ह्या जबरदस्त २५ गोष्टी तुमच्या मनात महिला खेळाडूंबद्दल आदर निर्माण करतील भाग : 2
Finally, आज माझ्या ब्लॉगचा भाग-2 प्रकाशित करत आहे. महिला खेळाडूंना समाजात हवा तेवढा दर्जा मिळत नाही .हॉकी म्हणल की,आपल्या कॉम्पुटर,किंवा टीवी च्या स्क्रीनवर फक्त पुरुष खेळाडू आपल्याला हवे असतात.महिला खेळाडूंचा विचार च आपल्या मनात येत नाही.महिला खेळाडू असतात आणि त्या हॉकी खेळतात. हा विचारच आपल्या मनाला शिवत नाही.मुकेश कुमार,बलजित सिंग ,मेजर ध्यानचंद वगेरे पुरुष खेळाडू आपल्या डोळ्यासमोर येतात.पण महिला खेळाडू पण हॉकी players आहेत, त्यांची नाव पण आपल्याला माहित नाहीत.भारतीय संस्कृतीत महिलांनी खेळामध्ये carrier करणे हे समाजाला पटतच नाही.त्यादृष्टीने थोडीशी जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे.म्हणून मी माझा ब्लॉग लिहीला आहे.जेणेकरून महिला खेळाडू बाबत समाजात आदर निर्माण होईल,आणि महिला खेळाडूंची संख्याही वाढेल. नमस्कार मी माया दणके,माझे मिशन आहे,येत्या २०२४ च्या ParisOlympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.मी एक महिला आहे आणि खेलासंदार्भातील योग्य मार्गदर्शन मी तुमच्या मुलीना करू शकते. ...