पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन वर्षाच्या नवीन सवयींना सुरुवात करूया.

इमेज
  सकाळचे ०५/०० चे ०७/३० कसे वाजतात हेच कळत नाही. दररोज मी नवीन संकल्प करतो की, सकाळी लवकर उठून जॉगिंगला जायचे, परंतु ती सकाळ अजून आलीच नाही. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरुवात करावी असा विचार करतोय. मला ही चांगली सवय कधी जडेल माहित नाही. अशीच काही तुमची पण समस्या आहे का ?  दरवर्षी तुम्ही पण असेच काहीतरी नवीन सवयी स्वतःला लावण्यासाठी प्रयत्न  करत असता. पण त्या सवयी लावणे थोडेसे कठीण जाते. एखाद्या अशाच चांगल्या सवयीला तुमच्या दैनंदिनीमध्ये ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सामील करायचे असेल, तर माझा हा ब्लॉग पूर्ण वाचा. पहिल्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेमध्ये सर्व लोकांसमोर एक खूप मोठी समस्या उभी होती ओरल हायजिनिंगची. ज्यामुळे तोंडाचे अनेक आजार लोकांना व्हायला सुरुवात झाली. त्यावेळेसच हॉपकिन्स यांनी एक अफलातून प्रॉडक्ट आणले Pepsodent. दररोज सकाळी-सकाळी उठल्याबरोबर जे Pepsodent वापरून आपण आपले दात स्वच्छ करतो तेच. हॉपकिन्स यांनी Pepsodent चे महत्व लोकांना अशा प्रकारे पटवून दिले की, pepsodent या दात साफ करण्याच्या क्रीमने तुम्ही दात साफ केलात, तर तुमचे दात हे खूप स्वच्छ राहती...

तुमच्या मुलांचा स्क्रीन टाईम किती आहे ??

इमेज
मी बऱ्याच मुलांना पाहते की, आई-बाबा सोबत बाहेर गेले किंवा घरी असले तरीही मुले स्क्रीनमध्येच व्यस्त असतात. त्यांना आजूबाजूला धावणाऱ्या गाड्या, पळणारी झाडे, विविध प्रकारची माणसे पाहण्यात कसलीच आवड नसते, ते आपले खाली मान घालून मोबाईलमध्ये काहीतरी करत असतात, स्क्रीनवरच दिवसातील जास्तीत जास्त वेळ घालवत असतात. त्यामुळे अनेक समस्यांना मुलांना सामोरे जावे लागत आहे.  तुमच्या ही मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे का ? अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे का ? जसे की, रात्री लवकर झोप न लागणे, शारीरिक व्याधी जडणे, चिडचिडेपणा, अभ्यासात एकाग्रता न होणे, वगैरे...   तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच. अमेरिकेतील American Academy of Child and Adolscent Psychiatry ह्या संस्थेच्या एका संशोधनानुसार लहान मुले दिवसातील ३ ते ७ तास स्क्रीन समोर असतात. आणि त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, रात्री लवकर झोप न येणे, चिंताग्रस्तता, कुटुंबातील मंडळींसोबत कमी बोलणे, सतत स्क्रीन समोरच राहिल्याने त्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे, अशा अनेक समस्यांना मुलांना आणि कुटुंबियांना सामोरे जावे ल...