पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वतः ला सतत Motivate ठेवण्याच्या जबरदस्त १२ पायरया भाग -१

इमेज
एखादे काम सुरु केल्यानंतर त्याचा शेवट तुमच्याकडून होत नाही का ? तुम्हाला स्वतः ला self motivation ची खूप जास्त गरज आहे का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. असे म्हणले जाते की, कोणत्याही गोष्टीसाठी काम सुरु केल्यानंतरच खऱ्या Motivation ची गरज असते. म्हणजेच अगोदर काम सुरु होते आणि Motivation नंतर होते. कारण बरीचशी लोकं कामाची सुरुवात तर खूप धमाकेदार करतात मात्र हाती घेतलेले काम मग अर्धवट सोडून देतात. कारण काम सुरु केल्यानंतर त्यांना जे योग्य Motivation मिळायला हवे ते कुठेतरी कमी पडते म्हणून ते मागे पडतात.  तर मी माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही स्वतः ला सतत कसे Motivate ठेवाल, त्याच्या जबरदस्त अशा १२ पायरया सांगणार आहे. हा ब्लॉग दोन भागात लिहित आहे.  १)पायरी पहिली: वर्तमानसदृश्य ध्येय असावी - एक लक्षात घ्या की, तुमची ध्येये ही असाधारण किंवा निव्वळ भाकिते नसावी. तुमची ध्येये ही साध्य करता येण्याजोगी आणि वर्तमान परिस्थितीला धरून असावी. म्हणजेच तुम्ही मग ती ध्येये साध्य करू शकता. जर तुम्हाला असे जाणवले की, ही ध्येये साध्य न होण्यासारखी आहेत तर तुम्ही लगेच त्या ध्येयास साधर्म्य ध...

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय

इमेज
  तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली करणे कमी झाले आहे का? मुलांच्या शारीरिक हालचाली वेगात न झाल्याने अनेक व्याधी जडत आहेत का?  ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. अमेरिकेत झालेल्या एका रिसर्चनुसार २००७ नंतर लहान मुलांचे स्क्रीन टाईम वाढल्याने मुलांमध्ये अनेक शारीरिक हालचाली कमी होऊन आजारांचे प्रमाण वाढले आहे. मग त्यात अनेक शारीरिक, मानसिक, आजारांचे प्रमाण जास्त आहे.  मुलांच्या शारीरिक हालचाली वाढवण्यासाठी खालील ४ गोष्टी करायला सुरुवात करा. १)घरातील इलेक्ट्रोनिक साधने कमी करा : आजकाल घरामध्ये प्रत्येक व्यक्तीगणिक एक मोबाईल असतो त्यासोबत टीव्ही, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक विविध साधने, ह्याचे पण प्रमाण जास्त वाढलेले आहे. ही इलेक्ट्रॉनिक साधने वाढल्यामुळे त्यांचा वापर वाढलेला आहे. आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढल्यामुळे मुलं त्याच इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये गुंतून राहतात. आणि तासनतास एकाच जागेवर बसल्यामुळे त्यांच्यात शारीरिक हालचाली कमी होतात. अनेक व्याधी जडतात. त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक साधनांचे घरातील प्रमाण कमी करा. म्हणजेच मुले त्यात गुं...