ह्या जबरदस्त ५ गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयाची दिशा दाखवतील
Nothing is Impossible
असे प्रत्यक्षात करून दाखवणारे डॉ. अमित समर्थ एक सायकलिस्ट.
जगातील सगळ्यात अवघड अशी सायकलिंग स्पर्धा Trans Siberian 9100 किमी. लांबीची ही स्पर्धा जगातील सगळ्यात अवघड अशा स्पर्धांमध्ये गणली जाते.ही स्पर्धा पूर्ण केलेले जगात फक्त 7 व्यक्ती आहेत. त्यातले एक डॉ. अमित हे आहेत.विशेष म्हणजे हे महाराष्ट्रीयन आहेत, सध्या ते Across India सायकलिंग स्पर्धा 6000 किमी. ची करणार आहेत. सायकलिंग स्पर्धा कशा पार केली, ते या व्हिडीओ तुन तुम्हाला दिसेल,हा व्हिडिओ पहा.
आपल्या मनाची खंबीर साथ असेल तर,या जगात सर्व काही शक्य आहे, हे डॉ. अमीत यांनी सिद्ध केले आहे तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, मनाची मजबूती कशी वाढवायची ,ते जाणून घेण्यासाठी माझा हा ब्लॉग पूर्ण वाचा.
नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे, 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातून १०० खेळाडू पाठवणे.
मनाची तयारी, मनाचे खंबीर संतुलन, मनाला कायम सकारात्मक विचार देणे ,या गोष्टी आपल्याला सुरुवातीला थोड्याशा अवघड वाटत असल्या तरी, या अवघड नाहीत. याचा सतत सराव केला, तर तुम्हाला जे पाहीजे ते सहज प्राप्त होऊ शकते.
चला, तर मग कोणत्या गोष्टींमळे आपण आपल्या मनाला कायम सकारात्मक ठेवू शकतो त्या गोष्टी पाहूया.
१)नकारात्मक विचारांना थारा देऊ नका :
कोणतेही काम हातात घेतल्यानंतर माझ्याही मनात अनेक अनेक नकारात्मक विचार घोंगावत असायचे, परंतु गेले एक वर्ष झालं मी नकारात्मक विचारांना बाजूला करून सकारात्मक विचारांना जास्त कल देते. तेव्हापासून माझ्यामध्ये सकारात्मकता खूप जास्त वाढलेली आहे. कोणत्याही गोष्टीकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत असते. म्हणूनच आपल्या मनात नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन्ही विचार येतात. त्या नकारात्मक विचारांना बाजूला करा आणि सकारात्मक विचारांना आपलेसे करा. हा सराव तुम्हाला रोज करावा लागेल, तरच ती सवय लागेल. रोज जे मनामध्ये विचार येतात, त्यातील सकारात्मक आणि नकारात्मक कोणते ते वहीवर लिहून काढा. आणि सकारात्मक दृष्टीनेच विचार करा. हा सराव तुम्हाला रोज 21 दिवस करायचा आहे.
२)स्वतःवर काम करा :
"एक महान व्यक्ती त्याच प्रमाणात महान बनली आहे आणि प्रत्येक यशस्वी व्यक्ती त्याच प्रमाणात यशस्वी झाली आहे ज्या प्रमाणात तिने तिच्या सर्व शक्ती एका विशिष्ट दिशेने केंद्रित केलेल्या आहेत."
हे 'Eat That Frog' या पुस्तकातील वाक्य आहे. हे पुस्तक ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेले आहे.हे पुस्तक स्वतःवर काम करायला शिकवते,नक्की वाचा, 21 महान सूत्र या पुस्तकात सांगितलेली आहेत.
स्वतःला उभे करा,स्वतःला सतत वैचारीक खाद्य द्या,स्वतःला सतत प्रश्न विचारत रहा, स्वतःला लढ म्हणा, स्वतःला संघर्ष करायला तयार करा, स्वतःला punishment द्यायला सुरुवात करा, स्वतःच स्वतःचे नियोजन करा, स्वतःच्या कामाचे, वेळेचे,पैशाचे, शिस्तीचे, ध्येयाचे नियोजन करा. सतत स्वतःचे आत्मपरीक्षण करा, सतत स्वतःला Push करा, सतत स्वतःला आतून प्रेरणा देत रहा,Yes you can do it, You can do it, You are always best.
मी गेली दीड वर्षे झालं मी माझ्या स्वतःवर काम करत आहे, माझ्यामध्ये अफलातून बदल झालेले आहेत.तुम्ही सुरुवात करा अजून वेळ गेलेली नाही.
आज माझ्या उर्वरित आयुष्याचा शेवटचा दिवस आहे.

३) एकाच ध्येयाला चिकटून रहा :
ज्या लोकांमध्ये तुलनात्मक रित्या कमी शक्ती असते, तेही खूप काही मिळवू शकतात पण अट आहे की, त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावे आणि न थकता एकावेळी एकच काम करत राहावे.
जे आपण आपले ध्येय ठरवले आहे त्या ध्येयाला चिकटून राहून रोज त्या दिशेने एकेक पाऊल टाकावे.तरच तुम्ही तुमच्या मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचाल. प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एक आव्हान आहे. या दृष्टीने त्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग अवलंबा आणि एक एक पाऊल त्या ध्येयाच्या दिशेने टाका. तुम्हाला ती वाट खुप सुकर वाटेल.
प्रत्येक वेळेस इतरांशी तुलना करून किंवा आपले ध्येय बदलू नका. जे तुमचं ध्येय आहे,त्याला चिकटून राहा, प्रामाणिक राहा आणि एकसंध रहा.
ओलिंपिक खेळाचाही प्रवास असाच आहे. जर तुम्ही तुमच्या ध्येयाशी चिकटून राहिलात, तर निश्चित ऑलिम्पिकमध्ये तुम्ही उतरून एखादे मेडल निश्चितपणे मिळवाल.
Michel Jorden याला 'The God of Basketball' असे आपण म्हणतो,कारण मायकेल त्याच्या ध्येयशी चिकटून राहून सतत सतत काम करून ध्येयालाच जीवनशैली बनवली.
४) सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका :
आज काल सोशल मीडियाचा अवास्तव वापर चालू झालेला आहे. WhatsApp Telegram Facebook Instagram LinkedIn वगैरे, याचा आपण किती वापर करतो हे आपणच स्वतः पडताळा. मोबाईल च्या सेटिंग मध्ये गेलात तर स्क्रीन टाइमिंग हा ऑप्शन असतो, तिथे क्लिक केल्यानंतर आपण कोणत्या App वर किती वेळ घालवला, हे आपला मोबाईलच आपल्याला सांगतो स्क्रीन टाइमिंग मॅनेजमेन्ट करा. सोशल मीडियाचा वापर करून आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा. परंतु सोशल मीडियाला आपल्या स्वतःला वापरायला देऊ नका.
५) तुमच्यातील कौशल्यात वाढ हवी :
तुम्हाला जरा फुटबॉल आवडत असेल तर, फुटबॉल वर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला बास्केटबॉल आवडत असेल तर, बास्केटबॉल वर लक्ष केंद्रित करा.तुमच्यात जी कौशल्ये आहेत, त्याच कौशल्यांवर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला हळूहळू त्याचे चांगले परिणाम तुम्हाला जाणवतील.सातत्याने त्या कौशल्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा.प्रत्येक दिवसाला आपल्यातील कौशल्य 1% तरी वाढ व्हायलाच पाहिजे, असा कायास करा.तरच तुमच्यातील कौशल्याची तुमच्या घरातील लोकांना, समाजाला आणि राष्ट्राला जाणीव होईल.
ह्या जबरदस्त ५ गोष्टी चा अवलंब तुम्ही रोज करायला सुरुवात केली, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यास कोणीच रोखू शकत नाही. या ५ गोष्टींचा नक्की अवलंब करायला सुरुवात करा आणि तुम्ही तुमचे ध्येय गाठा.
माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, हे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय द्या.👇
ऑलिम्पक खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबूक ग्रुप मिशन 100 ऑलिंपिक गेम्स हा जॉईन करा. त्याची लिंक येथे दिलेली आहे.
माझा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.🙏 🙏





Wa, apratim lekh. Pratyekane vachlach pahije asa.
उत्तर द्याहटवाअभ्यासपूर्ण लेख
उत्तर द्याहटवाThank you sir
हटवाZabardast . Khup mast lekh
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिले आहे लिंक ओपन होत नाही आहे
उत्तर द्याहटवाThanks dear
हटवाकोणती लिंक म्हणताय
Thanks dear
हटवाव्हिडिओची लिंक का होते ओपन
अप्रतिम लेख...!
उत्तर द्याहटवाThank you alka tai
हटवाKhoopch chhan blog maya mam👍👍
उत्तर द्याहटवा