ह्या जबरदस्त २५ गोष्टी तुमच्या मनात महिला खेळाडूंबद्दल आदर निर्माण करतील भाग : 2

 





Finally, आज माझ्या ब्लॉगचा भाग-2 प्रकाशित करत आहे. 
महिला खेळाडूंना  समाजात हवा तेवढा  दर्जा मिळत नाही .हॉकी म्हणल की,आपल्या कॉम्पुटर,किंवा टीवी च्या स्क्रीनवर फक्त पुरुष खेळाडू आपल्याला हवे असतात.महिला खेळाडूंचा विचार च आपल्या मनात येत नाही.महिला खेळाडू असतात आणि त्या हॉकी खेळतात. हा विचारच  आपल्या मनाला शिवत नाही.मुकेश कुमार,बलजित सिंग ,मेजर ध्यानचंद वगेरे पुरुष खेळाडू आपल्या डोळ्यासमोर येतात.पण महिला खेळाडू पण  हॉकी players आहेत, त्यांची नाव पण आपल्याला माहित नाहीत.भारतीय संस्कृतीत महिलांनी खेळामध्ये carrier करणे हे समाजाला पटतच नाही.त्यादृष्टीने थोडीशी जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे.म्हणून मी माझा ब्लॉग लिहीला आहे.जेणेकरून महिला खेळाडू बाबत  समाजात आदर निर्माण होईल,आणि महिला खेळाडूंची संख्याही वाढेल.
            नमस्कार मी माया दणके,माझे मिशन आहे,येत्या २०२४ च्या ParisOlympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.मी एक महिला आहे आणि  खेलासंदार्भातील योग्य मार्गदर्शन मी तुमच्या मुलीना करू शकते.
        या ब्लॉगच्या भाग 1मध्ये आपण 6 मुद्द्यांवर चर्चा केली होती. जर  तुम्ही माझ्या  ब्लॉगचा  भाग -1 वाचला नसेल,तर नक्की वाचा.  

७)Representation :
महिलांनी खेळाडू असणे म्हणजे समाजासाठी एक Shameful असल्याचे समाज मानत असतो. आजही मुलीनी खेळणे म्हणजे कमीपणाचे,लाजिरवाणे मानले जाते.मुलीनी खेळणे म्हणजे समाजात लोक काय म्हणतील,नातेवाईक काय म्हणतील,वगेरे ...





Maleक्रिकेटर्सबाबत  आपल्याला सगळे माहित असते.क्रिकेटर्स ची कामगिरी किती रन केले,त्याची क्रिकेट टीम,त्याची family वगेरे ..Male क्रिकेटर्स बाबत आपल्याला खूप उत्सुकता असते.पण Female क्रिकेटर्स ची किमान नाव पण आपल्याला माहिती नसतात,Matches पण आपल्याला माहित नसतात.कारण आपल्याला ती गोष्ट च मान्य नाही की महिला खेळू शकतात. महिला पण खेळात चांगली कामगिरी करू शकतात. ही मानसिकता आता बदलायला हवी.महिला खेळाडूना पण तितकेच महत्व द्यायला हवे. त्याची सुरुवात आपल्या स्वतः पासूनच करूया.



८) Self Confidence लहानपणापासून develop करणे :
आपण आपल्या मुलींना लहानपणापासूनच इतरांवर अवलंबून राहण्याची सवय लावतो. लहानपणापासून आपण आपल्या मुलींच्या मनावर वारंवार ही बिंबवलेल असतं की,तू मुलगी आहेस आणि तुला कोणाची तरी मदत घ्यावीच लागते.त्यामुळे त्या मुलीच्या मनात हे पक्के बसलेले असते की, जोपर्यंत आई वडिलांच्या घरी आहे, तोपर्यंत आई, वडील, भाऊ वगैरे..सर्व तिला मदत करतील. लग्नानंतर सासरची व्यक्ती मदत करतील. त्यामुळे प्रत्येक मुलीला स्वाववलंबाची भावनाच मनात येत नाही.



उदा: मी पाहिलेले आहे एक 12 वर्षाच्या मुलीसोबत तिचा 2 वर्षाचा छोटा भाऊ तिचा पाठीराखा म्हणून तिला सोबत लागतो. ही मानसिकता मुलींची होण्यास सर्वस्वी आपण जबाबदार आहोत.
लहानपणापासून मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी कुणाच्याही सोबतीची गरज नाही हे संस्कार आपण तिच्यावर करू शकतो.मुलीना जास्तीत जास्त स्वावलंबी बनण्याचे धडे तिला आपण देऊ शकतो.तिला स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम कसे बनवता येईल, याबाबत आपण घरातूनच तिला प्रशिक्षित करू शकतो.Self Confidence वाढवण्यासाठी आपण आपल्या मुलींना ज्यूदो, मार्शल आर्ट ,कराटे, घोडेस्वारी,तलवारबाजी यासारखे खेळांचे  प्रशिक्षण देता येईल.



९) खेळाचे नियम सारखेच :
Male or Female खेळाडू या खेळाडूसाठी खेळाचे नियम हे सारखेच असतात. तरीही पुरुष खेळाडूंना जास्त महत्त्व आणि महिला खेळाडूंना नेहमीच डावलले जाते.
खेळातील नियम महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी सारखेच असले तरीही, खेळातील Inequality सतत वाढतच आहे. ही Inequality कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या राज्य राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात,अनेक संस्था,प्रोग्रम यासाठी सतत कार्यरत आहेत.ही Inequality आपण आपल्या मनातून कमी केली, तर निश्चितपणे पुरुष आणि महिला खेळाडूंना समान दर्जा मिळेल. ही Inequality कमी करण्यासाठी तुम्हाला महिला खेळाडूंना महिला खेळाडू न समजता फक्त खेळाडू असेच समजले तर नक्की हे शक्य आहे.







१०)Showcase :
महिला खेळाडूंकडे showcase सारखे पाहिले जाते.महिला खेळाडूंच्या matches केवळ नैत्रिक सुखपायी पहिल्या जातात,असा अनुभव आहे.महिला खेळाडूंचा खेळ पाहण्याच्या उत्सुकतेपेक्षा महिला खेळाडूंच्या moves,कपडे,त्यांचे दिसणे, अंगयष्टी,याच गोष्टी पाहण्यात लोकांना जास्त interest असतो.



ही मानसिकता आपण बदलू शकतो, जर आपण आपल्या मुलीना लहानपणापासूनच समानतेची वागणूक दिली तर,मुली केवळ एक showpiece बनून राहणार नाही.
मी एका पुस्तकात वाचले आहे,या निसर्गाने माणसाला पृथ्वीवर फक्त दोन लिंगात विभाजित केले आहे स्त्री आणि पुरुष.त्याशिवाय इतर कोणताही फरक नाही.तरीही आपण स्त्रियांना निम्न स्थान दिलेले आहे.
११) मानसिक खच्चीकरण:
महिला खेळाडूंची ज्यावेळेस सामने भरतात, त्यावेळेस त्यांना Commentators, Audience यांच्याकडून अनेक वेगवेगळ्या विचित्र comments ला सामोरे जावं लागतं. त्यामध्ये Coaches सुद्धा बऱ्याच वेळेस महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करतात ही सत्य परिस्थिती आहे.२००४ च्या womens फुटबॉल क्रीडा स्पर्धेच्या वेळेस महिला खेळाडूंनी महिलांच्याच कपड्यात फुटबॉल खेळावा, असे कमिटीने महिला खेळाडूंना घोषित केले. त्यावेळेस अनेक महिला खेळाडूंनी objection घेतल्यावर त्यांना खेळाच्या वेशभूषेमध्ये खेळण्यास परवानगी मिळाली.या अशा मानसिकतेमुळे अनेक महिला खेळाडूंची मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात येण्याचे महिला खेळाडूंचे प्रमाणही खूप कमी आहे.


जर आपण महीला खेळाडूंचे  सामने पहात असताना महिला खेळाडूंवर अशा कमेंट्स करणेेेेेेेेे सोडून दिले, आणि महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, अशा कमेंट्स केल्या  तर महिला खेळाडूंचे मनोबल वाढेल.महिला खेळाडू जास्तीत जास्त प्रमाणात तयार होतील..
१२)No Media Attention :
भारतामध्ये महिला खेळाडूंना अत्यंत दुय्यम स्थान दिले जाते.त्यामुळे सोशल मीडिया सुद्धा महिला खेळाडूंना
इतके महत्व देत नाही असे दिसून येते.



 महिला खेळाडूंचे सामने, महिला खेळाडूं ची वैयक्तिकवेेेेेेयक्तीी्त्तीी््तीी्त्तीी्तीी्त्तीी््तीी्त्ती कामगिरी, सांघिक कामगिरी,मगि यावर सोशल मीडिया जास्त फोकस करत नाही.कारण आपण महिलांना खेळाडू किंवा महिला खेळाडू सुद्धा कामगिरी करू शकतात ही बाब आपण ग्राह्य धरत नाहीत.

ही मानसिकता बदलण्यासाठी आपण आपल्या स्वतः पासून सुरुवात करुया. आणि महिलांनाही खेळामध्ये समान अधिकार देण्यास आपण आपली मानसिकता तयार करूया.
१३)Lower Prize money :
पुरुष खेळाडूंच्या बाबतीत महिला खेळाडूंना prize money सुद्धा खूप कमी आहे.
उदा. FIFA WORLD CUP मध्ये पुरुष खेळाडूंना जवळपास 35 ते 50 Million$ एवढी prize money आहे. तर महिला खेळाडूंसाठी फक्त 2 Million $ एवढी Prize money आहे. या मध्ये स्त्री आणि पुरुष या दोन्ही खेळाडूंच्या बाबतीत एवढी मोठी तफावत आपल्याला दिसून येते.

तसेच प्रोफेशनल गोल्फ खेळा मध्ये स्त्री आणि पुरुष खेळाडूंच्या प्राईस मनी मध्ये खूप फरक आहे. पुरुष खेळाडूंना 256 मिलियन डॉलर  Prize money आहे, तर स्त्री खेळाडूंना 50 मिलियन डॉलर इतकी कमी आहे.एवढी मोठी तफावत prize money मध्ये जाणवते.

ही तफावत कमी करायची असेल तर निश्चितपणे स्त्री आणि पुरुष खेळाच्या सामन्यांना समान पाहायला पाहिजेत.
१३)Gender descrimination :
अनेक वेगवेगळ्या खेळांमध्ये लिंगभेदावरून महिलांना डावलले जाते. अनेक वेगवेगळे खेळांचे सामने तर महिलांसाठी खूप उशिरा चालू झाले. जसे की,फुटबॉल, बास्केटबॉल,गोल्फ वगैर..
'Everyday in  female athletes life is a hurdle race of sports, especially if she hails from a village.'असे Ashwini Akkunji म्हणते तिने 2010 च्या Asian Games मध्ये 400mtr.Hurdles Gold Medlist आहे.
महिला खेळाडूंच्या बाबतीत इतका भेदभावाची भुमिका असतानाही महिला खेळाडू ह्या खूप प्रगती करत आहेत. अनेक वेगवेगळ्या समस्यांमधून मार्ग काढून प्रगतीवर आहेत.
2016 च्या Rio Olympics मध्ये साक्षी मलिक ही एकमेव महिला खेळाडू जिने मेडल मिळवलेले आहे. 



ह्या सात उपायांना अवलंबून आपण आपल्या स्वतःपासूनच सुरुवात केली तर निश्चितपणे आपल्या मानसिकतेत बदल होईल. आणि महिला खेळाडूंबद्दलचा आपल्या मनातील मान वाढेल,आदर वाढेल व महिला खेळाडूंची संख्या पण वाढेल. या उपायांचा नक्की अवलंब करा.
 तुम्ही माझ्या या ब्लॉगचा 1 ला भाग वाचला असेल, अशी अपेक्षा करते. हा 2 रा भाग पण तुम्ही वाचा. तुम्हाला खूप महत्त्वाची अशी प्रेरणा मिळेल. आणि माझ्या या ब्लॉगच्या 3 ऱ्या भागाची प्रतीक्षा करा.
माझा हा ब्लॉग चा भाग 2  पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद. 🙏 🙏
 ऑलिंपिक खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक हा नक्की जॉईन करा. मी एक महिला असल्याने तुमच्या मुलीना खेलासंदर्भातील मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे  करू शकते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय