ह्या जबरदस्त ६ उपायांनी तुमच्या मुलांना खेळाची आवड लागेल

 

आपल्या मुलांना खेळाची आवड कशी निर्माण करायची ?  

आपली मुले मैदानावर खेळायला टाळाटाळ करतात ?

फक्त सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आहेत का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवे असतील तर हा माझा लेख पूर्ण वाचा. माझे मिशन आहे येत्या २०२५ च्या ऑलिंपिक खेळा च्या स्पर्धा मध्ये शंभर मुले पाठवायची आहेत आणि त्याकरिता मी माझा फेसबूक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक्स गेम्स 2025 हा तयार केलेला आहे.


प्रत्येक पालकांना हे वाटत असते की माझी मुले पण खेळाडू बनायला हवेत परंतु त्यांना हेच कळत नाही की आपण त्यांना खेळाची सुरुवात कशी किंवा आणि कशाप्रकारे करायला हवी.चला, तर मग ह्या सहा उपायांनी तुमच्या मुलांना खेळाची आवड नक्की निर्माण होईल ते सहा उपाय पाहूयात.

१) मुलांमध्ये मैदानाची आवड निर्माण करणे:

कोणताही खेळ खेळण्यासाठी मैदानावर जाणे गरजेचे असते आणि या मैदानाची आवड मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी तुम्हाला मुलांना रोज मैदानावर घेऊन जावे लागेल. पालकांनी स्वतः वेळ काढून मुलांना बाकी सर्व गोष्टींपासून दूर ठेवून मैदानावर घेऊन जाणे गरजेचे आहे. त्या सोबत रोज मैदान दाखवणे, मैदानाची माहिती देणे त्यामुळे मुलांमध्ये मैदानाचे आवड नक्कीच निर्माण होईल.


२) स्वयंशिस्तिकडे लक्ष:

 स्वयंशिस्त म्हणजेच मुलांना लवकर उठणे आणि लवकर रात्री झोपणे इथून सुरुवात होते.मुले टीव्ही मोबाईल पाहत रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि सकाळी उशिरा उठतात, या सर्वांचा परिणाम त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावर होतो. भूक न लागणे, शारीरिक कमजोरी, सतत आजारी पडणे, लवकर झोप न लागणे, अशा पण समस्या आपल्या मुलांमध्ये निर्माण होऊ लागतात.त्यामुळे मुलांना वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे या सवयी सुरुवातीला लावणे खूप गरजेचे आहे.यालाच स्वयंशिस्त असे म्हणतात. या स्वयंशिस्तीमुळेच मुलांना ग्राउंड ची आवड लागेल लवकर उठणे आणि लवकर झोपण्याची सवय लागल्यावर हळूहळू खेळाची पण आवड लागेल.


३) मोबाईल टीव्ही पासून दूर ठेवणे:

 आपल्या मुलांना दिवसातून किती वेळा टीव्ही पाहायचा या बाबत एक विशिष्ट तास ठरवून द्या तेवढ्याच तासात टीव्ही पाहण्याचा कार्यक्रम करा.अन्यथा टीव्ही आणि मोबाईल या गोष्टी बंद करून ठेवा. सुरुवातीला मुलांना सवय लावणे अवघड जाईल. परंतु नंतर हळूहळू सवय लागेल आणि त्यामुळे मुले घरातच का होईना,खेळ खेळतील, नाचतील, आणि त्यांचे मन मोकळे राहील. यामुळे हळूहळू मुलांना खेळाकडे वळवता येईल


.

)खेळाच्या साहित्याची ओळख करून देणे :

 पालकांनी घरांमध्ये खेळाच्या संबंधित वेगवेगळे साहित्य मुद्दाम हून घरात आणून ठेवणे आणि त्या साहित्याची मुलांना ओळख करून द्यावी. खेळाच्या साहित्यसोबत कसे खेळायचे याची ओळख करून देणे खेळाच्या साहित्याची हळूहळू मुलांमध्ये आवड निर्माण होईल आणि नक्कीच मुले त्यांना जे जास्त आवडते तेच खेळाचे साहित्यासोबत खेळतील आणि त्या साहित्य सोबत आपुलकी निर्माण होईल तो खेळ ते खेळू लागतील. खेळाच्या साहित्यपासूनच खेळ,खेळाचे साहित्य ,खेळाडू यांची हळूहळू उत्कंठा वाढेल व हळूहळू मुले खेळाचे साहित्य घेऊन घराबाहेर पडू लागतील, मैदानावर येतील आणि खेळ खेळू लागतील.


५) खेळाचे सामने पाहणे :

विविध खेळांचे विविध प्रकारची सामने वेगवेगळ्या ठिकाणी भरवले जातात.खेळाचे सामने पाहण्यासाठी आपल्या घराजवळ एखादे प्लेग्राउंड असेल तिथे खेळाचे सामने भरत असतील तर नक्कीच ते सामने पाहण्यासाठी आवर्जून आपल्या मुलांना सोबत घेऊन जावे. खेळाच्या सामन्या मुळे दृश्य स्वरूपामुळे मुलांच्या मनावर त्याचा लवकर परिणाम होतो. त्या एका खेळाच्या साम्यामुळे मुलांचे मन खेळाकडे वळवले जाते. त्यांना सतत असे खेळाचे सामने दाखवले तर नक्कीच मुलांच्या मनात खेळाच्या सामन्याबद्दल हळूहळू खेळाबद्दल पण आवड निर्माण होईल.


६) खेळाडूंची ओळख करून देणे :

खेळाच्या सामन्यामुळे मुलांना विविध खेळांची माहिती होईल खेळांची आवड होईल त्यानंतर खेळाच्या विविध खेळाडूंची ओळख करून दिल्यावर नंतर हळूहळू खेळाडूंची पण ओळख करून द्यावी.खेळाडूंची चित्रे,व्हिडीओज, मुव्हीज यांचा वापर तुम्ही करू शकता. या गोष्टींचा वारंवार वापर करा मग मुलांना खेळ आणि त्या संबंधित वेगवेगळे खेळाडू अशा दोन्ही गोष्टींची ओळख होऊ लागेल. खेळाडूंचे आत्मचरित्रे घरात मोठ्या आवाजात लावणे, व्हिडिओ दाखवणे, खेळाडूवरील पिक्चर दाखवणे अशा उपायांनी मुलांच्या मनावर खेळाबाबत संस्कार करता येतील. त्यांना खेळात रुची निर्माण होऊ लागेल आणि निश्चितच खेळाडू यांची ओळख मुलांना होईल.


अशा जबरदस्त सहा उपायांनी आपण आपल्या मुलांच्या मनाची तयारी खेळाडू होण्याकडे केली. तर निश्‍चितच मुलांमध्ये खेळा बाबत आवड निर्माण होईल,आणि हळूहळू मुले खेळाकडे वळू लागतील. खेळ खेळतील, आणि खेळाडू बनतील.

माझा लेख पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद...🙏🙏

 हा माझा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा.


अजून काही जास्त माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप जॉईन करा खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा.👇

https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय