तुमची ईच्छाशक्ती कशी वाढवाल ??
दीपस्तंभ ह्या विकलांगासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेची लक्ष्मी ही एक विद्यार्थिनी दोन्हीही हात नाहीत. स्वतः ची सर्व कामे म्हणजेच शरीराची साफसफाई करणे, स्वतःची तयारी करणे, जेवण करणे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणे, अभ्यास करताना पुस्तक पायात धरून वाचणे, वगैरे... ही सर्व कामे दोन्ही पायांनीच करते. अजून आश्चर्य म्हणजे दोन्ही पायांनी छान छान रांगोळी काढते, सुंदर सुंदर चित्रे काढते. ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे दोन्ही पायांनी करते. तिला तिच्यात काही शारीरिक कमतरता आहे याची जाणीव कधीच होत नाही किती आश्चर्याची गोष्ट आहे ना. म्हणजेच लक्ष्मीची मनःशक्ती आणि महत्त्वाकांक्षा कितीतरी जबरदस्त आणि प्रबळ आहे याची कल्पना तुम्हाला येत असेल. आपल्याकडे दोन हात, दोन पाय, दोन डोळे या देवाने दिलेले आहेत, तरीपण आपण प्रत्येक वेळी शरीरातल्या कमतरता शोधून त्याचा आधार घेऊन मार्ग काढण्याचा, पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही तुमच्या हातात येणाऱ्या प्रत्येक दिवसातील कामात पळवाटा काढण्याचा किंवा पर्यायी मार्ग काढण्याचा नेहमी प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुमच्यातील अजून जास्त महत्त्वाकांक्षा ...