तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय

 


तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली करणे कमी झाले आहे का?

मुलांच्या शारीरिक हालचाली वेगात न झाल्याने अनेक व्याधी जडत आहेत का? 

ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

अमेरिकेत झालेल्या एका रिसर्चनुसार २००७ नंतर लहान मुलांचे स्क्रीन टाईम वाढल्याने मुलांमध्ये अनेक शारीरिक हालचाली कमी होऊन आजारांचे प्रमाण वाढले आहे. मग त्यात अनेक शारीरिक, मानसिक, आजारांचे प्रमाण जास्त आहे. 

मुलांच्या शारीरिक हालचाली वाढवण्यासाठी खालील ४ गोष्टी करायला सुरुवात करा.

१)घरातील इलेक्ट्रोनिक साधने कमी करा :


आजकाल घरामध्ये प्रत्येक व्यक्तीगणिक एक मोबाईल असतो त्यासोबत टीव्ही, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक विविध साधने, ह्याचे पण प्रमाण जास्त वाढलेले आहे. ही इलेक्ट्रॉनिक साधने वाढल्यामुळे त्यांचा वापर वाढलेला आहे. आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढल्यामुळे मुलं त्याच इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये गुंतून राहतात. आणि तासनतास एकाच जागेवर बसल्यामुळे त्यांच्यात शारीरिक हालचाली कमी होतात. अनेक व्याधी जडतात. त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक साधनांचे घरातील प्रमाण कमी करा. म्हणजेच मुले त्यात गुंतणार नाहीत.

२) मुलांना वेळ द्या :


आजकाल आपले जीवन खूप बिझी झाले आहे. आपल्या घरात वेळ द्यायला आपल्याकडे वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. घरातील व्यक्तीचे एकमेकांशी संवाद बराचसा कमी झालेला आहे. अशा वेळेस आपण जर आपल्या मुलांना वेळ दिला नाही, तर मुले एकाकी पडतील आणि इलेक्ट्रॉनिक साधनांच्या आहारी जातील. त्यासाठी मुलांना जास्तीत जास्त वेळ द्यायला सुरुवात करा त्यांच्याशी विनाकारणच्या गप्पा मारा, मुलांसोबत खेळा आणि त्यांच्यासोबत दंगामस्ती करा.

 म्हणजे मुलांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहील.

३)मुलांच्या क्रियाशीलतेवर भर द्या :


मुलांतील क्रियशीलतेला वाव द्या. तुमच्या मुलांच्या खेळ, चित्रकला, रंगरंगोटी, अभिनय, नृत्यकला, लिखाण, वक्तृत्व, ह्यांसारख्या कलांना अजून जास्त प्रोत्साहन द्यायला सुरुवात करा. मुलांकडून ह्या सगळ्या गोष्टीची तयारी करायला तुम्ही पण स्वतः त्यात सहभागी व्हा. म्हंजे मुलांचा उत्साह अजून जास्त वाढेल. आणि मुले जास्त क्रियाशील होतील, त्यांच्या शारीरिक, मानसिक हालचाली वाढतील आणि स्वास्थ्य उत्तम राहील.

४) मुलांशी संवाद वाढवा :


विनाकारणच्या गप्पांमधून मुलांच्या बोलण्याचा ढब, शब्दफेक, बोलण्यातील शब्दसंस्कार, बोलण्याची पद्धत, ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टीची वाढ होते हे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. मुलांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास ह्या विनाकारणच्या गप्पा खूप स्वस्थ्यापूर्ण ठरतात. म्हणूनच विनाकारणच्या गप्पा तासनतास मारा. 

ह्या गोष्टींचा अवलंब तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात करायला सुरुवात केली, तर तुमच्या मुलांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होईल. तर आजपासूनच सुरुवात करा.

माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.

हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच Like, Share आणि Comments करा.

खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन १०० ऑलीम्पिक्स ही नक्की जॉईन करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप