तुमच्यात सकारात्मकता कशी वाढवायची ?

   



एक खूप मोठी पहाडी होती त्या पहाडीवर एक व्यक्ती दररोज फिरायला जात असे. त्याचा लहान मुलगा एके दिवशी त्याच्या मागे लागला आणि सोबत येण्यासाठी हट्ट धरू लागला. म्हणून त्या माणसाने त्याच्या त्या लहान मुलालाही त्या दिवशी सोबत घेतले. त्या पहाडीवर खूप दगड होते आणि पायवाट पण खूप अरुंद अशीच होती. त्या पहाडीवर गेल्यास तो मुलगा एका दगडाला ठेसाळून खाली पडला आणि जोरात ओरडला. पहाडी असल्यामुळे त्या मुलाचा आवाज पूर्ण पहाडीमध्ये घुमू लागला. ही गोष्ट त्या लहान मुलासाठी नवीनच होती. तो घाबरला आणि त्याने त्याच्या वडिलांना विचारले हा कोण आहे जो मला असा चिडवत आहे मी जसा ओरडेल तसेच ओरडत आहे. बराच वेळपासून वडील त्याचे सर्वकाही ऐकून घेत होते. मग वडिलांनी जोरात ओरडले, 'तू मला खूप खूप आवडतोस, तू खूप खूप चांगला आहेस.' असे म्हणल्यास त्या मुलाला आश्चर्य वाटते की, माझे बाबा तो कोण आहे जो मला चिडवत आहे त्यालाच म्हणत आहेत की, तू खूप चांगला आहेस, ही काय भानगड आहे. वडिलांना तो मुलगा विचारतो तेव्हा वडील म्हणतात बाळा आपण जसे बोलतो जसे वागतो आणि जसे शब्द उच्चारतो त्याप्रमाणेच समोरच्याकडूनही आपल्याला अभिप्राय मिळत असतो. त्यासाठी आपण आपल्या तोंडातून चांगलेच शब्द उच्चारायला हवेत. आपल्या स्वतः च्या आचरणावरून आपले  व्यक्तिमत्व घडत असते आणि आपल्या स्वतः च्या व्यक्तिमत्वाची छाप आपल्याला सगळीकडे दिसत असते. तू जसे शब्द उच्चारशील तसेच शब्द ह्या पहाडीतून तुला ऐकायला मिळतील. तू जर आनंदाने बोललास आनंदाने ओरडलास तर तशीच प्रतिक्रिया तुला मिळेल. एकदा करून पहा आणि मुलगा जोरात ओरडतो की, तू मला खूप खूप आवडतोस, तू खूप चांगला आहेस. आणि आश्चर्य पहाडीतून तसाच आवाज त्या लहान मुलाला ऐकायला आला. आणि तो मुलगा खूप आनंदाने नाचू लागला. 

 म्हणूनच तर म्हणतात ना, "हे जग आपल्या विचारांचेच प्रतीबिंब आहे."

तुम्हाला नेहमी नकारात्मक विचारांनाच सामोरे जावे लागत आहे का ? त्यामुळेच तुमच्यात नकारात्मकता वाढत आहे का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या paris olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे. 

तुमच्यात सतत सकारात्मक विचार वृद्धिंगत करण्यासाठी खालील उपायांना आपलेसे करा.

१)सकाळची सुरुवात सकारात्मकतेनेच  करा :

सकाळ ही आपली सगळ्यात महत्वाची वेळ असते. ती तुम्ही कशाप्रकारे कारणी लावता त्यावर तुमचे व्यक्तिमत्व घडत असते. सकाळची सुरुवात ही सकारात्मकतेने केली तर संपूर्ण दिवस तुमचा सकारात्मक जाईल. अनेक प्रकारे आपल्याला आपली सकाळ सकारात्मक करता येते. जसे की, तुम्ही वेगवेगळे स्पीकरचे मोटिव्हेशनल ऑडीओ ऐकू शकता, व्हिडिओ पाहू शकता, किंवा लिहू शकता, ही सकाळची सकारात्मक एनर्जी तुम्हाला खूप प्रेरणा देत असते. प्रेरणात्मक पुस्तकांचे वाचन करा, मनन करा आणि ईश्वराचे आभार माना. प्रत्येक सकाळ ही सकारात्मकतेने भरलेली असली पाहिजे. तुमच्या सकाळ मध्ये 'नाही' हा शब्द येता कामा नये. उदा. मी कार्यालयात दररोज वेळेवर जात नाही, असे म्हणण्यापेक्षा मी कार्यालयात वेळेवर पोहचेन असे स्वतः च्या मनाला सतत सांगा. तुम्ही नक्कीच वेळेवर पोहचाल.

तुमच्यात जास्तीत जास्त सकारात्मकता वाढवण्यासाठी तुम्हाला तुमची सकाळ ही सकारात्मक करायची आहे.




२)नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा :

आपण ज्यावेळी दुसरयांवर टिका करतो, त्यावेळी आपल्यातील वाईट गोष्टीही आपल्याला अपरिहार्यपणे दिसतातच, पण ज्यावेळी आपण इतरांमधील चांगल्या गोष्टींचा शोध घेतो, त्यावेळी आपण आपल्यातील उत्तम गोष्टींकडे पाहू लागतो. 

एकदा माझ्या कार्यालयात एक नवीन मुलगी कामाला आली होती. कार्यालयातील अनेकांच्या कानगोष्टी सुरु झाल्या की, ही मुलगी कामाची दिसत नाही, काम करेल की नाही, किंवा इतर काही गोष्टींवर चर्चा सुरु झाली. मला एकाने प्रश्न केला की, होय ती मुलगी काम करेल असे वाटते का ? मी ऐकूनही न ऐकल्यासारखे केले किंवा कानाडोळा केला. आणि त्या व्यक्तीस मला माहित नाही, असे उत्तर दिले. आपल्याही आजूबाजूला नेहमी असे नकारात्मक प्रसंग येत असतात. त्या प्रसंगांना किंवा त्या नकारात्मकतेला आपण कसे हाताळतो त्यावर आपण किती सकारात्मक आणि नकारात्मक विचार करतो हे अवलंबून असते. 

म्हणूनच नकारात्मक गोष्टींकडे कानाडोळा करा किंवा दुर्लक्ष करा. कारण आपल्या आजूबाजूला असलेली नकारात्मकता आपण थांबवू शकत नाही. मात्र त्या नकारात्मकतेला आपण सकारात्मक पद्धतीने कसे घेतो हे आपल्याच हाती असते. 


३)तुलना करू नका :

 व्यक्ती असो, वस्तू असो, संपत्ती असो, पद असो, शिक्षण असो, ह्या सगळ्यांच्या बाबतीत स्वतः ची तुलना कशाशीच करू नका. तुमच्या जवळ जी विद्वत्ता आहे, गुणवत्ता आहे  ती कोणाजवळच नाही असे समजून इतरांसारखा मी का नाही ? ह्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास किंवा स्वतः ला दोष देत बसू नका. 

   जेव्हा तुम्ही इतरांशी तुलना करत बसता तेव्हा तुम्हाला तुमच्यात केवळ कमतरताच जाणवते आणि कमतरता जाणवल्यामुळे तुमच्यात नकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. स्वतःशीच तुम्ही तक्रार करत बसता.

   संशोधनातून असे दिसून आले आहे की, तक्रार करण्यातून निर्माण झालेल्या दीर्घकालीन तणावामुळे प्रत्यक्षात तर्काधिष्ठित निष्कर्ष काढण्याशी, युक्तीवादाशी, आणि स्मृतीशी संबंधित असलेला हिप्पोकेम्पस हा मेंदूतील भाग आक्रसतो. कॉरटीसोल हे तणावामुळे निर्माण होणारे हार्मोन हिप्पोकेम्पसची हानी करते आणि त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. प्रत्येक आजारामागे नकारात्मकताच कारणीभूत असते असे नाही, परंतु नकारात्मकतेचे परिणाम वाईट आहेत हे मात्र खरे आहे.

म्हणूनच इतरांशी तुलना करत बसू नका. स्वतःची गुणवत्ता वाढवण्याचा सतत प्रयत्न करा. 


ह्या तीन उपायांना तुम्ही आपलेसे केले तर नक्कीच तुमच्यात सकारात्मकता वाढीस लागेल आणि तुमच्यातील नकारात्मकता हळूहळू कमी कमी होत जाईल. तुम्ही जरी नकारात्मक वातावरणात राहत असाल तरीही तुमच्यावर नकारात्मकतेचा परिणाम  होणार नाही.

 माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. Like करा, Comments करा आणि Share पण करा तुमच्या एका शेअरिंगने कुणाला तरी ह्याचा फायदा होऊ शकतो. 

खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी फेसबुक कम्युनिटी जॉईन करा त्याची लिंक इथे खाली दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून जॉईन करा.

https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share



टिप्पण्या

  1. खुपच छान माहिती सकाळची सुरुवातच जर सकारात्मकतेने झाली तर खरंच सर्व गोष्टी चांगल्या होतात...💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. सध्याच्या वातावरणामध्ये सकारात्मक राहण्यासाठी हा ब्लॉग अतिशय महत्त्वाचा आहे खूप छान माहिती दिली मायाताई धन्यवाद.!

    उत्तर द्याहटवा
  3. दैनंदिन जीवनामध्ये सहजपणे अंमलात आणू शकतो अशा टिप्स दिल्या आहेत मॅडम ...खूप छान👍

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान ब्लॉग आहे. ज्याची सकाळ चांगली झाली, त्याचा दिवस कामी आला, अशी म्हण आहे, ते सार्थ ठरवलंत

    उत्तर द्याहटवा
  5. Whenever you start well, it ends well....your blog inspires to start well.
    Thanks.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय