तुमच्या मुलांचा स्क्रीन टाईम किती आहे ??
मी बऱ्याच मुलांना पाहते की, आई-बाबा सोबत बाहेर गेले किंवा घरी असले तरीही मुले स्क्रीनमध्येच व्यस्त असतात. त्यांना आजूबाजूला धावणाऱ्या गाड्या, पळणारी झाडे, विविध प्रकारची माणसे पाहण्यात कसलीच आवड नसते, ते आपले खाली मान घालून मोबाईलमध्ये काहीतरी करत असतात, स्क्रीनवरच दिवसातील जास्तीत जास्त वेळ घालवत असतात. त्यामुळे अनेक समस्यांना मुलांना सामोरे जावे लागत आहे.
तुमच्या ही मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे का ?
अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे का ? जसे की, रात्री लवकर झोप न लागणे, शारीरिक व्याधी जडणे, चिडचिडेपणा, अभ्यासात एकाग्रता न होणे, वगैरे...
तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
अमेरिकेतील American Academy of Child and Adolscent Psychiatry ह्या संस्थेच्या एका संशोधनानुसार लहान मुले दिवसातील ३ ते ७ तास स्क्रीन समोर असतात. आणि त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, रात्री लवकर झोप न येणे, चिंताग्रस्तता, कुटुंबातील मंडळींसोबत कमी बोलणे, सतत स्क्रीन समोरच राहिल्याने त्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे, अशा अनेक समस्यांना मुलांना आणि कुटुंबियांना सामोरे जावे लागत आहे. ह्या सर्व समस्यांवर खालील उपाय अगदी परिणामकारक ठरतील. चला तर मग हे उपाय पाहूयात,
१)पालकांनी स्वतः वर ताबा ठेवावा :
पालक स्वतः च स्क्रीनमध्ये खूप व्यस्त असतात. तेव्हा पालकांनी मुलांसमोर स्क्रीन ला टाळावे. लहान मुले घरातील मंडळींचे अनुकरण करत असतात, जशी घरातील मंडळी करतील तसेच करण्याचा प्रयत्न करत असतात. पालकांनी स्वतः वर स्क्रीन पासून दूर राहण्याचा ताबा ठेवला तर नक्कीच मुले तसेच तुमचे अनुकरण करतील. त्यासाठी घरात मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी स्क्रीन पासून स्वतः ला रोखा म्हणजे मुले पण तुम्हाला फॉलो करतील.
सध्याच्या एका नव्या रिसर्च नुसार मुलांच्या झोपेपर्यंत वापरत असलेल्या स्क्रीन मुळे मानसिक आणि शारीरिक अनेक समस्यांना मुलांना सामोरे जावे लागत आहे. अभ्यासात एकाग्रता होत नाही, मन स्थिर राहत नाही, रात्री लवकर झोप लागत नाही वगैरे..
त्यामुळे स्क्रीन पासून जास्तीत जास्त पालकांनी दूर राहिले तर मुले पण स्क्रीनच्या आहारी जाणार नाहीत.
२)मुलांच्या स्क्रीनच्या वेळा ठरवा :
अमेरिकेतील रिसर्च संस्थेने २ वर्षाखालील मुलांना स्क्रीन पाहण्यास परवानगीच दिली नाही, आणि ९ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आठवड्यातून जास्तीत जास्त २ तास असा स्क्रीन टाईम असावा असे सांगितले आहे, आणि वीकेंडला तो जास्तीत जास्त ३ तास असावा. जेणेकरून मुलांच्या मनावर ह्या स्क्रीनचा परिणाम होणार नाही. मित्रांनो हा रिसर्च अनेक प्रयोगातून काढण्यात आलेला आहे. आपल्या चिमुरड्याच्या मानसिकतेवर स्क्रीनचे वाईट परिणाम होऊ नये म्हणून ह्या वेळा पाळायला सुरुवात करा. आणि दिवसातील स्क्रीन टाईम आपल्या मुलांसाठी ठरवून द्या.
३)मुलांना वेळ द्या :
मुलांसोबत तासंतास वायफळ गप्पा मारत बसा, त्यांच्यासारखेच खेळायला सुरुवात करा, शाळेतल्या इकडच्या तिकडच्या गप्पा उगाचच मारत बसा, अशा गप्पान्मधुनच काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करा.
मराठी अभिनेता वैभव मांगल्ये म्हणतो की, मी माझ्या मुलांसोबत विनाकारण तासंतास गप्पा मारत बसतो, तेव्हा माझी मुले माझ्या बोलण्यातून असे शब्द कॅप्चर करतात आणि मला विश्वासच बसत नाही की, हे असे बोलायला कधी शिकले, माझ्या मुलांची भाषा इतकी सुंदर आणि प्रगल्भ आहे की, तुमचा विश्वासच बसणार नाही. पूर्वीच्या काळी घरात आई बाबा घराची साफसफाई करायचे, गादीवरची बेड्शीट बदलायचे, कपडे, भांडी, घराची सजावट करायचे, रंगरंगोटी करायचे, पुस्तक वाचन करायचे. परंतु आता घरात मुले असे कोणी करताना पाहतच नाहीत. सगळे स्क्रीनमध्येच बिझी असतात. त्यामुळे मुलांना पण स्क्रीनवर प्रेम वाटत आहे.
म्हणून तुम्ही जेवढे जास्तीत जास्त मुलांना वेळ द्याल, घरात वेळ द्याल तसेच मुले पण अनुकरण करायला शिकतात. आपल्या मुलांसमोर त्यांचे पालकच स्वतः आदर्श असायला हवेत.
४)कलाप्रकारावर जास्त लक्ष द्या :
मुलांमधील कलागुणांना जास्तीत जास्त वाव द्या. त्यांना ज्या गोष्टी जास्तीत जास्त करायला आवडतात त्या गोष्टी मुलांसोबत तुम्हीही स्वतः करायला सुरुवात करा. मी बर्याच पालकांना पाहते कि, बरेच पालक मुलांना कोणतीही कृती करताना टोकत असतात, ती कृती करणे चुकीचेच आहे हे लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवले जाते. असे न करता मुलांना त्यांच्या आवडीनुसार जे हवे ते खेळू द्यात, जसे हवे तसे कलाप्रकार निर्माण करण्यास त्यांना वाव द्या. म्हणजे त्यांचा स्क्रीन टाईम आपोआप कमी होईल. आणि त्यांच्यात कलात्मकता वाढेल.
वरील उपायांचा तुम्ही आतापासून वापर करायला सुरुवात केली तर नक्कीच एका महिन्याच्या आत तुम्हाला तुमची मुले स्क्रीनपासून खूप दूर गेलीत असे जाणवेल. तर ह्या उपायांचा वापर करायला सुरुवात करा.
माझा हा ब्लॉग तुम्ही संपूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏
माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच Share करा, आणि Like करा.
खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन १०० ऑलीम्पिक्स ही नक्की जॉईन करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा