डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीनिमित्त लेख
सांगा, मुलांनो ७+५ किती ? गुरुजी मी..मी.. (तोंड वाकडे करून गुरुजी काही लक्ष देत नाहीत..) सांगा, मुलांनो ८+५ किती ? गुरुजी मी..मी.. तरीपण गुरुजी लक्ष देत नाहीत.. बाबा मला नाही जायचे त्या शाळेत.. काय झाले भीमा ? मला उत्तर येत होते मी गुरुजींना म्हणतो मी सांगतो तरीपण गुरुजींनी मला सांगू दिले नाही,उलट म्हणले की, तुला शाळेच्या बाहेर बसून ऐकायला मिळते तेच नशीब समज.तुझी लायकी पण नाही असे म्हणले..शुद्र कुठला...असे म्हणले.पण बाबा मला सगळी उत्तरे येत होती..मला नाही जायचे त्या शाळेत.. भीमा तुला उत्तरे येत असताना पण तुला सांगू दिले नाही ना.. तर हेच बदलायचे आहे भीमा तुला..तुला शिकून खूप मोठे व्हायचं आहे.. आणि तिथून पुढे भीमराव शिक्षणासाठी पेटून उठले..अनेक अडचणींवर मात करत त्यांनी भारतातील सर्वात जास्त म्हणजेच ३२ पदव्या प्राप्त केल्या. ९ भाषांवर प्रभुत्व मिळवले.अनेक पुस्तके लिहिली.त्यापैकी " The evolution of Provincial Finanace in British India" आणि "The Problem of Rupee" ही दोन पुस्तके अर्थतज्ञांसाठी म्हणजे पर्वणीच आहेत.आजही ह्या पुस्तकांमधील बरयाचशा गोष्टींचे आजही आपली अर्थ...