तुमच्या ध्येयाची निश्चित योजना आहे का ?


जगातील प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही ध्येय असतेच असते. फक्त फरक इतकाच असतो की, ते ध्येय मोघम असते, अस्पष्ट असते, अनिश्चित असते. 

तुमच्यासमोर एक निश्चित ध्येय आहे का ?

तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी तुम्ही काही निश्चित योजना तयार केली आहे का ?

 ऋग्वेदात असे म्हणले आहे  की, "ज्यावेळी तुम्ही तुमच्या मनाला, हृदयाला आणि तुमच्यातील कणखर विश्वासाला एक विशिष्ट दिशा देता. तेव्हा तुम्ही अशक्यप्राय गोष्टी करून दाखवत असता. " आजपर्यंत जगात अनेकांनी अनेक अशक्यप्राय गोष्टी करून दाखवल्या आहेत. 

तुम्ही जर तुमच्या ध्येयासाठी अशी काही निश्चित योजना तयार केलीच नसेल तर, काहीही घाबरू नका. ह्या दोन प्रश्नांची उत्तरे  तुम्हाला  माझ्या  हया  ब्लॉगमध्ये मिळतील. त्यासाठी तुम्हाला माझा हा ब्लॉग पूर्ण वाचावा लागेल. 

नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे, येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.

प्रत्येकामध्ये काही ना काही बुद्धिमत्ता, क्षमता, कलात्मकता असतेच असते. राईट बंधूंनी माणसापेक्षा वजनाने जड असणारी वस्तू  हवेत उडवायचं ठरवलं. आणि त्यांच्या ह्या  विचारावरच  लोक त्यांना वेड्यात काढू लागले. पण त्यांनी मनात आलेल्या विचाराला ध्येयाचे स्वरूप दिले, ध्येयाला योग्य योजनेचे स्वरूप दिले आणि वास्तवात उतरवण्यासाठी त्यांनी त्या दिशेने रोज एक एक पाऊल टाकले. आणि आश्चर्य म्हणजे माणसापेक्षा वजनाने जड असणाऱ्या वस्तूला प्रत्यक्षात हवेत उडवले. माणसापेक्षा जड असणारी वस्तू हवेत उडताना पाहून सारया  जगाला एकच संदेश दिला की, योग्य नियोजनाची साथ असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे अशक्य असे काहीच नाही. 

तुम्हाला तुमच्या ध्येयाला योग्य दिशा द्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला खालील उपायांची आवश्यकता आहे.

१) तुमची मुल्ये ठरवा :

   भगवद्गीतेच्या तिसरया  अध्यायात म्हटलेले आहे की,

 "कोणा दुसरयाच्या  आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा अपरीपुर्णतेने आपली स्वतः ची नियती जगणं अधिक चांगलं असतं."

माझ्याकडे पाहून लोकं काय म्हणतील, माझ्याबाबत लोकांच्या काय अपेक्षा आहेत. मी नेमके कसे वागायला हवे की, ज्यामुळे इतरांना मी चांगला वाटायला लागेन, माझ्याकडून इतरांच्या काय अपेक्षा आहेत, ह्यावरच आपण आपले स्वतः ला काय बनायचय, किंवा माझे काय ध्येय असायला हवे,  हे ठरवत असतो.

  तीनदा उत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळवणारा जगातील एकमेव अभिनेता डेनियाल-डे लुईस हा मेथड अक्टींग तंत्रज्ञानाचा  वापर करून तो त्याला मिळालेल्या  भूमिकेत अक्षरशः जीव ओतत असे. समजा एखाद्या खाटीकाचा अभिनय करत  असेल, तर  तो खाटकासारखाच बाहेरही वागत असे अत्यंत धसमुसळेपणाने त्याचे वागणे असायचे. ह्या त्याच्या कौशल्यामुळेच त्याला तीनदा उत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे.  

सांगायचा मुद्दा हाच की, आपल्याला काय हवे आणि काय आवडते त्यावर आपले ध्येय ठरवा, इतरांच्या वाटण्यावर किंवा विचारांवर ते अवलंबून नसावे. म्हणजेच तुमचे ध्येय स्पष्ट, न गोंधळलेले, आणि निश्चित असावे.


२) तुमची ध्येये रोज लिहून वाचून काढा  :

 मी अगोदर मला काय करायचे आहे ते केवळ मी माझ्या मनातच ठेवायचे, त्याला कागदावर कधी घेतलेच नाही त्यामुळे माझं मन मला  सतत भरकटवत  राहिलं. म्हणतात ना, मन वढाय.. वढाय..उभ्या पिकातलं ढोर.. तसेच आपले मन कधीच एका जागेवर बसत नाही. त्याला जागेवर बसवण्यासाठी तुम्हाला त्याला एक स्थिर  उंच डोंगर आधीच दाखवून द्यावा लागेल. 

जसे, आपण लहानपणी मुलांना त्या डोंगराच्या पलीकडे एक राक्षस आहे, असे  म्हणतो. तसेच आपल्या  मनाला पण रोज-रोज सांगा, त्याच्याकडून वदवून-लिहून घ्या, तुला हे हे करायचे आहे म्हणून. तरच त्याला एका ध्येयावर ठेवणे जमेल तुम्हाला. 

म्हणजेच तुमची ध्येये तुम्ही रोज लिहा, लिहिलेली ध्येये  रोज रोज वाचा.


३) ध्येयाला दिशा द्या :

   मार्टिन ल्युथर किंग ह्यांना नेहमी अनेक व्यक्ती भेटायच्या आणि मला ...हे  करायची खूप इच्छा आहे, मी अमुकतमुक करेन म्हणतो.., मला ... हे हे करावेसे वाटते पण... अशी वाक्ये म्हणणारी व्यक्ती नेहमी भेटत. कारण त्यांच्या ध्येयाला त्यांनी योग्य दिशा दिली नव्हती. ध्येये होती पण अवास्तविक आणि मोघम होती. तुमच्या अशा मोघम ध्येयांना दिशा कशी मिळेल तुम्हीच सांगा ? 

तुमच्या ध्येयाला योग्य  दिशा मिळावी असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी नियोजन आखावे लागेल. म्हणजेच त्याला एक योग्य दिशा द्यावी लागेल. ध्येयाला दिशा मिळाली तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहचाल. म्हणजेच तुम्हाला तुमच्या ध्येयाचे व्यवस्थित नियोजन करा. वास्तविक ध्येयाच्या ध्येयपूर्तीसाठी ध्येयपत्रिका बनवा. तुमची आर्थिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, अशी ध्येये वेगवेगळी करून त्याची पत्रिका बनवा.


४) कृती करणे  :

तुम्ही ठरवलेल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला कृती करावी लागेल. जेव्हा तुम्ही एक बावीस इमल्याची इमारत चढायचे ठरवता तेव्हा तुम्हाला एक एक पाऊल टाकावे लागेल तरच तुम्ही बाविसाव्या इमल्यापर्यंत  पोहचाल. 

   एकदा एका माणसाने शर्यतीचा घोडा विकत  आणून तबेल्यात बांधला. आणि तबेल्यावर पाटी लावली की, 'जगातील सगळ्यात वेगवान घोडा.'  तो घोडा अजून जास्त तंदुरुस्त आणि देखणा राहावा ह्यासाठी त्याच्या मालकाने त्याला कोणतीच कसरत किंवा सराव करवून घेतला नाही. एकदा त्या घोड्याला एका शर्यतीत उतरवण्यात आले आणि तो घोडा सगळ्यात शेवटी आला. लगेच त्या मालकाने तबेल्यावरची पाटी बदलली की, ' घोडा वेगवान, पण त्याहूनही जग गतिमान आहे.' 

म्हणजेच तुम्ही जर काहीच कृती केली नाही तर तुम्ही पण एक देखणा घोडा बनून राहाल. तुमच्यापुढे सारे जग जाईल आणि तुम्ही आता वेळ गेली म्हणून पश्चात्ताप करत बसाल. तर अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येक दिवस तुमचाच आहे. पण  त्यासाठी तुम्ही  कृती करायला सुरुवात करा, तुम्ही निश्चितच तुमच्या ध्येयापर्यंत लवकरच पोहचणार.


ह्या चार पायरयांच्या वापराने तुम्ही तुमची ध्येये गाठू शकाल. तर वेळ न घालवता आजच सुरुवात करा. आणि तुमची ध्येये गाठा.

माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्याबद्दल तुमचे धन्यवाद 🙏 🙏 

माझा हा ब्लॉग तुम्हाल कसा वाटला ते नक्की सांगा. तुमची काही प्रश्न असतील तर ती कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. Like करा Comments करा आणि Share पण करा.

खेळासंदर्भात अजून काही माहिती हवी असेल तर माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलीम्पिक्स गेम्स हा जॉईन करा.

 फेसबुक ग्रुपची लिंक इथे दिलेली आहे.

https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share


टिप्पण्या


  1. खूप छान पद्धतीने तुम्ही सकारात्मक विचारांची देवाण घेवाण केलीत..
    धन्यवाद..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय