ह्या उत्कृष्ट 11 गोष्टी तुम्हाला पोहोचवतील ऑलिम्पिक्स खेळां पर्यंत

       


        आपल्याला ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा मध्ये भरघोस यश मिळवायचे आहे , ऑलिंपिक खेळा बाबत असणारी भीती-उदासीनता -असफलता असेल आणि  खेळ खेळण्यासाठी आत्मविश्वास - स्टॅमिना - सातत्य कमी पडत असेल, आणि त्याची  कारणे व उपाय जाणून घ्यायचे असतील,तर माझा हा लेख पूर्ण वाचा.आणि ऑलिंपिक खेळा साठी खुपशी तयारी लागते, कष्ट लागते,कुणाची तरी ओळख लागते, या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाल. आणि खालील  11  गोष्टींना आपलेसे केलात आणि त्याचा नियमित पणे सराव केलात तर नक्कीच एक उत्कृष्ट ऑलिम्पिक खेळाडू बनण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.

       ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू खूप कमी प्रमाणात खेळतात. त्यामागे अनेक कारणे आहेत ती कारणे आपण अगोदर पाहू या-

1) खेळापेक्षा अभ्यासाला जास्त महत्त्व देण्याची मानसिकता - पालकांनी आपल्या मुलांवर खेळापेक्षा अभ्यासाचे जास्त ओझे टाकलेले आहे. खेळ आणि अभ्यास या दोन्हींमध्ये मुलांनी सांगड घालावी अशी त्यांची नेहमीच अपेक्षा असते. त्यामुळे मुलांवर दडपण येते. डॉक्टर -इंजिनीयर बनने किंवा कोणतीही एखादी शासकीय नोकरी किंवा आरामदायक नोकरी मुलांनी मिळवायला पाहिजे, यावर पालकांचा जास्तीत जास्त भर असतो.त्यामुळे मुलांना जरी एखाद्या खेळाची आवड असली तरीही, पालक त्याबाबत निष्क्रियता दाखवतात.कोणत्याही खेळात मुलांनी सहभाग नोंदवण्यासाठी पालकांची निष्क्रिय मानसिकता दिसून येते.




2) मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता - मुलांना लहानपणापासून खेळाच्या बाबतीत दुर्लक्ष, निष्क्रियता ,उदासीनता या गोष्टींचे संस्कार झालेले असतात .लहानपणापासूनच खेळाबाबत दैनंदिन सवयी ,प्रशिक्षण ,मार्गदर्शन आणि माहिती या सगळ्या गोष्टींचे त्यांच्यावर संस्कार होतच नाहीत. किंवा मुलांना या गोष्टींची जाणीव करून दिली जात नाही की, खेळामध्ये करिअर करता येते.याबाबत उदासीनता जाणवते. त्यामुळेच मुलांमध्ये खेळ बाबत उदासीनता ,भीती निर्माण होते. व खेळाच्या बाबतीत आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. ओलंपिक खेळाच्या बाबतीत आत्मविश्वासाची कमतरता ही सगळ्यात मोठी समस्या आहे.


3) स्वयंशिस्तीची कमी - लहानपणापासूनच मुलांना खेळाबाबत स्वयंशिस्त लावणे आवश्यक आहे. स्वयं शिस्तीमुळे स्वतःतील लपलेल्या खेळाडूला बाहेर काढता येते. योग्य खेळाची निवड होते ,त्यासोबतच स्वयंशिस्त म्हणजेच खेळाचा दररोज नियमितपणे न थकता न चुकता सराव करणे. व त्या खेळामध्ये पारंगत होणे, या स्वयंशिस्तीची कमतरता मुलांमध्ये जाणवते. सुरुवातीला उत्साहात  खेळाचा सराव करू सुरू करतात परंतु नंतर हळूहळू तो उत्साह लोप पावतो, व निष्क्रियता येते. स्वयंशिस्त असल्याशिवाय कोणताही खेळाडू उत्कृष्ट होऊ शकत नाही.


4) ध्येय निश्चितीची कमतरता - खेळाडूंमध्ये ध्येय निश्चित असणे गरजेचे असते रोजची ध्येय ठरवून ती ध्येय पूर्ण केली पाहिजेत. खेळामध्ये प्रत्येक मिनिटाचे ध्येय ठरवावे लागते. गोलमध्ये बॉल टाकायचा आहे हे माहीत असल्याशिवाय, बॉल गोल मध्ये जाणार नाही. म्हणजेच ध्येय हे माहीत असणे आवश्यक आहे. दररोज ध्येय निश्चित केले पाहिजेत, आपण ही ध्येय निश्चित करत नाहीत, म्हणून ध्येयपूर्ती होत नाही.




5) अपयश पचवण्याची ताकद - खेळांमध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला यशच मिळेल असे काही नाही. अपयश सुद्धा प्राप्त होते. कोणत्याही खेळा मध्ये नेहमी मेडल्स मिळतील ,बक्षिसे मिळतील असे काही नाही. आपण आपल्या खेळाप्रती प्रामाणिक असल्यानंतरच आपण एक उत्कृष्ट खेळाडू बनू शकतो.त्यामुळे अपयश आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या खेळात उत्तरोत्तर प्रगती कशी करता येईल याकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. खेळाडूंमध्ये यश अपयश पचवण्याची कमतरता जाणवते. यशाने हुरळून जातात आणि अपयशाने खचून जातात.


6) भावनिक असमतोल - आपल्या स्पर्धक बाबत  राग, द्वेष, मत्सर ,पूर्वग्रहदूषित या ज्या भावना आहेत, त्या खेळताना कधीही मनात आणता कामा नये. खेळ खेळताना पूर्णपणे खेळावरच फोकस असला पाहिजे. तरच खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन होईल.खेळातील हा भावनिक असमतोल खेळाडूंना साधता येणे गरजेचे आहे, परंतु तसे होत नाही. त्यामुळेच खेळाडूंमध्ये मारामारी, एकमेकांबद्दल द्वेष, राग यातूनच वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे सुद्धा घडतात.


7) सांघिक नेतृत्व गुणांची कमतरता - खेळाच्या चांगल्या प्रदर्शनासाठी खेळाडूंमध्ये प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असली पाहिजे. मग तो खेळ वैयक्तिक असो किंवा सांघिक असो.प्रत्येक खेळामध्ये खेळाडूने चांगल्या प्रदर्शनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलण्याची तयारी दाखवली पाहिजे. त्यामध्ये चालढकल करता कामा नये .परंतु प्रत्यक्षात असे होत नाही.म्हणून खेळाचे प्रदर्शन चांगल्या प्रकारे होत नाही.


8) सोशल मीडियाच्या आहारी जाणे - खेळाडूंना  एखाद्या स्पर्धेत यश मिळाल्यानंतर त्या यशाला हुरळून जातात .आणि मग खेळा वरचा  फोकस  कमी होतो. आणि सोशल मीडियावर जास्त फोकस वाढतो. जेणेकरून त्यांच्या खेळावर  त्याचा परिणाम प्रत्यक्षपणे परिणाम होतोच आणि खेळाचा सराव कमी होतो  खेळा वरचे लक्ष  हटते आणि सोशल मीडियावर जास्त एक्टिव राहण्यासाठी प्रयत्न करतात आणि सोशल मीडियाच्या आहारी जातात.


9) खेळा बाबतीत ज्ञानाची कमतरता - खेळाचा सराव  केव्हापासून करायला पाहिजे, आशियाई कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये कोणकोणत्या खेळांचा समावेश होतो,आणि आपण कोणते खेळ निवडायला पाहिजे,याबाबत ज्ञानाची कमतरता पालक आणि मुले या दोघांमध्येही जाणवते. ज्या खेळास कमी महत्त्व आहे आणि कमी कष्ट केले जाते असे खेळ निवडण्यास जास्त प्राधान्य दिले जाते व खेळांमध्ये ही करिअर करता येते याबाबत ही ज्ञानाची कमतरता जाणवते.


ही सगळी कारणे खेळाडूंमध्ये समस्यारुपी तयार होतात, की ज्यामुळे मुले चांगल्या खेळाडू पर्यंतचा प्रवास अर्ध्यातच सोडून देतात. जेणेकरून ती ऑलिंपिक  क्रीडा स्पर्धां  पर्यंत पोहोचत नाहीत.

     खालील 11 गोष्टींना जर तुम्ही आपलेसे केले, तर नक्कीच तुमच्यातील खेळाडूची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये तुम्हाला सहभागी होण्यास कोणीच रोखू शकणार नाही.

1) आत्मविश्वास - खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असणे हे त्याच्या खेळाच्या प्रदर्शन यावरूनच प्रदर्शना वरूनच दिसून येते. आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी तुम्हाला आपल्या खेळाचा दररोज दोन ते तीन तास सराव करावाच लागेल, तरच तुमच्यात तुमच्या खेळाप्रती आत्मविश्‍वास वाढेल आणि त्यात तुम्ही प्रगती करू शकाल.


2) स्वयंप्रेरणा - आपल्या अंतर्मनातील प्रेरणेला यश-अपयश याची जाणीव नसते .आपल्या अंतर्मनातून स्वयंप्रेरणेने  जशी प्रेरणा आपल्याला मिळेल तसेच आपल्या खेळाचे प्रदर्शन आपल्याला करता येईल.खेळाडू आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केवळ स्वयंप्रेरणेने द्वारेच उत्कृष्ट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमची स्वयंप्रेरणा मजबूत बनवण्यासाठी प्रेरणात्मक पुस्तकांचे वाचन करणे, व्हिडिओ पाहणे, आवडत्या खेळाडूची सामने पाहणे, या गोष्टी नियमित पणे कराव्याच लागतील.


3) सातत्य - सुरुवातीला खेळाडू अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने खेळाचा सराव सुरू करतात.परंतु हळूहळू त्यांचा तो उत्साह लोप पावतो.

उसेन बोल्ट याचे एक वाक्य आहे - 

'जगातील सर्व लोक कोणत्याही गोष्टीची सुरुवात खूप सुंदर करतात परंतु मी शेवट सुंदर करतो'

म्हणजेच खेळांच्या सामन्यापेक्षाही  खेळाचा सराव करणे अवघड असते. खेळाच्या सरावातील सातत्य आपल्याला सामन्यातील यश प्राप्त करून देतो. त्यामुळे सातत्य ठेवणे आवश्यक आहे.


4) ध्येयनिश्चिती - खेळामध्ये निश्चित असणे गरजेचे आहे. ही एका मिनिटापासून ते पुढील पाच वर्षांपर्यंतची  निश्चित करायला पाहिजेत. उदाहरणार्थ- 100 मीटर रनिंग 40 सेकंदात पूर्ण करायचे, हे माहीत असल्याशिवाय आपले मन त्या प्रमाणे आपल्याला काम करायची दिशा दाखवत नाही. रोजची ध्येये  दररोज वहीवर लिहून काढणे आणि त्याप्रमाणे रोज पूर्ण करणे, ठरवलेल्या ध्येयाप्रमाणे  सराव करणे.


5) स्वयंशिस्त - प्रत्येक खेळाडूने आपल्या विचारांना ,बुद्धीला ,मनाला ,शरीराला एक प्रकारची शिस्त लावणे गरजेचे आहे. सकाळी लवकर उठणे, झोपणे ,खाणे-पिणे, वाचन करणे, पिक्चर पाहणे, याबाबतची शिस्त स्वतः स्वतःला लावू शकतो.त्यालाच स्वयंशिस्त म्हणता येईल .या स्वयंशिस्त मुळेच खेळाचा सराव चांगल्या प्रकारे होऊ शकतो. सराव चांगला झाल्यामुळे खेळाचे प्रदर्शन नक्कीच उत्कृष्ट होते.


6) यश अपयश पचवण्याची ताकद असणे - कोणत्याही खेळामध्ये यश-अपयश हे ठरलेलेच असते .यश मिळाल्यानंतर हुरळून न जाता, खेळावर फोकस करून खेळामध्ये उत्तरोत्तर प्रगती कशी करता येईल याचे प्रयत्न दिवसेंदिवस करायला पाहिजे. आणि अपयश आल्यानंतर खचून न जाता खेळामध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्नरत राहावे लागते. हा सराव तुम्हाला नियमित करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला रोज  दिवसातून किमान बारा मिनिटे दोन वेळेस ध्यानधारणा करावी लागेल. तरच तुम्ही मानसिक दृष्ट्या मजबूत बनाल.


7) स्पर्धात्मक भावना - खेळाडूंमध्ये खेळा संदर्भात स्पर्धात्मक भावना असावी. प्रतिस्पर्ध्या बाबत कोणताही राग, द्वेष ,मत्सर, पूर्वग्रहदूषित पणा या भावना असता कामा नये. आपल्या खेळामध्ये उत्तरोत्तर प्रगती आपल्याला कशी करता येईल यासाठी नेहमीच प्रयत्नरत राहावे. स्पर्धा ही केवळ मैदाना पुरतीच मर्यादित असावी. या भावनांचा मेळ प्रत्येक खेळाडूला घालता येणे गरजेचे आहे.हा सराव फक्त तुम्ही तुमच्या खेळाप्रती असणारा आदर आणि प्रेम वाढवण्यानेच होऊ शकतो. खेळाप्रती आदर हा फक्त खेळाच्या सरावानेच वाढू शकतो.


8) लवचिकपणा - कोणत्याही खेळामध्ये दुखापत होणे, इजा होणे सहाजिकच आहे. मग ती कोणत्याही अवयवाला होऊ शकते.  एखाद्या खेळाच्या सरावा वेळी किंवा सामन्यावेळी दुखापत झाली तर आपले सर्व जीवन संपले,असे हरून न जाता त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला शरीरासोबत -मनाचाही व्यायाम करावा लागतो, आणि मनाचा मजबूतपणा सरावानेच वाढतो.


9) नेतृत्वाची भावना - कोणत्याही खेळाडूंमध्ये नेतृत्व गुण असणे गरजेचे आहे .मग तो खेळ वैयक्तिक असो किंवा सांघिक असो.खेळाच्या सामन्यांमध्ये तातडीने निर्णय घेऊन आपल्या टीमचे - स्वतःचे प्रतिनिधित्व करण्याची ताकद प्रत्येक खेळाडू मध्ये असली पाहिजे.मग तो खेळ कोणताही असो. हे नेतृत्व गुणांची भावना दररोजच्या खेळाच्या सरावानेच येऊ शकते.


     10) आहार-विहार - वरील नऊ उपायांसोबतच आपल्या खेळाच्या सरावा नुसार आपण आहार सुद्धा तसाच घेणे आवश्यक आहे. तुम्ही फक्त खेळाचा सराव करत असाल तर तुमची क्षमता वाढणार नाही. तर त्याला आहार-विहाराचे ही सोबत असली पाहिजे. खेळाच्या सरावासोबतच योग्य आहार घेणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. रोज ठरलेला आहार तितक्या प्रमाणात घेणे गरजेचे आहे.


     11) मानसिक वैचारिक खतपाणी - ज्याप्रमाणे खेळाडूला खेळाचा सराव नियमित करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणेच खेळासाठी ची मानसिकता आणि शुद्ध विचार असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला रोज कृतज्ञता मानने, ध्यानधारणा करणे, वेगवेगळ्या खेळाडूंची प्रेरणात्मक आत्मचरित्रे वाचणे, पुस्तके वाचणे,  प्रेरणादायी  मूव्हीज- व्हिडिओज  पहाणे , प्रेरणात्मक साहित्यांचा वापर रोजच्या जीवनात करावा लागेल. तरच तुमची मानसिक आणि वैचारिक प्रगल्भता वाढेल.


         मित्रांनो,  उत्कृष्ट खेळाडू बनण्यासाठी च्या समस्या आणि उपाय यांचा आपण विचार केला.वरील 11 गोष्टींचा तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात अंगीकार केला आणि अंगी बाणवलात. तर तुम्हाला उत्कृष्ट खेळाडू होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. आणि ऑलिंपिक खेळांची तुमच्या मनातील भीती दूर हटवा आणि नियमित वरील अकरा गुण आपल्या अंगी बनवायला सुरुवात करा.आणि ऑलिंपिक स्पर्धांसाठी स्वतःला तयार करा.स्वतःला प्रेरणा द्या. चला,तर मग आज आत्तापासून ऑलिंपिक स्पर्धांमध्ये उतरण्यासाठी स्वतःला तयार करूया.


     ऑलिम्पिक खेळा संदर्भातील तुमच्या मनातील भीती घालवा स्वतःला ऊर्जा द्या आत्मविश्वास निर्माण करा आणि माझ्यासह या आणि अकरा गुणांचा अंगीकार करा आणि एक उत्कृष्ट खेळाडू बनण्यास तयार रहा.

      ऑलिंपिक खेळ  2025  क्रीडा स्पर्धांमध्ये माझ्या 100 खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन दाखवावे हे माझे मिशन आहे.

       माझा हा लेख वाचून नक्कीच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा न बाबतची तुमच्या मनातील भीती नक्कीच गेली असणार आहे याची मला खात्री आहे.या लेखाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. हा माझा लेख तुम्हाला कसा वाटला ? ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, प्रतिक्रिया द्या आणि काही समस्या  असतील त्याही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता.

      ऑलिंपिक खेळा संदर्भात आणखीन माहिती आणि मार्गदर्शन  पाहिजे असेल तर, माझी  'मिशन ऑलिम्पिक्स' ही कम्युनिटी जॉईन करा.खालील लिंक वर क्लिक करा https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

टिप्पण्या

  1. खूपच अप्रतिम, किती शब्दसंख्या असेल

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान मायताई
    तुम्हाला अनेक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  3. Very informative Blog, awareness is important in sports along with studies and you are doing that. Keep it up

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद सर तुम्ही खूप छान पाठींबा देता

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय