दुर्दम्य इच्छा शक्ती वाढविण्यासाठीचे ६ उपाय
Pain is Temporary,Quitting lasts forever.
खेळाडूंनो तुमच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती ची कमतरता आहे का?
खेळामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देण्याची मनापासून इच्छा आहे परंतु कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडत असल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या खेळाच्या परफॉर्मन्स वर पडत आहे का ?
खेळाच्या सरावा अगोदरच अनेक नकारात्मकता आपल्या मनात घर करत आहे का?
अशा अनेक समस्यांना तुम्ही सामोरे जात असाल तर नक्कीच हा लेख तुमच्यासाठीच......
मी माया दणके माझी मिशन आहे तिथे 2025 च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर मुले पाठविणे.
मित्रांनो आपण अनेक चांगल्या गोष्टी करण्याची आपल्या मनात नेहमी इच्छा बाळगतो परंतु नेहमीच ते काम हाती घेतल्यानंतर आपल्या मनात नकारात्मक विचार आणि घर केलं जातं जर मी हा खेळ निवडला तर माझ्या शरीराला कोणत्या भागाला जास्त इजा होऊ शकते तो खेळ निवडला तर मला पुढे परफॉर्मन्समध्ये कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागेल अशा अनेक नकारात्मक विचार आपल्या मनात अगोदरच येतात तर माझ्या ह्या पाच उपायांमुळे नक्कीच तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती वाढेल.
चला तर मग ते पाच उपाय कोणते ते पाहू या....
१)नेमका कोणता खेळ निवडायचा ते आधी ठरवा :
मित्रांनो आपल्याला हेच माहिती नसते की माझ्या आत मध्ये कोणत्या खेळा संदर्भात टॅलेण्ट आहे. कोणता खेळ चांगल्या प्रकारे मी खेळू शकतो.मी कोणत्या प्रकारच्या खेळाला जास्तीत जास्त वेळ द्यायला पाहिजे की जेणेकरून मी त्याच्यामध्ये परफेक्ट होऊ शकतो. एकावेळी अनेक क्लासेस अनेक ट्युशन्स अनेक वेगवेगळ्या कलागुणांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु या सगळ्या गोष्टींमुळे सिंगल माइंडेड नेस ने आपण एकाच खेळावर फोकस करू शकत नाही त्यासाठी नेमका कोणता खेळ तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे खेळता येतो. त्याच खेळावर तुम्ही फोकस करा. आणि 80/20 चा नियम वापरून त्या खेळासाठी जास्तीत जास्त वेळ द्या. खेळ हा असा निवडायला पाहिजे की ज्या खेळाला इंटरनॅशनल आणि ऑलिम्पिक खेळामध्ये त्या खेळाला समाविष्ट केलेले आहे.
2) ध्येय ही कागदावर लिहा :
तुम्ही आता कोणता खेळ निवडायचा तो खेळ निवडल्यानंतर त्या खेळा संदर्भात तुम्हाला कोणत्या लेव्हलपर्यंत पोहोचायचे आहे जसे नॅशनल, इंटरनॅशनल,एशियन गेम्स,ऑलिंपिक गेम्स यापैकी तुम्हाला कोणत्या क्रीडा स्पर्धांपर्यंत पोहोचायचे आहे ते अगोदर कागदावर उतरवा. कागदावर लिहिल्यानंतर ते ध्येय दिवसातून किमान वेळेस कागदावर लिहा. कागदावर लिहिल्यानंतर तुम्ही तुमच्या मेंदूला दिशा देता आणि त्याप्रमाणे तयारी करण्यास तुम्ही स्वतःला भाग पाडत असता. जर समजा तुम्हाला ऑलिंपिक गेम्स 2025 मध्ये उतरायचे आहे तर नक्कीच तुम्हाला आत्तापासून पाच वर्षाचं आणि पाच वर्षातील प्रत्येक दिवसाचं ध्येय हे कागदावर लिहावं लागेल.
मी रोज सकाळी उठल्यानंतर माझे ध्येय ही कागदावर लिहीत असते.
३) प्रत्येक दिवसाचं ध्येय ठरवा :
मित्रांनो खेळांच्या स्पर्धापेक्षा खेळाचा सराव खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी प्रत्येक दिवसाचं ध्येय ठरवणे गरजेचे आहे. प्रत्येक दिवसाच्या ट्रेनिंगनेच तुम्ही त्या स्पर्धां पर्यंत पोहोचू शकता.आणि हीच ट्रेनिंग तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवते.त्यासाठीच स्पर्धेपेक्षा ट्रेनिंगला महत्त्व जास्त आहे. प्रत्येक दिवसाची ट्रेनिंग ही तुमची शेड्युल्ड असायला पाहिजे त्या दिवसाची तेवढी ट्रेनिंग पूर्ण झाली आहे की नाही त्याचा आढावा घेणे सुद्धा गरजेचे आहे. प्रत्येक दिवसाचे ध्येय हेच तुम्हाला तुमच्या मुख्य ध्येयापर्यंत पोहोचू शकते. कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा माझा चांगला जायला पाहिजे यासाठी रोज मेहनत करा.
उदा. एखादा athelete आज 1000 मीटर रनिंग sprint मध्ये 20.5 sec. हा टाइमिंग नोंदवत असेल तर नक्कीच त्याला उद्याच्या शेड्युलमध्ये 20.5 sec. पेक्षा कमी टाइमिंग कसा येईल याची नोंद करण्यासाठी त्याला उद्याचे schedule त्याप्रमाणे करावे लागेल.
४) स्वतःचे परीक्षण करा :
स्वतःचे परीक्षण करणे म्हणजेच स्वतःला मी कुठे कमी पडत आहे, मी अजून काय करायला पाहिजे की, जेणेकरून माझा खेळातील परफॉर्मन्स यापेक्षा अजून कशा पद्धतीने चांगला होईल आणि मी अजून कोणत्या वेगळ्या प्रकारे प्रयत्न करायला पाहिजे यासारखे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा म्हणजेच स्वतःचे परीक्षण करा.मी कुठे कमी पडत आहे, मी सरावात कमी पडत आहे का? मी न्यूट्रिशन मध्ये कमी पडत आहे का? मी strength मध्ये कमी पडत आहे का? मी स्टॅमिना मध्ये कमी पडत आहे का?की अन्य कोणत्या ठिकाणी मी कमी पडत आहे? या सगळ्यांचं निरीक्षण, परीक्षण स्वतःच करा नक्कीच उत्तरे तुमच्याकडेच मिळतील. आणि ती उत्तरे तुम्हाला मिळाल्यामुळे तुमचा खेळातील परफॉर्मन्स अजून चांगला सुधारेल.
Michelle Phelps हा swimmer ऑलिम्पिक स्पर्धेत २३ गोल्ड मेडल जिंकतो. तो फक्त स्वतःचे परीक्षण करून स्वतःचेच रेकॉर्ड स्वतः तोडतो.
५) कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी ठेवा :
कधी खेळाच्या एखाद्या स्पर्धेमध्ये यश मिळते तर कधी खुप लवकर अपयशी होतो. परंतु आपली मानसिकता मानसिक खच्चीकरण तिथे होऊ देऊ नका. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीची आपली मानसिक तयारी किती आहे तेच त्याचीच परीक्षा हे छोटे-मोठे प्रसंग घेत असतात.
मी Lance Armstrong याचे Every second counts हे पुस्तक वाचले.लान्स आर्मस्ट्रॉंग हा एक कॅन्सरग्रस्त अमेरिकन सायकलिस्ट Tour De France ही जगातील सगळ्यात अवघड सायकल स्पर्धा तो सहा वेळेस जिंकतो. त्याने अनेक वाईट प्रसंगांना आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती वरच तोंड दिलेले आहे. त्याची बुकसमरी मी केलेली आहे ती नक्की ऐका.
६) स्वतःला रोज तयार करा :
Decorate yourself daily
स्वतःला रोज येणाऱ्या नवीन क्षणांसाठी सज्ज ठेवा येणारा प्रत्येक क्षण हा तुम्हाला नवीन आव्हान देत असतो त्या नवीन आव्हानाला सामोरे जाण्यासाठी स्वतः ला जागृत ठेवा, तयार ठेवा. येणारा प्रत्येक क्षण हा तुम्हाला जगण्याची नवीन उमेद देत असतो आणि त्या प्रत्येक क्षणाचा मी कसा वापर करायला पाहिजे याचं प्लॅनिंग हे तुम्ही करून ठेवा.त्यासाठी तुम्हाला ऑलिंपिकच्या दृष्टीने पाच वर्षातील प्रत्येक मिनिटाच प्रत्येक सेकंदाच प्रत्येक micro सेकंदाच नियोजन तुम्हाला कागदावर करावंच लागेल. तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. Lance Armstrong चे Every Second Counts हे पुस्तक प्रत्येक क्षणाची किंमत करायला शिकवते तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा.
ह्या सहा उपायांनी नक्कीच तुमची इच्छाशक्ती ही प्रबळ होईल आणि तुम्ही एक चांगले खेळाडू बनण्यास तयार व्हाल.तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती तुम्हाला ऑलिंपिक खेळा पर्यंत पोहोचवू शकते.
माझा हा लेख तुम्ही पूर्ण वाचलात त्याबद्दल धन्यवाद 🙏 🙏
आणखी माहिती साठी माझा फेसबुक ग्रुप लिंक इथे दिलेली आहे तो जॉईन करा.👇






Fantastic
उत्तर द्याहटवाThank you नेहल ताई
हटवामस्त एनर्जेटीक 👍
उत्तर द्याहटवाThank you योजना ताई
हटवावा, खूपच छान ब्लॉग माया मॅडम
उत्तर द्याहटवाThanks UC
हटवाएकच नंबर माया मॅडम...
उत्तर द्याहटवातुम्ही मुलांना खूप प्रेरणा देतात
माया मॅडम तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे कारण तुम्ही मुलांसाठी खूप तळमळीने काम करत आहात...!
All the best...!!
Thank you so much अल्का ताई
हटवाThank you so much अल्का ताई
हटवाExcellent, you are Great
उत्तर द्याहटवाThank you so much poonam tai
हटवाGreat Maya madam
उत्तर द्याहटवाखूपच छान मॅडम
उत्तर द्याहटवाSuperb blog 🙏👍
Thanks dear
हटवा