अपयशातूनच यशाकडे झेप
एक हजार वेळा प्रयोग केल्यानंतर बल्बचा शोध लावण्यात थॉमस अल्वा एडीसन यशस्वी होतो. त्याचे एक यशच लोकांच्या डोळ्यांना दिसते, परंतु एक हजार वेळेस त्याला अपयश पत्करावे लागले ह्याचा विचार केला जात नाही. एक हजार वेळा एडीसन प्रयोगशाळेत बसून आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रयोग करत होता. प्रत्येकवेळा येणाऱ्या अपयशाने एडीसन जराही खचला नव्हता. त्याची प्रत्येक सकाळ ही प्रफुल्लीत, प्रसन्न, आणि यशानेच भरलेली होती. लोकांनाही आश्चर्य वाटत होते की, हा इतक्या वेळा मिळालेल्या अपयशाने खचून कसा काय जात नाही. ह्याची प्रत्येक सकाळ ही परत त्याच सकारात्मकतेने भरलेली, परत तीच उत्सुकता. हे कसे काय शक्य आहे. एखाद्या साधारण व्यक्तीच्या समजण्यापलीकडची ही गोष्ट होती. एडिसन हा एक यशस्वी व्यक्ती म्हणून आपण त्याचे कौतुक करतो. परंतु ह्या अपयशातूनच त्याने यशाकडे झेप घेतली होती. जेव्हा तुम्हाला वारंवार अपयशाला सामोरे जावे लागते तेव्हा यशासाठी संयम ठेवावाच लागतो. तुम्हालाही वारंवार अशा अपयशालाच सामोरे जावे लागत आहे का ? तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही तुमची झेप ही यशाकडे जात नाही का ? तर...