ह्या जबरदस्त ४ गोष्टी अंगिकारल्या तर नक्कीच खेळ हा जीवनाचा आरसा बनेल

"Dont just visualize success at the end.Visualize the process.Dont just picture yourself winning.Picture the steps it takes to get there."

मनामध्ये फक्त जिंकायची स्वप्न पाहू नका त्या जिंकण्यासाठी कोणत्या कोणत्या  मार्गाचा अवलंब तुम्हाला करायचा आहे,  त्या मार्गाला डोळ्यासमोर आणा आणि त्या मार्गावर चाला.




सार्‍या विश्‍वावर आपल्या खेळाची जादू पसरवली आणि ती जादू तो व्यक्ती गेल्यानंतर ही अजून पर्यंत कायम आहे त्या जादूचे सगळे दिवाने आहेत. म्हणूनच आपण त्यांना जादूगार असे म्हणतो. होय, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या बद्दल बोलते.

खेळाच्या सरावात शारीरिक मानसिक strength कमी पडल्यासारखे जाणवते का?stamina खूप कमी पडतोय का? आपल्या ध्येयाच्या दिशेने जाताना स्वतः वरचा विश्वास कमी पडत आहे का? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्या या समस्यांवर मात करायला नक्की मदत करेल. यासाठी तुम्हाला माझा हा ब्लॉग पूर्ण वाचावा लागेल.

नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ पॅरिस ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा मध्ये महाराष्ट्रातून १०० खेळाडू पाठवणे.

१) Self Punishment :

महात्मा गांधीजी रोज स्वतः ला छोटे छोटे टार्गेट देत जर ते पूर्ण नाही झालं तर स्वतः लाच शिक्षा देत. उदा. एक वेळचे जेवण न घेणे वगैरे.

स्वतः ला तयार करण्यासाठी स्वतः लाच रोज छोटी छोटी कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार करायचे आहे आणि स्वतःवर तुम्ही जेवढे काम कराल,तेवढे तुमच्या स्वतःवर चांगले सकारात्मक परिणाम होतील, तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. ती कामे पूर्ण झाली नाहीत,तर स्वतःलाच छोट्या-छोट्या पनिशमेंट सुद्धा द्या.


२) सकस वैचारिक आहार :

माझे गुरुजी असे म्हणतात की, आपले व्यक्तित्त्व दोनच गोष्टींवर घडते, आपण कोणती पुस्तके वाचतो आणि आपण कोणाच्या सहवासात राहतो.

पुस्तकांना आपला मित्र बनवायला सुरुवात करा. पुस्तक वाचनाने विचारांना नवी दिशा मिळते, व्यक्तिमत्व घडते.रोज किमान पुस्तकाची दोन तरी पांन वाचली पाहिजेत. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या मोटिवेशनल स्पीकर ची पुस्तके, खेळाडूंची आत्मचरित्रे विकत मिळतात. ती घ्या आणि ती वाचायला सुरुवात करा. एका महिन्यात नक्कीच तुमच्या व्यक्तिमत्वात फरक पडेल.

आणि आपल्या ध्येयाशी सहमत असणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात राहा म्हणजेच सकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहा.


३) सकस आहार :

Nutrition म्हणजे,  "the process of providing or obtaining the food necessary for health and growth"includes:protein,carbohydrates,fat,vitamins,minerals and electroytes.

नवतरुण खेळाडूंसाठी रोज किमान 2000 ते 5000 Calories ची आवश्यकता असते.त्यापैकी आपण किती घेत आहोत, याचं कॅलक्युलेशन काढा. सामान्य व्यक्ति साठी किमान 1600 कॅलरीज ची आवश्यकता असते. 1000 कॅलरीज सुद्धा आपण रोज घेत नाहीत. त्यासाठी तुम्हाला Carbohydrates युक्त अन्नाचा वापर रोजच्या आहारात जास्त प्रमाणात करावा लागेल.

जसे, दूध, अंडी, चीज, मटण या पदार्थांमधून तात्काळ कॅलरीज शरीराला मिळतात.


४)Visualization :







हा व्हिडिओ पहा Ann Ashworth हिच्या मुलाखतीतील हा छोटासा भाग. ही Comrad Marathon winner  2018 ची आहे.Ann म्हणते आपल्याला जी गोष्ट पाहिजे असते ती गोष्ट अगोदर आपल्या स्वप्नात उतरवा आणि मनात उतरवा. जी गोष्ट आपण मनापासून visualize करतो, ती आपल्याला निश्चितपणे मिळते. माझ्या यशामागे फक्त Visualization चा सगळ्यात मोठा भाग आहे असे ती म्हणते. मी अगोदर Comrad Marathon Winner आहे अशी स्वप्न पाहते ती मनापासून visualize करते आणि निश्चितपणे त्या गोष्टी मी मिळवल्या आहेत.

Visualization चा वापर करायला सुरुवात करा. Visualization मध्ये खूप जबरदस्त ताकद आहे.

ह्या ४ गोष्टींचा तुम्ही वापर करायला सुरुवात केली, तर नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आणि खेळ हा तुमच्या जीवनाचा आरसा बनेल.

माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या.

ऑलिंपिक खेळा संदर्भातील अधिक माहिती साठी माझा फेसबुक ग्रुप मिशन100 ऑलिम्पिक  गेम्स हा नक्की जॉईन करा.त्याची लिंक इथे देत आहे.

माझा हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद 🙏 🙏



टिप्पण्या

  1. अप्रतिम ब्लॉग माया मॅडम
    व्हिडिओ खूपच पावरफुल

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. अतिशय सुंदर. अभ्यासपुर्ण माहिती आहे. जो याचा अवलंब करेल तो खरेच खूप यशस्वी होईल. मॅडम तुमचे कार्य महान आहे.तुमच्या इच्छा नक्कीच पुर्ण होवोत. तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा!!
      स्वरुप सावंत
      मुख्याध्यापिका
      साधना विद्यालय सायन

      हटवा
  3. छान लिहला आहे ब्लॉग, व्हिडिओ सादरीकरण सुदर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय