Stop Religious Discrimination In Sports
तुम्ही धार्मिकतेवरून खेळाडूंचे शोषण करत आहात का ?
तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
धर्मावरून जगभरात अनेक खेळाडूंचे शोषण केले जाते. विशिष्ट धर्मीयांचा विशिष्ट खेळ, किंवा एका धर्माच्या खेळ संघांमध्ये इतर धर्मीय खेळाडूंना डावलले जाते. खेळामध्येही धर्माने खूप मोठा शिरकाव केला आहे. जून 2017 मध्ये, NBA फायनलमधील Cleveland Cavaliers आणि Golden State Warriors यांच्यातील सलग तिसऱ्या मालिकेच्या पूर्वसंध्येला, NBA चा सर्वात मोठा स्टार अमेरिकेतील वर्णद्वेषाच्या वाढत्या समस्येचा बळी ठरला. त्याच्या समोरच वांशिक स्लर्सच्या भित्तिचित्रांनी त्याच्या घराची तोडफोड केली. या घटनेने हादरलेल्या जेम्सने "अमेरिकेत कृष्णवर्णीय असणे कठीण आहे" असे सांगून प्रतिक्रिया दिली. तुमचा धर्म किंवा वर्ग काय आहे ह्यात काही फरक पडत नाही. तो पुढे म्हणाला, “आम्हाला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.अशा घटनांना आम्ही घाबरणारे नाही."
खेळात धर्म हया बाबीस खूप महत्त्व दिले जाते. खेळाडूचा " खेळ" हा एकच धर्म असावा. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीयांस धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. मात्र धर्माचा आधार घेवून इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार निश्चितच कोणालाच नाही.
खेळातील वाढत्या धर्माच्या घुसखोरीसाठी खालील 3 जबरदस्त उपाय मी तुम्हाला सांगेन. जेणेकरून खेळाडूंना धर्मिकतेवरून डावलले जावू नये.
१) धार्मिक भावना दुखावू नये :
जगातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धार्मिक भावना जपण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणेच प्रत्येकाने समोरच्याच्या धार्मिक भावना जपण्याचे भान राखायला हवे. मात्र धार्मिक भावनांचा बाऊ करता कामा नये, किंवा स्वतः च्या फायद्यासाठी धार्मिक भावनांचा आधार घेता कामा नये.
एकूणच काय तर तुम्ही स्वतः प्रमाणेच इतरांच्या धार्मिक भावना सांभाळायला हव्यात. धर्मिकतेवरून एकमेकांना चिडवू नये, तू विशिष्ट धर्माचा वगैरे म्हणून त्या व्यक्तीच्या धार्मिक भावनांना धक्का पोहचवता कामा नये.
२) खेळ हे सामाजिक एकीकरणाचे माध्यम :
खेळ खेळताना खेळाडू हा मन आणि हृदयाने खेळत असतो. खेळताना कोणत्याही भेदभावाची भावना नसते. समोरचा खेळाडू हा विशिष्ट जातीचा, धर्माचा, रंगाचा, प्रांताचा आहे म्हणून मी त्याच्यासोबत खेळात उतरणार नाही, ही भावना जर खेळाडूंची असेल तर खेळाद्वारे सामाजिक एकीकरण साध्य होणार नाही. अमेरिकेत काळा आणि गोरा वर्णभेद बरेच वर्षे होता. सन १९४७ मध्ये रिकी आणि जाक रोबिसन ह्यांनी समानतेच्या समर्थनासाठी निग्रो लीग आणि गोऱ्यांची लीग अशा दोन बेसबॉल मच लावण्याचे सर्वप्रथम धाडस केले. खेळातील एकीकरणाचा "सर्वोत्तम प्रयोग" असे त्यास आजही मानले जाते. बेसबॉलमध्ये खेळणारा जाकी रोबिसन हा पहिला आफ्रिकन - अमेरिकन खेळाडू होता. स्टेडीयमवरील सर्व गोरे लोक त्याचा जयजयकार करत होते. हे ब्रंच रिकी आणि जोकी चे हे धाडस १९६४ चा नागरी हक्क कायदा बनवण्यास कारणीभूत ठरले आहे, असे मानले जाते.
३)धर्मावरून डावलण्यात येऊ नये :
विशिष्ट धर्मीय खेळाच्या संघांमध्ये एखाद्या नवख्या खेळाडूला सहभागी करून घ्यावयाचे की नाही ह्यासाठी त्याला खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. किंवा बर्याचदा केवळ धर्म ह्या मुद्द्यावरून खेळाडूंना संघात घेतले जात नाही. उदा. मुस्लीम धर्मीय संघांमध्ये मोकळेपणाने ख्रिश्चन किंवा हिंदू खेळाडूस नाकारले जाते केवळ धर्मामुळेच.
खेळाडूच्या वैयक्तिक धर्मापेक्षाही त्याच्या गुणांवर अशा संघांमध्ये निवड व्हायला हवी. आता अलीकडेच प्रकाशित झालेल्या " आउट ओन द फिल्ड्स " ह्या नावाने प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. ह्यातील संशोधन संघाने U.K, U.S.A., Austrelia, Canada, Aayrland, आणि न्यूझीलंड मधील जवळपास ९००० हून जास्त क्रीडाक्षेत्रातील व्यक्तींचे हिमोफोबिया (वाटणारी भीती ) बद्दल संशोधन केले. संशोधनात त्यांना असे आढळून आले की, क्रीडाक्षेत्रात ८० टक्के सहभागींना हिमोफोबिया आहे. ८४ टक्के सहभागींपैकी समलिंगी पुरुष आणि ८२ टक्के सहभागी वांशिक अपमानाचे बळी आहेत. तसेच समलिंगी पुरुषांपैकी निम्मे आणि एक तृतीयांश लेस्बियन्स खेळाडूंना संघाकडून नाकारण्याची भीती असते. तर युथ लीगमध्ये खेळताना त्यांची लैंगिक प्रवृत्ती लपवतात.
थोडक्यात की, धर्मावरून डावलण्याची भीती अनेक खेळाडूंमध्ये असते. म्हणूनच खेळाडूंना धर्म ह्या बेसिसवर तोलण्यात येऊ नये. खेळातील धर्माचे वाढते प्रस्थ तुमच्या छोट्याशा एखाद्या कृतीने सुद्धा तुम्ही थांबवू शकता.
ह्या वरील ३ गोष्टी लिहिण्याचा माझा एकच ध्यास की, खेळाडूंना खेळामध्ये धर्म ह्या एकाच बाबीवरून डावलण्यात येवू नये. तरच खेळातील सहभागीदारांच्या मनातील धर्माची वाटणारी भीती कमी करता येऊ शकते.
तुम्ही माझा हा ब्लोग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.
माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच Like, Share, आणि Comments करा. कारण तुमच्या एका शेअरिंगमुळे अनेकांना फायदा होऊ शकतो.
खेळासंदर्भातील अधिक जास्त माहितीसाठी माझी मिशन ऑलीम्पिक्स ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा