ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी ची जबरदस्त ८ स सूत्रे
स्वतः च्याच नावाची ज्याला खूप चीड वाटायची तेच नाव आता त्याचे Icon बनले आहे, जगाचा World Ambassador त्याला याच नावाने बनवले.लहानपणी मोज्यामध्ये पेपर घालून फुटबॉल खेळणारा खेळाडू स्वतःच्या जिद्दीच्या,सातत्याच्या आणि कठोर मेहनतीच्या जोरावर आज विसाव्या शतकाचा World Ambassador बनला आहे.The King of Footballer बनला आहे. ओळखलं का मी कोणाबाबत बोलत आहे, अगदी बरोबर मी Pele याच्याबाबतच बोलत आहे.
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा बाबत आपल्या मनात भीती आहे का? ऑलिम्पिक पर्यंत जाण्यासाठी ८ ते १० वर्षे लागतात. ते काही सोपे नाही आपल्या मर्यादेच्या पलीकडे ची ती गोष्ट आहे. असे विचार तुमच्या मनात येत आहेत का, तर मित्रानो माझा हा लेख तुमच्याचसाठी.ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा पर्यंत आपले जाणे म्हणजे अशक्यच आहे.त्याला खूप कष्ट, सातत्य, आणि मेहनत घ्यावी लागते. सामान्य कुटुंबातील मुले या सगळ्या गोष्टी करूच शकत नाहीत. अशी आपली धारणा असते आणि ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत जर आपण सातत्याने पूर्ण क्षमतेने आणि चिकाटीने सराव करत राहिलो तर अशक्य असे काहीच नाही.
पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धात नेहमी पाणीच जिंकते ते ताकदीच्या नव्हे तर सातत्याच्या जोरावर.
नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या 2024 पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातून १०० खेळाडू पाठवणे.

ऑलिंपिक क्रीडास्पर्धेपर्यंत जाण्यासाठी तुम्ही जर ही ८ स सूत्रे तुमच्या दैनंदिन जीवनात अवलंबलात आणली, तर नक्कीच तुम्हाला ही सूत्रे जाणून घेण्यासाठी माझा हा ब्लॉग पूर्ण वाचावा लागेल.
१) स्वतःवर विश्वास ठेवा :
कोणतीही नवीन गोष्ट सुरु करण्या अगोदर आपल्याला स्वतःला ती कामे पूर्ण होईल की नाही, याची खात्री वाटत नाही किंवा ती कृती पूर्णत्वास जाईल की नाही याबाबत पण आपल्या मनात नेहमी संभ्रम असतो. आपला आवडता खेळ कोणता निवडायचा याबाबत सुद्धा आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही. तर स्वतःवरील विश्वास निर्माण करण्यासाठी तुम्हाला स्वतःचे स्व परीक्षण करावे लागेल, त्यासोबतच तुम्हाला सकाळ संध्याकाळ ५/५ मिनिटांची ध्यानधारणा करावी लागेल. तरच तुम्हाला मेडिटेशन मधून स्वत्वाची जाणीव निर्माण होईल.स्वतः मध्ये कोणत्या abilities आहेत याची जाणीव तुम्हाला होईल

२) स्वतःच स्वतःचे कौतुक करा :
रोज स्वतःला सकाळी आरशात पहा आणि स्वतःचे कौतुक करा.'मी किती हुशार आहे, मी असाध्य गोष्ट साध्य करू शकतो,मी अनेक अडथळ्यांना सहजरित्या पार करू शकतो, Im the Best ,Im the Best,Im the Best'असे म्हणून दिवसाची सुरुवात करा आणि स्वतःला रोज तयार करा. स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करा, आणि मग जादू पहा तुम्हाला अशक्य गोष्टी सुद्धा शक्य वाटायला लागतील.ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा प्रवास सुद्धा तुम्हाला सहज शक्य वाटेल खरंच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा या इतक्या अवघड नसतात.

३) सातत्य टिकवणे :
कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी त्या गोष्टीचा सातत्याने तुम्हाला सराव करणे गरजेचे आहे तरच आपण त्यात प्राविण्य प्राप्त करतो कितीही अडचणी आल्या संकटे आली तरी ही सातत्याने जर तुम्ही त्या खेळण्याचा सराव केलात तर तुम्हाला त्याची आवड पण निर्माण होईल आणि प्राविण्य प्राप्त होईल. पेले, लान्स आर्मस्ट्रॉंग,मोहम्मद अली, सानिया मिर्झा ,सायना नेहवाल यांसारखे खेळाडू हे फक्त सातत्याच्या जोरावर सध्या STAR खेळाडू बनलेले आहेत. त्यासाठी सातत्य टिकवून ठेवा.

४)संघर्ष :
जन्मल्यापासून माणसाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष हा करावाच लागतो संघर्ष करूनच त्या मिळवलेल्या यशाचे कौतुकही वाटते अनेक प्रतिकूल वातावरणाशी संघर्ष करावा लागतो.ऊन, वारा,पाऊस, थंडी यांना आपल्या खेळाच्या सरावात महत्त्व नसायला हवं या परिस्थितीशी संघर्ष केल्यासच तुम्हाला ऑलिंपिक खेळा पर्यंत जाणे सोपे वाटेल.
Lance Armstrong हा सायकलिस्ट हा अनेक आव्हानांना सामोरे जात World Champion बनला. स्वतः एक कॅन्सरग्रस्त असून सुद्धा 5 Tour de France जिंकणारा २० व्या शतकातील एकमेव Cyclist ठरला. याच्या यशाचा प्रवास ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

५) साहस :
कोणत्याही परिस्थितीला न जुमानता आपल्या खेळाचा सातत्याने सराव केल्याने त्या training च्या परिस्थितीतून अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे साहस हे प्रत्येक खेळाडूला येते.
"Everything is Practise"
मग एखादा ॲक्सिडेंट झाला असेल हाताला पायाला मार लागला असेल, दुखापत झाली असेल, अनेक संकटे आली असतील या सगळ्या गोष्टींवर मात करण्याचे साहस ही आपली ट्रेनिंग देते. मग रात्रीच्या अंधारात प्रॅक्टिस करणे असेल, ग्राउंडवर एकटेच प्रॅक्टिस करणे असेल याबाबतीतील साहस आपोआपच निर्माण होते.

६) संयमशीलता :
बऱ्याच वेळेस आपण खेळाचा खूप सराव करतो, काही वेळेस सतत सतत लागोपाठ निराशा पदरी येते.काही वेळेस शारीरिक दुखापतीमुळे आपण आपल्या खेळाचे प्रदर्शन करू शकत नाही. आर्थिक अडचणींमुळे सरावात अडथळे येतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, बऱ्याच वेळेस इतर खेळाडूंकडून मानसिक त्रास, खिल्ली उडवणे या सारख्या गोष्टींना आपण सामोरे जावे लागते, तरीही प्रत्येक खेळाडूने स्वतःच्या मनावरचा संयम कायम टिकवणे गरजेचे असते. अनेक वेळेस आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कडून टॉर्चरिंग पण होते. अशा वेळेस प्रत्येक खेळाडूने आपल्या स्वतःवरचा दृढ विश्वास पक्का केला पाहिजे आणि स्वतःवर संयम ठेवला पाहिजे.

७) स्वयंशिस्त :
स्वयंशिस्त म्हणजे काय हा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल, स्वयंशिस्त म्हणजेच सकाळी उठण्याच्या वेळा, रात्री झोपेच्या वेळा, ट्रेनिंगच्या वेळा याबाबतीत एक टाईम टेबल नुसार वर्क करणे. प्रत्येक खेळाडू मध्ये ही स्वयंशिस्त असेल तर निश्चितच खेळाडू मध्ये दिवसेंदिवस खूप चांगली प्रगती होईल.त्यासोबतच खेळाडूला या सगळ्या गोष्टी सोबत खाण्याच्या बाबतीतही अनेक नियम स्वतःवर घालावे लागतात. आणि ते सगळे नियम नियमितपणे पाळणे गरजेचे असते आणि हे पाळणे फक्त आणि फक्त खेळाडुच्या हातात असते.
मी असे अनेक खेळाडू पाहिले आहेत की, त्यांच्या झोपेच्या उठण्याच्या वेळा नियंत्रित नसतात. त्यामुळे त्यांच्या Strength आणि Stamina वर खूप परिणाम होतो.

८)स्वयंनिर्णयक्षमता :
खेळाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळाडूला तात्काळ व स्वतःची निर्णय क्षमता असली पाहिजे.
उदा: एखाद्या फुटबॉल च्या संघातील खेळाडू तात्काळ बॉल फेकून गोल करण्यास निर्णय घेऊ शकत नसेल तर निश्चितच इतर खेळाडू बॉल हिसकावून घेतील स्पर्धेवर परिणाम होईल.
प्रत्येक खेळाडू मध्ये ही निर्णय क्षमता असेल तर तो खूप जास्त प्रगती करू शकतो.

या ८ स सूत्रांचा वापर केलात आणि रोज एकेक पायरी चढत सराव सुरु केलात तर नक्कीच ऑलिंपिक खेळाच्या स्पर्धापर्यंत तुम्ही नक्की या ८ सूत्रांना वापरून पोहोचू शकाल.
माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला याबाबत नक्की कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या.👇
ऑलिंपिक खेळांच्या स्पर्धाबाबत अजून जाणून घेण्यासाठी माझा फेसबूक ग्रुप मिशन १०० ऑलिम्पिक गेम्स हा जॉईन करा त्याची लिंक इथे दिली आहे.
माझा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल आपले धन्यवाद.🙏🙏

जबरदस्त ब्लॉग माया ताई
उत्तर द्याहटवा👍👍👍
Excellent start and photos
उत्तर द्याहटवाब्लॉगची सुरुवात तर एकदम जबरदस्त खूप छान आणि उपयुक्त ब्लॉग खेळाडूंसाठी
उत्तर द्याहटवाVery informative blog
उत्तर द्याहटवाThanks Madhura
हटवाखूप छान मुद्दे मांडले माया ताई आणि खेळाडूंसाठी तर खूप असा उपयुक्त ब्लॉग आहे.
उत्तर द्याहटवाThank you कल्पना ताई
हटवा