तुम्ही तुमचे गोलबुक लिहिले आहे का ??

    तुम्ही तुमचे गोलबुक लिहिले आहे का ?? भाग- पहिला


        आताच्या अगदी काही दिवसांपूर्वी Individual Educational Plan ही संस्था  विद्यार्थ्यांना गोलबुकद्वारे भविष्याची शैक्षणिक उद्दीष्ट्ट्ये निश्चित करायला शिकवते.  San Francisco State University येथील काही विद्यार्थ्यांवर ह्या संस्थेने केलेल्या रिसर्चनुसार त्यांना असे लक्षात आले की, विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक भावी नियोजन करण्यासाठी गोलबुक खूप मदत करते. ज्या विद्यार्थ्यांनी गोलबुक लिहिले होते त्यांच्या एकूण २० गुणांपैकी सरासरी १७.५ % गुणांची वाढ झाली होती, तर ज्या विद्यार्थ्यांनी गोलबुक लिहिले नव्हते त्यांच्या गुणात केवळ सरासरी ५ % च गुणांची वाढ झाली होती, असे त्यांच्या निदर्शनास आले. गोलबुक मधील नियोजन हेच त्या विद्यार्थ्याच्या यशावर खूप परिणाम करते असे दिसून आले. जर तुम्ही कोणत्याही ध्येयाविना कोणत्याही गोष्टीला सुरुवात केली तर नक्कीच तुमच्यापुढे एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती होईल. नेमकी, स्पष्ट आणि लिखित ध्येयेच तुम्हाला यश प्राप्त करून देतात. 

तुम्ही तुमची स्पष्ट आणि नेमकी ध्येये असलेले गोलबुक लिहिले आहे का ? आणि लिहिले तर ते दररोज वाचता काय ? गोलबुक कसे लिहायचे हे माहिती नाही.  तर नक्कीच माझा हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच.

नमस्कार, मी माया दणके. माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.

तुमच्या आयुष्याला खरया अर्थाने योग्य दिशेने वळण द्यायचे असेल, तर नक्कीच तुमचे गोलबुक तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करते. तर हे गोलबुक बनवण्यासाठी तुम्हाला काही टिप्स उपयोगी पडतील त्या खालीलप्रमाणे आहेत.

)ध्येयांचे वर्गीकरण :


 ध्येये मनात ठरवणारीच अनेक मंडळी आहेत मात्र ती ध्येये जर तुम्ही कागदावर लिहून काढली तर त्याचा परिणाम कित्येक पटीने जास्त होतो. तुम्ही तुमची निश्चित अशी ध्येये लिहून काढा आणि दररोज लिहा आणि लिहा. तरच तुम्ही तुमच्या मनाला ती दिशा द्याल आणि तुमच्या ध्येयापर्यंत सहजपणे पोहचाल.तुम्ही लिहिलेले तुमचे गोलबुक तुमच्या ध्येयाचे दिशादर्शक असते म्हणूनच ते लिहून काढले तरच खूप परिणामकारक ठरते. 

तुमच्या ध्येयाचे विभाजन करून ते वेगवेगळ्या हेडखाली गोलबुकमध्ये लिहा. उदा. आर्थिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, व्यावसायिक, वगैरे...अशा वेगवेगळ्या हेडखाली ध्येयाचे वर्गीकरण करून ते लिहा. अशी लिहिलेली ध्येये तुमच्या उद्दिष्टांची योग्य दिशा ठरवितात. तुम्ही लिहिलेले गोलबुक तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यास उपयोगी ठरते. 

२)नेमकी आणि स्पष्ट ध्येये :


गोलबुकमध्ये तुमची नेमकी आणि स्पष्ट अशी ध्येयेच लिहा. स्पष्ट आणि नेमकी ध्येये तुम्हाला ध्येयाबाबत स्पष्टता आणि नेमकेपणा देतात. मोघम ध्येये असतील तर तुम्ही ध्येयापर्यंत कधीच पोहचू शकणार नाही. तुमची मोघम ध्येये उदा. मी एक करोड रुपये कमवणार आहे, मी इंग्रजी भाषा शिकणार आहे, मला स्वयंरोजगार निर्माण करायचा आहे, वगैरे..ह्या ध्येयांना तारीख आणि निश्चित अशी वेळ तुम्ही दिलेली नाही म्हणून ही ध्येये मोघम आहेत. आणि ह्या ध्येयांना जेव्हा तुम्ही निश्चित तारीख आणि वेळ देता तेव्हाच ही ध्येये खर्या अर्थाने साध्य होऊ शकतात. 

थोडक्यात तुम्ही तुमच्या गोलबुकमध्ये स्पष्ट आणि नेमकी अशी ध्येये लिहा. म्हणजेच तुम्हाला तिथपर्यंत जाणे सोपे होईल.

३) तुमची आवड, रुची :


तुम्ही जरी स्पष्ट आणि नेमकी ध्येये ठरवली असली तरीही त्याच क्षेत्रात तुम्हाला रुची, आवड आहे का ? हे अगोदर चेक करा. तुम्ही इतरांचे अनुकरण करून किंवा इतरांच्या प्रभावामुळे तुमची ध्येये ठरवली असतील, आणि तुम्हाला त्यात तेवढी रुची नसेल तर तुम्ही कधीही त्या ध्येयांपर्यंत पोहचू शकणार नाही. 

म्हणूनच तुमची आवड आणि रुची महत्वाची आहे.

४) कौटुंबिक सपोर्ट :


तुमच्या ठरवलेल्या ध्येयांना तुमच्या घरच्यांचाही सपोर्ट असायला हवा. घरच्यांच्या विरोधात तुम्ही ठरवलेल्या ध्येयांपर्यंत पोहचणे थोडेसे अवघड होऊ शकते. घरातील मंडळींचा हस्तक्षेप आणि सहभाग तुम्हाला अजून जास्त बळ देतो. 

म्हणून घरातील व्यक्तींच्या विरोधात ध्येये ठरवून तिथपर्यंत पोहचण्याचा विचार करू नका. घरच्या मंडळींची मर्जी पण सांभाळावी लागते.

५)छोटया ध्येयांचा विश्वास :


मी बरयाच जणांना पाहिले आहे की, खूप मोठी ध्येये बनवतात आणि मग जर ती ध्येये पूर्ण होत नसतील तर पश्चात्ताप करत बसतात, स्वतःला दोष देत बसतात. ही वेळ येऊ नये ह्यासाठी पूर्ण जीवनाचे ध्येये ठरवण्यापेक्षा छोटी छोटी ध्येये ठरवा आणि तिथपर्यंत पोहचण्यासाठी सतत छोटे छोटे प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्यात जबरदस्त आत्मविश्वास वाढेल, आणि नवीन पाऊल उचलण्यासाठी ऊर्जा येईल. 

म्हणूनच अगदी संपूर्ण जीवनाचे ध्येये ठरवण्यापेक्षा छोटी छोटी ध्येये ठरवा. जेणेकरून तिथपर्यंत पोहचायला तुम्हाला सोपे जाईल.

तुम्ही जर तुमचे गोलबुक लिहिले नसेल तर ह्या टिप्स वापरून गोलबुक लिहायला सुरुवात करा. नक्कीच तुमचे गोलबुक तुमच्या ध्येयापर्यंत पोहचायला मदत करेल.

माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏 

ह्याच ब्लॉगचा भाग- दोन लवकरच घेवून येत आहे प्रतीक्षा असावी.🙏🙏

खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी माझी फेसबुक कम्युनिटी  मिशन १०० ऑलीम्पिक्स ही नक्की जॉईन करा.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय