले आहे.त्याकाळात महिलांनी साडी घालण्याची एक विचित्र प्रथा पडली होती,ती प्रथा बाबासाहेबांनी मोडली.स्त्रियांनी साडी गुडघ्याच्यावरती घालायची,अशी प्रथा पडली होती ती प्रथा बाबासाहेबांनी मोडली आणि स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली.
अशा ह्या महान व्यक्तिमत्वाला आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्ताने माझा शतशः प्रणाम 🙏 🙏 🙏 🙏 🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा