ह्या ५ गोष्टींचा अवलंब करून तुम्हाला वाटणाऱ्या अशक्यतांना शक्यतेत उतरवा भाग -१
एखादी गोष्ट माझ्याने असंभवच आहे असे तुम्हाला वाटत आहे का ? माझ्यात अनेक कमतरता आहेत त्यामुळे मी माझी इच्छित गोष्ट करू शकत नाही असे तुम्हाला नेहमी वाटते का ? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर 'हो' असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच. कारण मी माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वतः ला वाटणाऱ्या अनेक अशक्यतांना शक्यतांमध्ये उतरवण्यासाठीच्या जबरदस्त पायर्या दिलेल्या आहेत. मी माझ्या ह्या ब्लॉगला वाचण्याच्या दृष्टीने सोयीस्कर जावे हयाकरीता दोन भागात विभाजित करत आहे. नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे की, येत्या 2024 च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे. अमेरिकन Motivational speaker David Goggins ह्यांनी त्यांच्या बालपणापासूनच्या कितीतरी अशक्यता शक्यतेत उतरवून अमेरिकेतील आर्मी,नेव्ही,ऐअर्फोर्स ह्या तिन्हीही दलाच्या ट्रेनिंग पूर्ण करणारे एकमेव व्यक्ती ठरले. Ultramarathon,Marathon, आणि Pushups मध्ये रेकॉर्ड केले. David Goggins ने स्वतः मध्ये अनेक बदल करून हे सगळे यश मिळवलेले आहे.म्हणूनच David Goggins म्हणतात की, जगात अशक्य अशी कोणतीच...