अपयशाबाहेरचे पाऊल
मला डॉक्टर व्हायची इच्छा होती पण मी डॉक्टर नाही झालो...आज मी कुठे आहे, आज मी काय करतोय.. माझ्या सगळ्या आकांक्षा तशाच धुळीस मिटून गेल्यात..मी आता एका एयर कंडीशन्ड ऑफिस मध्ये बसून काम करत असतो..पण आता मी काय करतो..ना माझ्या कडे गाडी ,ना भले मोठे घर,ना एखादी कंपनी..आज माझ्यकडे ह्या सगळ्या गोष्टी नाहीत..ना कुठले एखादे खेळाचे Certificate ..मला ट्रेकिंग ची खूप आवड होती पण आजपर्यंत एक पण ट्रेक केला नाही, मलाच माझी चीड येते कधी कधी...मला हिमालयात फिरायला जायची खूप इच्छा होती...पण आजपर्यंत मी ह्यातले काहीच केले नाही,सारा ला कायद्याचे शिक्षण घ्यायचे होते, पण दोनदा परीक्षा देऊनही तिला हवे तेव्हढे गुण मिळवता आले नाहीत.ह्याउलट तिने घरोघरी जाऊन फैक्स मशीन विकण्याचे काम केले.
तुम्हाला असे वाटते का की,ह्या जगातील सगळे दुःख केवळ तुमच्याच वाट्याला आले आहे.तुम्ही एक अपयशी व्यक्ती आहात,तुम्ही एक कमनशिबी व्यक्ती आहात,माझे नशीबच चांगले नाही ,मिळालेल्या अपयशाला तुम्ही मोजत बसला असाल ,मी आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत पोहचू शकत नाही,ते मेडल माझेच होते पण...अशी अवस्था तुमची असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार,मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.
केवळ आपल्या करियर मध्येच नव्हे तर सगळ्याच गोष्टींमध्ये मग तुमचे नातेसंबध असतील,तुमची गुणवत्ता असेल,तुमचे मित्र मैत्रिणी असतील,ह्या सगळ्यांच्याच बाबतीत तुम्ही निश्चित केलेल्या ठिकाणी तुम्ही कधीच नसता,मग त्यावेळी तुम्हाला खूप असुरक्षितता जाणवते,नेहमी घडून गेलेल्या गोष्टींवर उगाचच मीठ चोळत बसता आणि घडून गेलेल्या वेळेला सतत दोष देत बसता.अशा वेळेस मी खाली सांगितलेले उपाय नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील.चला,तर मग उपाय पाहूया,
१)संधी स्वीकारा :
नेहमी तुम्हाला हव्या त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडून आल्या नाहीत तर मग आलेल्या संधीकडे पण आपण डोळेझाक करतो.आलेली संधी तुम्हाला एक नवीन chance देत असते.प्रत्येकाला ह्या विश्वात अनेक संधी मिळतात पण आपण आपले डोळेच झाकून बसलेले असतो ,आपण आपल्या मनाच्या दरवाजाला गेलेल्या संधीच्या तुमचा अहंकार दुखावण्याच्या दुःखात पाहतच नाही,किंवा तुमची बुद्धी त्या दुखावलेल्या अह्न्कारामुळे साथ देतच नाही.
मूर (एक संन्याशी ) त्यांच्या केयर ऑफ द सोल ह्या पुस्तकात म्हणतात की,"अपयशामुळे अक्षरशः ढासळून जाणे ही गोष्ट नकारात्मक आत्ममग्नतेसारखीच असते,कल्पनेतून अपयशाचे मूल्यमापन करताना आपण त्याला पुन्हा यशाशी जोडू शकतो,असा संबंध नसेल तर आपलं काम यशाच्या महान आत्मग्नतापूर्ण कल्पनांच्या आणि अपयशाच्या दुःखी भावनांच्या गर्तेत कोसळते. तुम्ही कोण आहात याच प्रतीबिंब म्हणून स्वतः कडे न पाहता तुम्ही कुठे आहात ते स्वीकारण्यातून विनयशीलता येते,मग तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर तुम्ही यशाचा शोध घेण्यासाठी करू शकता."
ह्यासाठी मिळालेल्या अपयशाचे मूल्यमापन करत बसु नका त्यापेक्षा तुम्हाला मिळालेल्या संधीकडे तुम्ही डोळसपणे पहा आणि त्याचेच सोने करा.ती संधी कोणत्याही स्वरुपात असू शकते.
2)स्वतःचे पाय घट्ट रोवा :
जेव्हा तुम्हाला अपयश येते तेव्हा तुम्ही हादरून जाता,तुम्ही म्हणजे अर्थातच तुमचा अहंकार हादरतो.ते यश माझेच होते पण मला नाही मिळाले.तुम्ही जेव्हा अशाप्रकारच्या अपयशांना बळी पडता तेव्हा तुम्हाला असे वाटते की, ह्या जगातील जी काही दुःख आहेत ती सगळी माझ्याच वाट्याला आलेली आहेत.त्यावेळेस तुम्ही तुमचे पाय जमिनीत घट्ट रोवा म्हणजेच त्या अपयशाच्या क्षणाला स्थिरपणे शांत बसून अनुभवा,आणि स्वतः शी प्रश्न विचारा की, मला जे अपयश मिळाले आहे त्यात मी का कमी पडलो,आणि ह्या परिस्थितीतून मी आता बाहेर कसा पडणार ?ह्या दोन प्रश्नांनी तुम्हाला तुमची नवीन वाट दिसायला लागेल.आणि मग तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून नवनवीन संधीला आपलेसे करा.
ज्यावेळी साराला तिची स्वतः ची एक कंपनी असावी ,हा विचार तिच्या डोक्यात आला. त्यावेळी तिच्याकडे कुठलेच आर्थिक साधन नव्हते.तरीही तिला वाटले कोणतेच प्रयत्न न करणे हे खूप मोठे अपयश असू शकते आणि त्यानंतर १५ वर्षांनी त्याच व्यवसायाने तिला अब्जाधीश बनवले.नक्कीच तिला हे यश झटक्यात मिळाले नसणार.ती ह्या सगळ्या यशात अनेक वेळेस कोलमडून पडली असणार.
३)वेळेचा सदुपयोग करा :
मी पोलीस ट्रेनिंग ला असताना आमचे सकाळी ०४:३० वाजता दिवस सुरु व्हायचा सकाळचे 2 तास मैदानावर जबरदस्त घाम गळायला लावले जायचे.नाश्त्यानंतर अभ्यास असायचा, त्यात वेगवेगळे कायदे शिकवले जायचे.दुपारी ४ वाजता मोटिवशनल पुस्तकं वाचली जायची,पण तेच मी तिथून बाहेर पडल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करते का ?हा प्रश्न स्वतः ला मी विचारला आणि उत्तर आले नक्कीच नाही.मग जर मी दुपारी ४ वाजता बक्वाज youtube वरचे व्हिडिओ पाहण्यात वेळ घालवते किंवा मोबईल च्या इतर apps वर वेळ घालवते,त्याएवजी जर मी काही मोटिव्हेशनल पुस्तकं वाचली तर माझ्या ज्ञानात भरच पडणार आहे,मग कशासाठी मी ह्या फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवतेय ,उठ आणि त्या वेळेला तू कारणी लाव,असे मी स्वतः ला सांगितले आणि वेळेचा सदुपयोग करायला सुरुवात केली.आणि एक अपयशाबाहेरचे पाऊल टाकायला सुरुवात केली.तुम्ही कधी टाकणार हे पाऊल ?
४)अपयशानंतरची उद्दिष्टे :
तुमची छोटी छोटी अनेक उद्दिष्टे /ध्येये एकत्रित बांधली, तर नक्कीच त्याचे एक मोठे ध्येय बनेल आणि तेच तुमचे मोठे ध्येय असेल.ऑलिम्पिकचे ध्येय हे मोठ्या ध्येयात येते.त्यासाठी आधी तुम्हाला वार्षिक,मासिक,दैनिक,ध्येये बनवावी लागतील.आणि हीच छोटी छोटी ध्येये तुम्हाला तुमच्या मुख्य ध्येयापर्यंत घेऊन जातील.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती जेसिका हार्डी म्हणते की,"मी ज्यांचा विचार माझी स्वप्ने म्हणून करते ती माझी दीर्घकालीन उद्दिष्टे असतात आणि माझी अल्पकालीन उद्दिष्टे ही दैनंदिन किंवा मासिक कालावधीत प्राप्त करण्याजोगी असतात.मला ज्यांच्यामुळे अधिक चांगले वाटावं आणि ज्या उद्दिष्टांमुळे माझ्या दीर्घकालीन उद्दिष्टांची अधिक चांगली तयारी करण्यासाठी मी तयार व्हावं.अशाप्रकारे माझी अल्पकालीन उद्दिष्टे तयार करायला मला आवडते."
मग नक्कीच अशी अल्पकालीन उद्दिष्टे ठरवा आणि अपयशाबाहेरचे पाऊल टाकायला सुरुवात करा.
तुम्हाल काय हवे आहे किंवा कोण बनायचे आहे ह्यावर जास्त भर द्या.लोक काय म्हणतील ,लोक काय विचार करतील, ह्याकडे लक्ष देऊ नका. आणि अपयशातून बाहेर पडून येणाऱ्या संधीचा स्वीकार करा,तुम्ही जे मागाल ते मिळेल पण तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास हवा.माझ्या गोष्टी वापरून तुम्ही पण तुम्हाला मिळालेल्या अपयशातून बाहेर येऊ शकता आणि परत यशाकडे वाटचाल करू शकता.डोळसपणे,मेंदूला नवी दिशा देऊन येणाऱ्या संधीचे स्वागत करा.
माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.
माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच खाली comment box मध्ये comments करून सांगा.Like करा Comments करा आणि Share पण करा.🙏 🙏 🙏
ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स हा नक्की जॉईन करा.






Powerful
उत्तर द्याहटवाthank you nehal tai
हटवाPowerful
उत्तर द्याहटवा