स्क्रिनिंग पासूनची मुक्ती म्हणजेच फ्री प्ले

 आपली मुले सतत आजारी पडत आहेत का?

 सर्दी,ताप, खोकला, व्हायरल इन्फेक्शन ,अशा आजारांना सतत सामोरे जात आहेत का?

इतरांमध्ये लवकर मिक्स होत नाहीत का? 


या सर्वांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर, माझा हा ब्लॉग पूर्ण वाचा.

 नमस्कार, 

मी माया दणके माझे मिशन आहे, येत्या 2025 च्या ऑलिंपिक गेम्स मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर मुले पाठवणे. त्यासाठी मी माझा फेसबुक ग्रुप पण काढलेला आहे. त्या माध्यमातून मी मुलांना खेळाकडे आकर्षित करते, खेळ खेळण्यास प्रवृत्त करते

'फ्री प्ले' म्हणजेच आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचा watch न ठेवता observation न करता मोकळेपणाने मनसोक्तपणे मुलांना खेळू देणे.

आपल्या लहानपणीचे दिवस आपल्याला आठवतात का?आपण मातीत ,चिखलात,पाण्यात, पाऊस,ऊन कुठेही कसेही खेळत असताना आपल्या आई-वडिलांनी किंवा आपल्या घरच्या मंडळींनी आपल्यावर कधीच वॉच ठेवला नव्हता.आपण मोकळेपणाने मुक्तपणे खेळत असू आणि आपल्याला घरचे त्याप्रमाणे खेळू द्यायचे त्यामुळेच आपण मनसोक्तपने खेळत असत.


परंतु,आता परिस्थिती बदलली आहे. वाढत्या सोशल मीडियाच्या वापरामुळे मुले स्क्रीनिंग प्रेमी झालेली आहेत.मग तो मोबाईल,लॅपटॉप, टीव्ही, कॉम्प्युटर या सर्वांच्या स्क्रिनशी त्यांची चांगली मैत्री झालेली आहे. 

स्क्रिनींग पासून मुक्ती म्हणजेच 'फ्री प्ले' हा एकच पर्याय आहे.

 फ्री प्ले मुळे होणारे फायदे आपण जाणून घेऊया.

१)मुलांना प्रसन्न आणि आनंदी वाटते :

मुले मनमोकळी मनमुराद खेळल्यामुळे प्रसन्न आनंदी राहतात. स्क्रिनिंग पासून मुक्ती पाहिजे असेल तर, मुलांना फ्री पणे मोकळेपणे खेळू द्यावे.मन शरीर प्रसन्न झाल्यामुळे मुलांना अभ्यास करायला पण तितकाच उत्साह येतो हसत खेळत नाचत खेळल्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली होतात त्यामुळे मुले आनंदी होतात.


)शारीरिक तक्रारी दूर होतात :

 1997 नंतर मुलांच्या शारीरिक तक्रारी म्हणजेच अपचन आम्लपित्त होणे, चिडचिड, टेन्शन, सर्दी,ताप, खोकला, व्हायरल इन्फेक्शन अशा अनेक शारीरिक तक्रारी वाढलेल्या आहेत.कारण  याचे मुख्य कारण म्हणजे, मुलांची शारीरिक हालचाल होत नाही.शारीरिक हालचाल न झाल्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही, आणि अनेक शारीरिक तक्रारी निर्माण होतात. त्या दूर करण्यासाठी मुलांना मनमोकळेपणाने मुक्तपणे खेळू देणे हाच एकमेव उपाय आहे.

)निर्णय घेण्याची क्षमता वाढते :

 मुलांवर कोणत्याही प्रकारचा watch न करता observation न करता मुक्तपणे मोकळेपणाने खेळू देणे हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे मुले स्वतःचे निर्णय स्वतः घेतील खेळातील छोटे-छोटे निर्णय स्वतः घेतल्यामुळे त्यांच्या निर्णय क्षमतेची आपोआप हळूहळू वाढ होईल.निर्णयक्षमता ही मुलांची मानसिकता मजबूत करते.

४)मुले स्वावलंबी होतात :

फ्री प्ले मुळे मुले खेळातील निर्णय स्वतः घ्यायला शिकतात. म्हणजेच ते हळूहळू स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि आई-वडिलांवर अवलंबून न राहता स्वतः निर्णय घेणे स्वतः मुलांशी बोलणे मुलांमध्ये मिक्स होणे या सगळ्या कृती स्वतः करतात. त्यामुळे मुलांच्या विचारांना पण दिशा मिळते व त्यामुळे मुले स्वावलंबी बनतात.


)मुलांमध्ये धाडस वाढते :

 फ्री प्ले मुळे मुलांमध्ये धाडस वाढते.घराबाहेर जाऊन खेळणे आई-वडील किंवा घरच्यांच्या शिवाय मोकळेपणाने खेळणे मुक्तपणे खेळणे त्यामुळे त्यांच्यात आपोआप धाडस येते. धैर्य वाढते. धाडस वाढल्यामुळे मुलांची मानसिकता मजबूत होते. मुलांमध्ये खेळल्यामुळे मुलांशी बोलण्याचे सुद्धा धाडस येते, एकूणच मुलांची मानसिकता प्रबळ बनते.

)एकटेपणाची भावना दूर होते :

 मुलांसोबत खेळल्यामुळे जी एकटेपणाची भावना आहे ती दूर होते. हल्ली, एका घरात एक किंवा दोनच मुले असतात. त्यामुळे मुलांमध्ये एकटेपणाची भावना खूप वाढीस लागलेली आहे. मुलांसोबत खेळणे, बोलणे, हसणे, ओरडणे, जोरजोरात किंकाळ्या मारणे यामुळे मुलांच्या मनातील एकटेपणाची भावना एकलकोंडेपणा बराचसा कमी होण्यास मदत होते.


तात्पर्य ,फ्री प्ले मुळे मुलांचा शारीरिक मानसिक वैचारिक भावनिक विकास तर होतोच शिवाय या खेळण्याच्या वेळेत त्यांना स्क्रीनिंग पासून दूर ठेवणे शक्य होते. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर यासारख्या सोशल मीडियापासून ते दूर राहतात.आणि एकूणच ते स्क्रीनिंग पासून दूर राहतात. म्हणजेच स्क्रीनिंग पासूनची मुक्ती म्हणजे फ्री प्ले होय असेच आपल्याला म्हणावे लागेल.


माझा हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद  🙏 🙏

फ्री प्ले माहिती बाबतचा माझा युट्युब व्हिडीओ पाहिलात तर अजून  जास्त तुम्हाला फ्री प्ले ची concept clear होईल. त्याची लिंक https://youtu.be/9XtY3GBj28I

मुलांच्या शारीरिक, मानसिक, वैचारिक,भावनिक विकासासंदर्भात अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर, माझा फेसबुक ग्रुप नक्की जॉईन करा. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे लिंक वर क्लिक करा आणि माझा ग्रुप जॉईन करा.

https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

आपल्या मुलांना स्क्रिनिंग पासून दूर ठेवून खेळाकडे मिळवायचं असेल तर माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स 2025 हा ग्रुप नक्की जॉईन करा.



टिप्पण्या

  1. Amazing.. Khup chaan lihile ahe... Ani asech hot ahe .. Ani free play option khup chaan ahe...

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर मार्गदर्शन. छान लिहिलं आहे👌

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान मार्गदर्शन केले मायाताई नवीन पिढीसाठी तुमचा ब्लॉग अत्यंत उपयुक्त आहे प्रत्येक पालकाला ही जाणीव झाली पाहिजे खरा आनंद कशात आहे हे मुलांना पालकांनी सांगितले तरच माहिती होईल प्रत्येक तालुक्यासाठी हा ब्लॉग अत्यंत उपयुक्त आहे हा ब्लॉग वाचल्यानंतर प्रत्येकाचे डोळे उघडतील धन्यवाद 🙏

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच छान. अत्यंत आवश्यक माहिती पुरवली आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान माहिती... खूप उपयोगी ब्लॉग...👌👌

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय