उत्कृष्ट खेळाडू बनण्यासाठीच्या जबरदस्त 13 गोष्टी
खेळासाठी किती वेळ द्यावा लागतो?
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा केव्हा भरतात?
ओलिंपिक खेळाच्या स्पर्धांमध्ये उतरण्यासाठी कोणता वयोगट असतो ?
ऑलिंपिक स्पर्धांमध्ये कोणकोणत्या खेळांचा समावेश असतो?
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा बाबत अनेक समस्या असतात , प्रश्न असतात.पण त्याची उत्तरे आपल्याला लवकर मिळतच नाहीत किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून त्या कायम समस्याच राहतात.या सर्वांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर माझा हा लेख पूर्ण वाचा.
माझे मिशन आहे की, महाराष्ट्रातील 100 मुले आणि मुली यांना ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये खेळायला उतरवणे. यासाठी मी माझा फेसबुक ग्रुप मिशन100 ऑलिंपिक गेम्स 2025 हा तयार केलेला आहे
आपण पाहतो सामान्यपणे खेळाकडे खूप दुर्लक्ष केले जाते. त्याची अनेक कारणे आहेत ती कारणे आधी आपण पाहू या -
१)ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा म्हणजे काय याबाबत अज्ञान -
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा म्हणजे काय? किंवा त्या कुठे भरतात? केव्हा भरतात?याबाबत आपल्याला काही ज्ञान नसते ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा याची ओळख अनेक पालकांना मुला-मुलींना नाही ग्रामीण आणि शहरी भागापर्यंत केवळ राज्य पातळी आणि राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धा एवढेच माहिती असते.ऑलिंपिक सारख्या उच्च पातळीवरचे स्पर्धा होतात आणि आपण त्यात सहभागी झालो तर आपण देशाचे नाव उज्वल करू शकतो तसेच आपण चांगल्या प्रकारे पैसा पण कमावू शकतो याबाबत बरेच अज्ञान आहे.
२) ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा या बाबत संभ्रम :
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा नावाने अनेक स्पर्धा भरवल्या जातात परंतु ज्या मुख्य ऑलिम्पिक स्पर्धा असतात त्याबाबत बऱ्याच लोकांमध्ये अज्ञान आहे संभ्रम आहे त्या नेमक्या कोणत्या याची माहिती नाही.
३) खेळ खेळण्याबाबत दुर्लक्ष केले जाते :
खेळाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते.शाळेतील अभ्यासा इतके खेळामध्ये लक्ष घातले जात नाही. मग काही ठिकाणी खेळाच्या बाबतीत जाणून-बुजून दुर्लक्ष होते,तर काही ठिकाणी अज्ञानामुळे दुर्लक्ष होते काहीजण अनेक चुकीच्या पूर्व ग्रहांमुळे खेळाबाबत दुर्लक्ष करतात.
४) खेळाकडे कमी महत्त्वाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाते :
खेळ हे किंवा क्रीडा क्षेत्र हे अत्यंत कमी महत्त्वाचे क्षेत्र आहे. खेळामुळे कोणतेही करियर होत नाही.खेळामुळे मुलांचे भविष्य घडत नाही. खेळ केवळ टाइमपास आहे. खेळांमध्ये खूप वेळ वाया जातो. असा ग्रह अनेक पालकांमध्ये आहे. खेळ खेळून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलो तर नक्कीच चांगले पैसे कमावू शकतो याबाबत पण बरेचसे अज्ञान आहे.
५) खेळाच्या विविध स्पर्धांसाठी पालकांची टाळाटाळ :
खेळाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ज्या वेगवेगळ्या स्तरावर आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात गावात भरवल्या जातात. त्या स्पर्धांसाठी मुलांना घेऊन जाणे, तिथे थांबणे, मुक्काम करणे, पैसे खर्च करणे या सगळ्या गोष्टींसाठी पालकांकडे वेळ नसतो किंवा पालक स्वतःहून वेळ काढत नाहीत. त्यामुळेच पालक मुलांमध्ये आवड आणि खेळाचे गुण असूनही बऱ्याच वेळेस टाळाटाळ करतात.कारण त्यामध्ये खूप वेळ वाया जातो अशी सबब देतात.
६) खेळाच्या नियमित सरावात टाळाटाळ :
खेळाचा नियमित सराव करण्यासाठी मुलांना मैदानावर घेऊन जावे लागते. मुले लहान असल्यामुळे त्यांना मैदानावर ने-आण करण्याची सर्व जबाबदारी पालकांवर येऊन पडते. त्यामुळे पालक नियमित मुलांना मैदानावर घेऊन जाणे, घेऊन येणे या गोष्टी करण्याचा कंटाळा करतात किंवा टाळाटाळ करतात.७)मुलांच्या खेळाच्या नियमित सराव आणि स्वयंशिस्तिकडे दुर्लक्ष :
कोणत्याही खेळाचा नियमित सराव केला तरच या खेळांमध्ये प्रावीण्य प्राप्त होऊ शकते त्यासाठी नियमित सराव करणे गरजेचे असते. खेळाचा नियमित सराव होतो की नाही याकडे पालक दुर्लक्ष करतात. खेळा बाबतची स्वयंशिस्त मुलांनी अंगी बनवायला पाहिजे त्याकडेही पालक दुर्लक्ष करतात.
८) खेळाच्या साधनांवर पैसे खर्च करण्यात कुचराई :
खेळाबाबत ची वेगवेगळी साधने जसे फुटबॉलचा बॉल शूज सॉक्स टीशर्ट अशी साधने जी प्रत्येक खेळासाठी वेगवेगळी लागतात. ती साधने खरेदी करणे आणि त्या साधनांचा वापर करणे गरजेचे असते. परंतु जर पालकांनी ही साधने खरेदी करण्यात कुचराई केली,टाळाटाळ केली तर मुलांना ती साधने वेळेवर मिळणार नाहीत. जेणेकरून त्यांच्या खेळाच्या सरावावर याचा परिणाम होतो.
९)खेळा बाबतच्या संस्कारांची कमतरता :
लहान मुलांना पालक जे सांगतील तसेच मुले करतात घरातील मोठी माणसे खेळाबाबत बोलत नसतील शारीरिक व्यायाम करत नसतील याबाबतच्या इतर साहित्याचा आस्वाद घेत नसतील तर मुलांवरही तसेच संस्कार घडतात आणि त्यामुळे मुले ही क्रिया पासून दूरच राहतात आपण पाहतो खेळाडूंच्या घरी खेळाडू बनतात अभिनेत्याच्या घरी अभिनेते बनतात पण जर आपण आपल्या मुलांना योग्य वयात तसे संस्कार दिले तर नक्कीच आपली मुले सुद्धा खेळाडू बनू शकतात.
१०) खेळा बाबतच्या स्वयम् प्रेरणेची कमतरता :
आपण आपल्या मुलांच्या मनात खेळाबाबत ची स्वयंप्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे मुलांनी साहित्य घेऊन खेळणे गरजेचे आहे आणि तसे संस्कार आपण लहानपणापासूनच दिले पाहिजे त्यासाठी तुम्हाला स्वतःहून सहभाग घेऊन त्यांच्याकडून सराव करून घ्यावा लागतो.
११) लहान वयातच खेळाची सवय लावणे गरजेचे परंतु तसे होत नाही :
आपण आपल्या मुलाच्या करिअरबाबत त्याच्या वयाच्या १०-१२व्या वर्षांनंतरच विचार करायला सुरुवात करतो. शेजारचा एखादा मुलगा एखाद्या खेळा मध्ये पुढे चाललेला पाहून आपण ही आपल्या मुलाला खेळांमध्ये टाकतो मग तो खेळ आपल्या मुलाला आवडतो की नाही याचा विचार आपण करत नाही तर शेजारचा मुलगा खेळतो म्हणून आपण त्याला तोच खेळ खेळायला लावतो,म्हनजेच आपण आपले निर्णय त्याच्यावर लादतो.परंतु 12 वर्षानंतर म्हणजेच तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो, त्यासाठी लहानपणापासून वयाच्या ३ऱ्या वर्षापासूनच खेळाची सवय लावणे गरजेचे असते.
१२) खेळाच्या निवडीबाबत संभ्रम :
अनेक पालकांमध्ये खेळाचा कोणता प्रकार आपण आपल्या मुलासाठी निवडला पाहिजे याबाबत बराचसा गोंधळ असतो.जर शेजारचा मुलगा फुटबॉल खेळत असेल तर आपण आपल्या मुलाला पण फुटबॉल खेळायला लावतो आणि जर शेजारचा मुलगा बॅडमिंटन खेळत असेल तर आपणही आपल्या मुलाला बॅडमिंटन खेळायला लावतो. अशाप्रकारे आपण आपल्या मुलावर आपले निर्णय लादत असतो परंतु त्याची आवड कोणत्या खेळा मध्ये आहे किंवा कोणत्या खेळाकडे जास्त कल आहे याचा विचार आपण करत नाही.
१३)खेळाला नेहमीच दुय्यम स्थान :
अशा अनेक समस्या असल्या तरीही, आपण जर एका विशिष्ट खेळांमध्ये मुलांची आवड निर्माण करण्यासाठी खालील उपाययोजना केल्या किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपली मुले उत्कृष्ट खेळाडूकडे मार्गक्रमण करतील त्या गोष्टी आपण पाहूया :
१) ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा बाबत माहिती :
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा दर चार वर्षाला भरतात. मुलांना या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांची तयारी करण्यासाठी वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच सुरुवात करावी लागते ऑलिंपिकच्या अगोदर आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तिथे पात्र होणे गरजेचे असते. त्यानंतरच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होता येते या क्रीडा स्पर्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये दर चार वर्षांनी होतात.
२) ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धा :
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा या जागतिक पातळीवर भरवल्या जातात. अनेक देशाच्या खेळाडूंचा सहभाग असतो.आणि अत्यंत जीवघेणी स्पर्धा असते त्यामुळे आपल्या मुलांना लहानपणापासूनच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेची तयारी करून घेणे गरजेचे असते.आपण पाहतो की ,जेवढे ऑलिम्पिक खेळाडू आतापर्यंत झाले त्यांनी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासूनच खेळाचा सराव सुरू केलेला होता.सातत्याने खेळाचा सराव सुरू केल्याने नक्कीच ऑलिम्पिकचा मार्ग हा सुकर होतो.
३) मुलांच्या खेळाच्या आवडीवर भर द्यावा :
४) खेळामध्ये सुद्धा करिअर करता येते :
जर खेळाचा लहानपणापासूनच नियमित सराव केला तर खेळाच्या अनेक स्पर्धांमध्ये मुलांना विशेष प्राविण्य मिळते.आणि खेळाडू म्हणून एका चांगल्या प्रकारे करिअरही करू शकता येते.खेळाडू म्हणून राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून विशेष प्रावीण्य मिळवल्यास राज्य शासनाची स्कॉलरशिप तसेच केंद्र शासनाची ही स्कॉलरशिप मिळते.तसेच खेळाडूंसाठी चे निधी पण प्राप्त होतात म्हणून आपल्या मुलांना खेळा मध्ये सुद्धा करिअर करता येते.
५) वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा मध्ये सहभागी होण्यास टाळाटाळ करू नये :
आंतरजिल्हा राज्य राष्ट्रीय अशा अनेक वेगवेगळ्या स्तरावरील क्रीडा स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. त्यासाठी बाहेर गावी जाऊन तिथे राहणे आणि पैसे खर्च करणे त्यासोबतच पालकांना नोकरीतून वेळ काढणे या सगळ्या तांत्रिक गोष्टी असल्यामुळे अनेक पालक क्रीडा स्पर्धांना जाण्यास टाळाटाळ करतात. परंतु जर आपल्या मुलांनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला नाही, तर त्यांना प्रोत्साहन मिळणार नाही.त्यामुळे क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे तर पालकांनी थोडेसे वेळ काढून आपल्या मुलासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवणे आवश्यक असते
.
६) खेळाच्या सरावात नियमितपणा :
७) खेळाच्या नियमित सरावासाठी मैदानावर जाणे गरजेचे :
खेळाचा नियमित सराव जर आपल्या मुलांकडून करवून घ्यायचा असेल तर पालकांनी आपल्या मुलांना मैदानावर घेऊन जाणे गरजेचे आहे ,मैदानाची आवड निर्माण करून देणे गरजेचे आहे, आणि तो नियमितपणा कायम ठेवला तरच मुलांमध्ये मैदाना विषयी आणि खेळाविषयी हळूहळू आवड निर्माण होईल. त्यासाठी पालकांनी स्वतःहून वेळ काढून मुलांना मैदानावर घेऊन गेले पाहिजे.८) खेळाचे साहित्य खरेदी करणे आणि ते दृष्टिक्षेपात ठेवणे :
वेगवेगळ्या खेळाचे वेगवेगळे साहित्य उदा. बॅट-बॉल स्किपिंग रोप अशा प्रकारचे साहित्य मुद्दाम होऊन पालकांनी खरेदी करून घरी आणावे. आणि मुलांना सतत दिसेल अशा ठिकाणी , अशा जागेवर ठेवावे, म्हणजे मुले त्याकडे आकर्षित होतील .त्यांना ते साहित्य सतत दिसल्यामुळे त्या साहित्य सोबत ते साहित्य घेऊन किमान खेळायला सुरुवात करतील अशाप्रकारे साहित्य खरेदी करून ते दृष्टिक्षेपात ठेवणे गरजेचे आहे.
९) खेळाबाबत चर्चा होणे गरजेचे :
घरातील मोठ्या मंडळींनी खेळाबाबत खेळाच्या सामन्यांबाबत मग फुटबॉल असो हॉलीबॉल, क्रिकेट,अथलेटिक्स अशा वेगवेगळ्या खेळांच्या सामन्या बाबत सतत चर्चा करणे गरजेचे आहे .खेळाचा विषय घरांमध्ये काढून त्यावर वादविवाद करणे खेळाडूंचे सामने, खेळाडूची माहिती,या विषयीही घरातील व्यक्तींनी बोलले तर मुलांना खेळाबाबत माहिती मिळेल आणि खेळाबाबत आकर्षण आणि आवड निर्माण होईल.
१०) खेळाची सवय लावावी :
मुलाच्या ३ऱ्या ,४थ्या वर्षापासूनच खेळांची साधने, कोणते खेळाडू कोणता खेळ खेळतात, कोणता खेळ कुठे खेळला जातो, या बाबतची वेगवेगळी चित्रे ,प्रतिकृती घरामध्ये लावली तर मुलांच्या मनावर त्याचे चित्र प्रतिकृती याबाबत कुतूहल निर्माण होईल. तसेच खेळाडूंची प्रतिकृती खेळा संदर्भातील चित्रे आणि खेळाची साहित्य जर घरामध्ये सतत ठेवले तर खेळाची मुलांना ओळख होईल आणि खेळाबाबत आकर्षण पण वाटेल.
११) खेळाच्या निवडीबाबत संभ्रम :
पालकांना आणि मुलांना कोणता खेळ निवडावा याबाबतच खूप संभ्रम असतो. आशियाई आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये कोणकोणत्या खेळांचा समावेश आहे, त्याच् खेळाची निवड केली पाहिजे. परंतु आपण असे न करता आपल्याला खेळाच्या निवडीबाबत माहिती नसल्यामुळे नको तो खेळ निवडून बसतो आणि त्याचा सराव सुरू करतो.
१२) मोबाईल आणि टीव्ही यावर निर्बंध असावा :
आपल्या मुलांना मोबाईल पाहणे, मोबाईलवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे यासंदर्भात निर्बंध लादने गरजेचे असते. आपण पाहतो तासन्तास मुले मोबाईल आणि टीव्ही च्या आहारी गेलेली आहेत त्यासाठी हळूहळू त्यांची ही सवय बंद करावी तरच त्यांना खेळाकडे वळवता येईल. आणि मुलांना जास्तीत वेळ मैदानावर घेऊन जावे.थोडक्यात आपल्या मुलांना लहानपणापासूनच सोशल मीडिया पासून जर दूर ठेवले तर त्यांना मैदानाकडे हळूहळू वळवता येईल व खेळाचे आवड त्यांच्या मनामध्ये निर्माण करता येईल.
१३) पौष्टिक अन्नपदार्थ :
आपण आपल्या मुलांना किती पौष्टिक अन्नपदार्थ देतो याचा अगोदर थोडा विचार करावा आपली मुले वेफर्स, पॉपकॉर्न ,पावभाजी ,वडापाव अशा प्रकारची रस्त्यावरील आणि चटक-मटक अन्नपदार्थ खाण्यात व्यस्त आहेत. परंतु जर असे पदार्थ दिले तर त्यांच्या शरीराची व्यवस्थित वाढ होणार नाही. जेणेकरून ते खेळांमध्ये त्यांच्या शरीरात ताकद येणार नाही. म्हणून व्यायाम सोबतच मुलांना पौष्टिक अन्नपदार्थ देणे गरजेचे आहे गरजेचे आहे.तर मित्रांनो, अशा प्रकारे अनेक समस्या असल्या तरीही सातत्याने आपल्या खेळाचा सराव केला वरील गोष्टींचा अवलंब केला तर निश्चितच मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण होऊन खेळाडू तयार होतील.
माझा हा लेख तुम्हाला कसा वाटला त्याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. माझा हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ....
- अधिक माहितीसाठी माझा फेसबूक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक्स गेम्स 2025 जॉईन करावा.त्याची लिंक खाली दिलेली आहे.
https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share





















खूपच छान झालाय. अभिनंदन.
उत्तर द्याहटवातुमच्या पुढच्या ब्लॉगची आतुरतेने वाट पाहत आहे
खूपच छान उत्तम प्रकारे मांडणी आहे.
उत्तर द्याहटवाखूपच छान ब्लॉग
उत्तर द्याहटवाKhoop chan mahiti
उत्तर द्याहटवाThank u पद्मजा ताई
हटवाब्लॉग खूप छान झालाय, चांगली उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..
उत्तर द्याहटवाKhupach chhan
उत्तर द्याहटवाBlog खूपच छान, डिटेल आणि जबरदस्त लिहिला आहे. Olympic बद्दल बरीच उपयोगी माहिती मिळाली.
उत्तर द्याहटवा