ह्या जबरदस्त ५ उपायांनी मुलांमध्ये खेळाची गोडी निर्माण होईल
आपल्या मुलांना खेळात कशी आवड निर्माण करायची?
त्यांच्या खेळाच्या सरावात सातत्य कसे टिकवायचे?
खेळाबाबत ची गोडी कायम कशी टिकवायची?
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असतील तर माझा हा लेख पूर्ण वाचा.
माझे मिशन आहे की,येत्या 2025 च्या ऑलिंपिक खेळाच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर मुले पाठवायची आणि त्याकरिता मी माझा फेसबुक ग्रुप मिशन100 ऑलिंपिक गेम्स 2025 हा निर्माण केलेला आहे त्याकरिता मी सतत कार्यरत आहे.
प्रत्येक पालकांना वाटत असते की आपली मुले खेळाडू खायला हवी खेळाच्या प्रॅक्टिस साठी मुलांना जोर जबरदस्ती पण केले जाते परंतु खेळाच्या प्रॅक्टिसमध्ये सर्वांमध्ये सातत्य टिकवण्यासाठी आणि त्या खेळांची आवड आणि गोडी निर्माण करण्यासाठी काय काय उपाय करायला पाहिजेत. चला तर मग त्या जबरदस्त ५ उपायांना जाणून घेऊया.
१)खेळाबाबत वातावरण निर्मिती :
कोणत्याही गोष्टीसाठी घरातूनच वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे. मग ती कला असेल शिक्षण असेल किंवा खेळ असेल खेळाबाबत वातावरण निर्मिती कशी करायची? त्यासाठी तुम्हाला खेळाच्या बाबत घरात सतत चर्चा करावी लागेल. खेळाबाबत वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करावी लागेल. मग खेळाचे वेगवेगळे प्रकार असतील,तो प्रकार कसा खेळला जातो, त्यामध्ये किती स्ट्रेंथ लागते, ताकद किती लागते, स्टॅमिना किती लागतो,कोणता खेळ कोणत्या शरीराच्या कोणत्या अवयवांनी खेळला जातो,अशा वेगवेगळ्या पैलूंवर तुम्हाला सतत चर्चा करावी लागेल. त्यामुळे घरात खेळाबाबत वातावरण निर्मिती होऊ लागेल आणि मुलांना खेळाचीआवड निर्माण होईल.
२) शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्याबाबत चर्चा :
आपल्या मुलांना जंक फूड्स, पॉपकॉन,केक, पिझ्झा अशा प्रकारचे तेलकट हॉटेलमधील पदार्थ यांचे आकर्षण खूप जास्त असते.परंतु या पदार्थांमुळे शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होत असतात आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी ड्रायफ्रुट्स प्रोटीन युक्त पदार्थ आणि साधं सत्वयुक्त जेवण जेवण्याची सवय लावली तर निश्चितच त्यांची शारीरिक तंदुरुस्ती टिकून राहील जेणेकरून खेळाच्या मैदानात ते मागे पडणार नाहीत. शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी कोणत्या प्रकारची अन्न पदार्थ खायला पाहिजेत यासंदर्भात घरात सर्व नियम पाळणे आणि चर्चा होणे गरजेचे आहे.
३) पालकांचा सक्रिय सहभाग :
आपल्या मुलांना खेळाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांनीसुद्धा आपल्या मुलांसोबत वेळ काढून खेळायला हवे. मुलांना खेळांमध्ये आवड निर्माण करून देणे हे आपले प्राथमिक कर्तव्य येते. मुलं जो खेळ खेळतात तोच खेळ आपण त्यांच्यासोबत खेळला तर मुलांना अजून जास्त आनंद होईल. आणि पालकांच्या सक्रिय सहभागामुळे मुलांचा उत्साह अजून वाढेल आणि त्या खेळाबाबत मुलांच्या मनात गोडी निर्माण होईल. आणि मुलं वारंवार खेळ खेळू लागतील अशाप्रकारे त्यांच्या मनात खेळाबाबत आवड निर्माण होईल.
४) आपले निर्णय मुलांवर न थोपवणे :
पालकांनी आपल्या मुलांवर आपले स्वतःचे निर्णय मग ते अभ्यासाबाबत असतील किंवा खेळा बाबतीत असतील तर ते जबरदस्ती थोपवू नये. मुलाने खेळाडू बनायचे की डॉक्टर इंजिनिअर बनायचे हे मुलांना निर्णय घेण्यास तयार करा त्यांच्यातील निर्णय क्षमता पालकच निर्माण करू शकतात. आपल्या मुलांना ज्या गोष्टी मध्ये आवड आहे ती गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे करू द्या.मात्र सोशल मीडिया पासून त्यांना दूर ठेवा यामुळे मुलांमध्ये स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची ताकद येईल मग ते खेळाच्या बाबतीत सुद्धा ते स्वतः निर्णय घेऊ शकतात त्यांना एखादा खेळ आवडत असेल तर त्याकडे पालकांनी लक्ष देऊन त्या खेळासंदर्भात अजून जास्त प्रगती करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांना खेळाची गोडी निर्माण होईल.
५) खेळाच्या सरावातील सातत्य :
आपण आपल्या मुलांना खेळ निवडून खेळाचा सराव करण्यास पाठवतो. मात्र खेळाबाबत सातत्य टिकून राहत नाही, ही सगळ्यात मोठी समस्या आहे. त्यासाठी पालकांना थोडसं सक्रिय व्हावे लागेल. आपल्या मुलांच्या खेळाच्या सरावातील सातत्यात खंड येऊ नये यासाठी पालकांनी मुलांचा रोज पाठपुरावा करणे, मुलांना खेळाबाबत छोटी-छोटी ध्येय रोज ठरवून देणे, खेळाबाबत किती प्रगती केली आहे, याबाबत अहवाल घेणे, आपली मुलं कुठे कमी पडत आहेत, याची पडताळणी करणे अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांच्या खेळाच्या सातत्यात खंड पडणार नाही आणि मुले सातत्याने खेळाचा सराव करतील. जर तुम्ही असा होमवर्क घेतला तर मुलांमध्ये खेळाबाबत आणि खेळाच्या सातत्यबाबत आवड निर्माण होईल.
अशा जबरदस्त पाच उपायांनी आपल्या मुलांना खेळाची सातत्याने आवड निर्माण होईल आणि त्यांच्या खेळाच्या सरावात सातत्य टिकून राहील खेळाचे सातत्य टिकवण्यासाठी पालकांची सगळ्यात मोठी जबाबदारी येते आणि हळूहळू मुले खेळात प्रगती करू लागतील.
हा माझा लेख पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏
हा माझा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा.
अजून काही जास्त माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा.👇
https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share







अतिशय सुंदर लिखाण
उत्तर द्याहटवायाचा नक्कीच सर्वांना फायदा होईल