पुढील दिवाळीपर्यंत आपल्या मुलांना सुदृढ आणि निरोगी बनवा या 5 टिप्स वापरुन
नमस्कार, दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!!!!
दिवाळी म्हटलं की फटाक्यांची अतिषबाजी, फराळाचा खमंग सुवास, पाहुण्यांची रेलचेल, लहानांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत उत्साहच उत्साह!!!!
तुम्ही या दिवाळीत आपल्या मुलांना फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काय करत आहात?
आपली मुले पुढील येत्या दिवाळीपर्यंत तंदुरुस्त राहण्यासाठी सुदृढ राहण्यासाठी तुम्ही काय प्लॅन केलेला आहे?
या सर्वांची उत्तरे/प्लॅनिंग तुमच्या मनात घोळत असतील, तर नक्कीच माझा हा ब्लॉग पूर्ण वाचा.तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळणार.
मी माया दणके,माझे मिशन आहे येत्या 2025 च्या ऑलम्पिक खेळांमध्ये महाराष्ट्रातून शंभर मुले पाठवणे त्यासाठी मी कार्यरत आहे.
आपण आपल्या मुलांसाठी पुढील येत्या दिवाळीपर्यंत तंदुरुस्त उत्साही आणि सुदृढ राहण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागेल.
१) दिवाळी पहाटेचा आस्वाद घ्या :
आपण आपल्या मुलांना उशिरापर्यंत झोपण्यासाठी मुभा दिलेली आहे गेली आठ महिने झालं. आपल्या मुलांना आपल्या सोबतच दिवाळी पहाट पाहण्यासाठी पहाटे उठवायला सुरुवात करा.या दिवाळी पहाटेचा आनंद घ्या. प्रसन्न, सुंदर, सकाळचा अनुभव घ्या. दिवाळीच्या पाच दिवसांच्या पहाटे उठण्याच्या सवयीमुळे आपल्या मुलांना पहाटे उठण्याची सवय लागेल. त्यामुळे निश्चितच आपली मुले रात्री पण लवकर झोपतील ही सवय दिवाळीच्या निमित्ताने अंगिकारा. त्यानिमित्ताने लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही सवय लागेल.
२)घरातील साफसफाईचा आस्वाद :
आपण दिवाळीनिमित्त घरातील साफसफाई करतो. घरातील साफसफाई करत असताना आपण आपल्या मुलांना सोबत घेऊन साफसफाईचा आनंद अनुभवू शकता. ती साफसफाई करताना नात्यातील गोडवा आपोआपच दृढ होईल. शिवाय साफसफाई करताना ची होणारी शरीराची हालचाल आपल्यासाठी व आपल्या मुलांसाठी खूप फायद्याची आहे.जेणेकरून शारीरिक कसरत पण होईल आणि मुले आनंदी उत्साही राहतील आणि अशाप्रकारे शारीरिक कसरतकडे तुम्ही वळू शकता.
३) खेळाबाबत पिक्चर पहा :
दिवाळीनिमित्त सर्व नातेवाईक पाहुणेरावळे एकत्र आलेले असतो.घरातील कामे आटोपून खेळाबाबत चा एक सुंदरसा पिक्चर सर्वांनी मिळून पाहिला, तर घरातील प्रत्येकाच्या मनात याबाबतचा उत्साह आकर्षण वाढायला सुरुवात होईल. सर्व जण मिळून खेळाबाबत चा पिक्चर पाहिल्यामुळे मुलांना एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती होईल. शिवाय दिवाळीमध्ये अभ्यासाला पण सुट्टी असेल.त्यामुळे मुलांकडे बराच वेळ असतो आणि त्या वेळेचा फायदा पण घेता येईल. दिवाळीचे रोज पाच दिवस हा उपक्रम केला तर निश्चितच खेळांची एक वेगळी प्रतिमा घरातील प्रत्येक सदस्याच्या मनात निर्माण व्हायला सुरुवात होईल.
४) दिवाळी फराळ पचवण्यासाठी ची कसरत :
आपण दिवाळीनिमित्त नवनवीन फराळाचे पदार्थ तयार करतो. निश्चितच काही पदार्थ पचायला जड असतात. परंतु ते पदार्थ पचवण्यासाठी जर आपण शारीरिक कसरत करायला सुरुवात केली, तर निश्चितपणे ते पदार्थ आपल्याला सहजपणे पोहचू शकतात. आपण आपल्या घरात या दिवाळीनिमित्त एक नवीन उपक्रम चालू करू शकतो की दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी सकाळी किमान एक तास आपण स्वतः व आपल्या मुलांना घेऊन आपण शारीरिक कसरत करायला सुरुवात करा शिवाय या थंडीच्या दिवसांमध्ये शारीरिक कसरत केल्याने आपले शरीर स्वास्थ्य सुदृढ राहते.
मी माझ्या मिशन ऑलिम्पिक या फेसबुक ग्रुप वर दर रविवारी 5 km.Sunday Run आयोजित करते.आपण यामध्ये सहभागी होऊन आपले शारीरिक स्वास्थ्य सुदृढ ठेवू शकता.
५) खर्चावर निर्बंध :
खेळाबाबत चे साहित्य म्हणजेच उदा. बॅडमिंटनची रॅकेट, फुटबॉलचा बॉल, स्किपिंग रोप वगैरे.
मित्रांनो या दिवाळीमध्ये आपण आपल्या घरामध्ये खेळाबाबत वातावरण निर्मिती करूया जेणेकरून येत्या दिवाळीपर्यंत आपली मुले कोणतातरी एक खेळ चांगल्याप्रकारे खेळतील.
माझा हा लेख तुम्हाला कसा वाटला निश्चित प्रतिक्रिया द्या. माझा लेख पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
आणखीन काही माहिती पाहिजे असेल, तर निश्चितपणे माझा फेसबुक ग्रुप मिशन100 ऑलिम्पिक गेम्स 2025 हा जॉईन करा. या ग्रुप ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे.👇
https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share







Khup chan ....mulansathi he sarvani karayla pahije
उत्तर द्याहटवाThank you madhura
उत्तर द्याहटवाफार फार छान. माहिती दिली mam
उत्तर द्याहटवाCorona mule mulana gharat je boring pana aalay to ghalvnya sathi chan upay bhetle
Dhanyawad mam
फार फार छान. माहिती दिली mam
उत्तर द्याहटवाCorona mule mulana gharat je boring pana aalay to ghalvnya sathi chan upay bhetle
Dhanyawad mam
Thanks Sonal
उत्तर द्याहटवाNischitach sarvanni he kela pahije...
उत्तर द्याहटवाखूपच छान मार्गदर्शन
उत्तर द्याहटवा