ह्या जबरदस्त २५ गोष्टी तुमच्या मनात महिला खेळाडूंबद्दल आदर निर्माण करतील भाग :१


आपल्या देशात महिला खेळाडूना पाहिजे तेवढे महत्व अजूनही मिळालेले नाही.महिला खेळाडूंबद्दल आपल्या मनात आदराची भावना निर्माण व्हावी या दृष्टीने हा ब्लॉग लिहिला आहे. ब्लॉग खूप मोठा होईल आणि वाचण्याच्या दृष्टीने सोपे जावे, म्हणून या ब्लॉगला 4 भागात विभाजित करत आहे.हा पहिला भाग.

   14 वेळेस National Badminton Championships 

मिळालेली ज्वाला गुट्टा Looks v/s.Sports यावर publically इंटरव्ह्यूमध्ये बोलताना म्हणते,womens athelete  ला एक showcase सारखे पाहिले जाते.पुरुषांच्या नेत्रांना सुखावणारी womens athelete अशी प्रतिमा बनलेली आहे, तिच्यातील potential,talent याला महत्व दिले जात नाही.

'The Hottest pin_ up girl in sport' अशी प्रतिमा माझी बनवली गेली.




लोक काय म्हणतील,समाज काय म्हणेल,नातेवाईक काय म्हणतील...

अशा अनेक गोष्टींमुळे आपण आपल्या मुलींना नेहमी डावलत असतो.या सगळ्यांवर मात करता येईल जर तुम्ही तुमच्या मानसिकतेत बदल केला तर निश्चितच शक्य आहे.

यासाठी तुम्हाला माझा हा ब्लॉग पूर्ण वाचावाच लागेल.

नमस्कार मी माया दणके माझे मिशन आहे, येत्या 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातून 100 खेळाडू पाठवणे.

१ )न्यूनगंडाची भावनाच नष्ट करा:

रजनीश ओशो आपल्या प्रवचनात सांगतात की,'न्यूनगंडाची भावना ही आपल्या मनात असते आणि ती मुळापासूनच नष्ट व्हायला हवी तरच आपण कोणत्याही गोष्टीला मुक्तपणे  स्वीकारतो.'

अनेक पिढ्या न् पिढ्या पासून स्त्रीला आपण जेवढे देवीचे स्थान दिलेले आहे तेवढेच तिला खालचे स्थान दिले आहे. समाजाच्या प्रवाहाच्या काही वेगळे करणाऱ्या स्त्रीला प्रत्येक वेळेस नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते. आणि त्या बाबतीत तिला अनेक गोष्टी सहन पण कराव्या लागतात आपण आपल्या जन्मलेल्या बाळा पासून सुरुवात करू. जेव्हा बाळ जन्मते तेव्हापासूनच आपण आपल्या बाळाकडे एक मूल आहे, या दृष्टिकोनातूनच पाहायला सुरुवात करूया ती मुलगा आहे की, मुलगी आहे ही मानसिकता बाजूला करून न्यूनगंडाची भावनाच नष्ट करू. 

उदा. एखाद्याला विचारलं की,तुला किती मुलं आहेत तर तो मला दोन्ही मुलीच आहेत असे चेहऱ्यावर आठ्या आणून नकारात्मक भावनेने सांगतो त्याची ही प्रतिक्रिया अशी दर्शवते की, त्याला कुठेतरी त्याच्या मनात मुली आहेत, याबद्दलचा न्यूनगंड नक्कीच आहे. हा न्यूनगंड कशासाठी जर आपण आपल्या मनातील या न्यूनगंडाची भावनाच नष्ट केली तर येणाऱ्या  बाळाच्या मनातही न्यूनगंडाची भावना निर्माण होणार नाही.



२) मुलींच्या कलागुणांना पण वाव द्या :

आपण आपल्या मुलांना कोणत्याही गोष्टी करण्यासाठी कधीच नकार देत  नाही.पण मुलीच्या बाबतीत आपण प्रत्येक गोष्टींचा बारकाईने विचार करत असतो. जेणेकरून तिच्यातील कलागुणांना वाव मिळत नाही. एखाद्या मुलीला नृत्याची आवड असेल, खेळाची आवड असेल, खेळाडू व्हायची इच्छा असेल,तर आपण त्यावर अनेक बंधने लादतो. आपल्या मुलींच्या कलागुणांना वाव देण्याऐवजी आपण शेजारी काय बोलतील, समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील आणि भविष्याच्या दृष्टीने तिच्याबाबत कोणते करियर योग्य आहे. यासाठी आपणच आपले निर्णय आपल्या मुलींवर लादत असतो. जेणेकरून तिच्यातील कलागुणांना वावच मिळत नाही. तर आपण आपल्या मुलींना आज आणि आत्तापासून तिला कशाची आवड आहे. त्या आवडीनुसार तिच्यातील कलागुणांना महत्त्व देऊ आणि तिला प्रोत्साहित करू.

काही निश्चित क्षेत्रे आपण आपल्या मुलींसाठी ग्राह्य धरलेली आहेत.उदा. शिक्षण,टेक्निकल,मेडिकल,बँकिंग वगैरे वगैरे. परंतु कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये जाण्याचे मुलींचे प्रमाण गेल्या 10 वर्षातील सर्वेनुसार खूप कमी आहे.



३) शारीरिक मानसिक मजबुती महत्त्वाची :

आपल्या मुलींना शारीरिक,मानसिक रित्या मजबूत बनवण्यासाठी लहानपणापासूनच मार्शल आर्ट्स, कराटे, ज्युदो यांसारख्या रांगड्या खेळांची स्वयम् संरक्षणाचे धडे देणाऱ्या खेळांचे प्रकार शिकवायला हवे.

 मी पण लहानपणी मार्शल आर्ट्स केलेले आहे त्यामुळे माझ्यात Self Confidence जबरदस्त आहे. संकटं आली तरी भीती वाटत नाही.शारीरिक, मानसिक रित्या मी खूप मजबूत आहे.

आजकाल आपण पाहतो, आपण आपल्या मुलींना एका विशिष्ट वयानंतर घराबाहेर जाऊ देत नाही. आपल्या मुली या Youtube video,Makeup, रंगरंगोटी,Modelling या गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात गुंतलेल्या आहेत असे दिसून येते. एका सर्वेनुसार गेल्या दहा वर्षात मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात तिप्पट वाढ झालेली आहे असे निदर्शनास येते. आपल्या मुलींना स्वतःच्या स्वरक्षणासाठी स्वतःच्या कर्तुत्वाचे धडे लहानपणापासूनच दिले तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रात अनेक जिजामाता, किरण बेदी, हिमा दास, लता मंगेशकर दिदी यांसारख्या महिला घडतील.

International Judo Champion

प्राजक्ता अँकोलेकर हीची मुलाखत मी घेतली,ती म्हणते की,प्रत्येक महिलेने कराटे,ज्युदोचे प्रशिक्षण घ्यायलाच  हवे.तुम्ही तिची मुलाखत नक्की पाहू शकता.या लिंकवर क्लिक करून. 


४) तू मुलगी आहेस :

आपल्या मुलींना जी गोष्ट आवडते, ती गोष्ट करण्यासाठी आपण रोखत नाहीत मुलींना हवी ती मदत आपण करतो आणि ते आपले पालकांचे प्रथम कर्तव्य आहे.परंतु काही ठिकाणी मला असे वारंवार दिसून येते की,पालक या सगळ्या गोष्टींमध्ये मुलींना त्यांच्या मनावर बिंबवले जाते की, तू मुलगी आहेस तुला या सगळ्या गोष्टीत आम्ही मदत करतो, म्हणजे आम्हाला सगळेच बाजूने त्रास होतो.खूप मोठी जोखीम उचलून आम्ही तुला मदत करत आहोत आणि तू त्यात यशस्वी व्हायलाच हवे,नाहीतर आमची सगळा पैसा, कष्ट वाया जातील वगैरे.वगैरे...

त्यामुळे महिला खेळाडूंच्या स्पर्धा पाहण्यासाठी स्टेडियमवर प्रेक्षकांची संख्या खूप कमी असते. ऑस्ट्रेलिया हा एकच असा देश आहे की, जिथे महिला खेळाडूंना वेगवेगळ्या दृष्टीने तयार केले जाते.

ज्या प्रमाणे सचिन तेंडुलकरला आपण क्रिकेटचा देवता मानतो. त्याप्रमाणेच भारतीय महिला क्रिकेट टीम मधील मिथाली राज ही भारतीय क्रिकेट साठी एक देवता आहे. तिने आपल्या कामगिरीत एकूण 6888 Run केलेले आहेत. आणि तिने इंटरनॅशनल क्रिकेट मधील सगळ्यात जास्त Run करणारी जगातील दुसरी महिला क्रिकेटर ठरली आहे. परंतु ती एक महिला खेळाडू असल्याने आपण तिच्या Potential ,Sports कडे लक्ष न देता आपल्याला तिच्या वैयक्तिक जीवनात आपल्याला जास्त रस असतो.



५)महिला खेळाडूंना खेळाडू या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे : 

आजकाल महिला खेळाडूंना केवळ शारीरिक दृष्टीने पाहिले जाते. अनेक ठिकाणी महिला खेळाडूंची सामने केवळ शारीरिक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी गर्दी केली जाते. एक खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहण्यासाठी तुम्हाला ती दृष्टी मनात तयार करावी लागेल.तरच तुम्हाला तो एक खेळाडू आहे ही नजर येईल.

धुती चंद 100 मी. रिओ ऑलिम्पिक गेम्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला Athelete ठरली.तिला तिच्या Personal Life वर सोशल मीडियाने फोकस केला. तिच्या gender वर अनेक प्रश्न उद्भवून मीडियाने ही बाब उचलून धरली आणि तिला डोपिंग प्रकरणात hyperandrogenism ची टेस्टिंग करण्यात आली व तिला दोषी ठरवले.

 धूती चंद एका खेडेगावातून आलेली मुलगी ग्रामीण भागां मध्ये ती जेव्हा रनिंग ची प्रॅक्टिस करायची. त्यावेळेस गावातील लोकांनी तिच्यावर अनेक प्रकारे दोषारोप केले आणि तिचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज धूती चंदने आपल्या देशाचे नाव एका उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे. आणि जगातील चांगल्या धावपटूंमध्ये धूती चे नाव येते.



६) कोच हाच खेळाडूंचा सगळ्यात जवळचा मित्र असतो:

प्रत्येक खेळाडूसाठी त्याच्या कोचची भूमिका ही खूप महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी असते. कोणत्याही खेळाडू मागे कोच हा महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो. खेळाडूसाठी कोच हा त्याचा मित्र,वडील, भाऊ, गुरु या सगळ्या भूमिका निभावत असतो. बॅडमिंटन प्लेयर पी व्ही सिंधू हिचे कोच पुल्लेला गोपीचंद यांची पी व्ही सिंधू च्या उत्कृष्ट कामगिरी मागे खूप मोठी भूमिका आहे.2016 च्या Rio Olympics मध्ये पी. व्ही. सिंधू  फायनल पर्यंत जाणारी पहिली बॅडमिंटन प्लेयर ठरली. व तिने सिल्वर मेडल जिंकले.Rio Olympics नंतरच्या एका मुलाखतीमध्ये ती सांगते की, मला माझे कोच कधी कधी एकदम विचित्रपणे ट्रेन करायचे. खेळांमध्ये मी अग्रेसर व्हावे यासाठी ते मला एकटीला पाणी,अन्न किंवा इतर कोणत्याही गोष्टी न देता बंद खोलीत दिवसभर कोंडून ठेवायचे. ज्यामुळे मला चीड येईल मी रागीट,Agressive होईल. माझ्या कोचने मला Mentally,Physically आणि इतर सगळ्या गोष्टी ने तयार केल्यामुळेच Rio Olympics मध्ये मी Silver Medle मिळवू शकले.



निश्चितच,ह्या जबरदस्त ६ गोष्टी तुमच्या मनात महिला खेळाडूंबद्दल आदर निर्माण करतील याची मला खात्री आहे. यानंतर तुम्हाला पुढील भागाची प्रतीक्षा करावी लागेल. 

आपण आपल्या मुलींना थोडासा वाव दिला, त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन दिले. तर नक्कीच मुली खूप चांगली भूमिका निभावू शकतात. हे आपण आजकाल सगळ्याच क्षेत्रांमध्ये पाहतो.तरीही मुलींकडे दुर्बल कमजोर अशाच नजरेतून पहिले जाते.त्यासाठी थोड्याशा परखड भाषेतील माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात त्याबद्दल  धन्यवाद. 🙏 🙏

ऑलिम्पिक खेळाच्या अधिक माहितीसाठी माझा मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स हा फेसबुक ग्रुप नक्की जॉईन करा.त्याची लिंक इथे दिली आहे.

माझ्या या ब्लॉगच्या भाग-2 ची प्रतीक्षा नक्की करा.

 

टिप्पण्या

  1. वा, माया मॅडम
    खरोखरच प्रेरणादायी
    प्रत्येक महिलेने प्रेरणा घ्यावी.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच प्रेरणादायी
    अतिशय उपयुक्त ब्लॉग👌👌👍

    उत्तर द्याहटवा
  3. मायाताई खूप छान महिलांना आणि मुलींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहेत स्वतंत्रता देणे गरजेचे आहे त्यांच्या विचारांना त्यांच्या आवडींना स्वातंत्र्य देऊन त्यांच्या योग्य त्या क्षेत्रात त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन सपोर्ट केला पाहिजे धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  4. ग्रेट मयाताई
    महिला व मुलींसाठी अतिशय उपयुक्त माहिती दिली तुम्ही
    धन्यवाद...!

    उत्तर द्याहटवा
  5. मस्तच माया ताई. खूप जोरात चळवळ करा. तुमची एक academy काढाच. Keep it up. Just Do It.

    उत्तर द्याहटवा
  6. माया मॅडम जी खूप सुंदर ब्लॉग आहे तुमचा वाचून आत्मविश्‍वास निर्माण होतोय आणि आपल्या मुलींना आपण शारीरिक शिक्षणासाठी तयार करायची भावना मनात येते धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय