ह्या जबरदस्त ५ गोष्टी तुमच्या मनातील ऑलिम्पिकची भीती दूर करतील

       




  भिती मृत्यूला रोखू शकत नाही ,ती आयुष्याला रोखते.

             महाभारताचे महायुध्द लवकरच सुरु होणार होते.युद्धाचे ढग जमले होते,घोडे फुरफुरत आपल्या टापा जमिनीवर आपटत असताना, हजारो योद्ध्यांची  बोटं आपापल्या तलवारींच्या मुठीभोवती आवळली गेली होती.पण आपला नायक अर्जुन मात्र गलितगात्र झाला होता.कारण युद्धाच्या दोन्ही बाजूना त्याचे कुटुंबीय आणि मित्र होते,आणि त्यांच्यापैकी अनेकजण त्या महायुद्धात मरण पावणार होते.

      भूमीवरच्या सर्वाधिक बुद्धिमान महायोध्द्यांपैकी  एक असलेल्या अर्जुनाने हातातील धनुष्य खाली टाकून दिले.एका महायोध्याच्या भयग्रस्तेतून अशाप्रकारे युद्धभूमीवर भगवद गीता अवतरली.अर्जुन हा पृथ्वीवरचा सर्वाधिक बुद्धिमान धनुर्धारी होता,तरीही भीतीमुळे त्याच्या क्षमतांशी असलेले त्याचे  नातं तो पूर्णपणे गमावून बसला होता.

          आपल्याही बाबतीत नेहमी असेच घडते. आपल्यात खूप मोठ्या स्पर्धा पार पाडण्याची ताकद असते ,पण भीतीमुळे आणि चिंतेमुळे आपल्या क्षमतांपासून आपण तुटतो.आपण आपल्या क्षमतांपासून  दूर जातो.ऑलिम्पिक च्या स्पर्धा म्हणल की, आपण तिथेच घाबरून जातो. आपल्याला शिकवले जाते की, भीती ही नकारात्मक भावना आहे.याच भीतीवर मात कशी करायची हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्कीच हा ब्लॉग तुमच्याचसाठी.

       नमस्कार मी माया दणके,माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympic मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.

लहानपणापासूनच आपल्याला ऑलिम्पिक खेळाच्या क्रीडास्पर्धान्बाबत  भीती  दाखवली जाते. ऑलिम्पिकच्या  स्पर्धा खूप मोठ्या level च्या असतात,तिथपर्यंत पोहचणे म्हणजेच खूप मोठा जप करावा लागतो.परंतु त्याच आपल्या मनातील  भीतीवर मात कशी करायची हे  शिकवले जात नाही.

२०१७ मध्ये ३००० फुट उंचीच्या चढणीवर कोणत्याही दोरखंडाचे  सहाय्य न घेता Al Kapitan या चढणीवर Alex Honald हा चढतो आणि असे धाडस करणारा तो जगातील पहिला व्यक्ती ठरतो.Alex ला त्याच्या मुलाखतीत विचारले असता तो म्हणतो ही चढण चढताना माझ्याकडे दोनच पर्याय होते एक तर चढण यशस्वीरीत्या पूर्ण करणे किंवा मृत्यू.मी पहिल्याच पर्यायाला निवडले.आणि मी यशस्वी ठरलो.




     या उदाहरणावरून मला असे सांगायचे आहे की,आपण जी गोष्ट खूप अवघड वाटते. त्या वाटेला जाण्याचा प्रयत्नच करत नाहीत किंवा त्यापासून दूर राहणेच जास्त पसंद करतो.परंतु असे खूप कमी लोक असतात जे असे धाडस करतात.त्यांच्यातील खालील qualities मुळेच ते जगात काहीतरी वेगळे करून दाखवतात.

१)ध्यानधारणा  :

स्वतः वरचा आत्मविश्वास च आपल्याला कोणतेही काम करण्याचे बळ देते.आत्मविश्वास हे आपले सगळ्यात मोठे हत्यार आहे.आपला स्वतः वर विश्वास नसेल तर तुम्ही सतत गोंधळलेले असाल,एक ठाम निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात येणार नाही.एकूणच तुम्हाला यश मिळणार नाही.

हा आत्मविश्वास तुम्ही तुमच्यात वाढवण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते त्या करण्यास सुरुवात करावी लागेल.International swimmer Michel Phelps याला पण लहानपणी पाण्याची खूप भीती वाटत होती. यावर तुमचा विश्वास बसेल का? कधीच नाही कारण Michel हा सध्या जगातील ऑलिम्पिक मधील सगळ्यात जास्त गोल्ड मेडल मिळवणारा swimmer  ठरला आहे.

स्वतः वर विश्वास ठेवायला शिका,स्वतः च्या कृतीवर विश्वास ठेवायला शिका,स्वतःच्या वाणीवर, स्वतः च्या विचारांवर विश्वास ठेवायला शिका.




हा विश्वास तुम्हाला केवळ एकाच कृतीतून येईल ती म्हणजे ध्यानधारणा.होय ध्यानधारणा करायला सुरुवात करा आणि जादू पहा. तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल.ध्यानधारणेची स्वतः ला सवय लावण्यासाठी तुम्हाला रोज २१ दिवस ध्यानधारणा करायची आहे.रोज दोन वेळेस १२ /१२ मिनिटांची ध्यानधारणा तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करेल.मी रोज दोन वेळेस ध्यानधारणा करते आणि माझ्यात आत्मविश्वासाची चमक मला खूप जाणवत आहे.

2)खेळाडूंची आत्मचरित्रे वाचा :

खेळाडूंची आत्मचरित्रे वाचल्याने नक्कीच आपल्यात खूप  बदल होतो.विचारांची प्रक्रिया बदलते,नवीन उर्जा मिळते,खेळाच्या सरावात सतत प्रोग्रेस कसा करायचा ते सहजपणे अवगत होते,मनातील भीती निघून जाते.खेळाडूंचा  प्रवास वाचल्यावर आपण ही असे काहीतरी करायला हवे अशी मनात आशा निर्माण होते.

मी American Cyclist Lance Armstrong याचे आत्मचरित्र वाचले आणि मला ही आपण असेच काहीतरी करायला हवे अशी उमेद निर्माण झाली.आणि आश्चर्य मी आता 50 km Cycling सहज करते.मला लहानपणापासूनच सायकलची भीती वाटत होती. पण Lance Armstrong चे आत्मचरित्र वाचल्यानंतर माझ्यात खूप बदल झाला.

खेळाडूंनी त्यांच्या खेळाच्या प्रवासातील अनुभव त्या पुस्तकांमध्ये सांगितलेले असतात ते आपल्याला खेळातील भीतीपासून दूर राहण्याची शिकवण देतात,खेळातील आव्हानांना पेलण्याची ताकद देतात,ती आव्हाने आपन कशी सहजपणे पेलू शकतो हा विश्वास देतात.

म्हणूनच महिन्यातून किमान एका खेळाडूचे आत्मचरित्र वाचायला सुरुवात करा.तुमच्या माहितीखातर येथे काही खेळाडूंची आत्मचरित्रे मी सांगते.




Pele : Autobiography of pele

M.S.Dhoni:The Untold

People Feature : Michel Phelps

Be Water, My Friend: The Teachings of Bruce Lee 

असा प्रकारची आत्मचरित्रे तुम्ही वाचू शकता,आणि खेळाडूंच्या या प्रवासातून तुम्ही स्वतः ला घडवू शकता.आणि तुमच्या मनातील ऑलिम्पिकची भीती तुम्ही घालवू शकता.

३)स्वतःला आव्हानांसाठी सज्ज करा  :

जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाच्या सरावात उतरता त्यावेळेस तुमच्यात अनेक बदल व्हायला सुरुवात होते,उदा :जर तुम्ही 400 meter Sprint साठी Playground वर उतरत असाल तर सुरुवातीला तुम्हाला रन करताना दम लागेल,थकवा येईल,शक्ती कमी पडत असल्याचे जाणवेल,म्हणून तुम्ही त्या सरावाला तिथेच थांबवू नका तर त्यात अजून प्रगती कशी करता येईल यावर अभ्यास करायला सुरुवात करा.तुमच्यात भावनिक ,मानसिक बदल पण होतील.स्वतः तील बदलांना सामोरे जायची ताकद वाढवा.




 बदलांच्या  तणावांची आणि आव्हानाची आपल्याला भीती वाटत असते,म्हणून आपण सतत आरामशीर बुडबुड्यात राहण्याचा सतत प्रयत्न करत असतो.पण हीच आव्हाने आपल्यात भक्कमपणा आणत  असतात.

Wilma Rudolph  वयाच्या आठव्या वर्षी पोलीओने दोन्होही पाय अपंग झालेले असतानाही 1956 आणि 1960 च्या ऑलिम्पिक मध्ये एकाच ऑलिम्पिक मध्ये 3 गोल्ड मेडल मिळवते.आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये 3 गोल्ड मेडल मिळवणारी  First American Fastest Athelete बनते.

Wilma Rudoph एक पोलिओग्रस्त,  तीला पण अनेक वेळेस अनेक शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागले असेल, पण तिने माघार घेतली नाही.म्हणूनच आव्हाने पेलण्यासाठी स्वतः ला समर्थ करा.

४)सरावातील सातत्य :

     कोणत्याही गोष्टीत सातत्य असेल, तर नक्कीच आपल्याला त्यात प्राविण्य प्राप्त होते.तुमच्या खेळाच्या सरावात सातत्य असेल तर नक्कीच तुम्हाला त्या खेळावर प्रेम होते,खेळाच्या सरावावर प्रेम होते,एकूणच सतत सतत तो सराव तुम्ही करत असल्याने तुम्हाला त्या खेळातील अडचणी पण माहित होतात.खेळातील technical points पण कळतात.आणि आपण अजून कशाप्रकारे त्या खेळात कुशल होऊ शकते याची पण हळूहळू माहिती होते.


उदा.तुम्ही लहान असताना तुम्हाला सायकल चालवताना सुरुवातीला भीती वाटते पण जेव्हा तुम्ही रोज सायकल चालवण्याचा सराव कराल,तेव्हा ती भीती आपोआप पळून जाईल.आणि तुमचे मित्र सुद्धा मागून चिडवत असतात म्हणून आपण कितीही सायकल वरून पडलं तरीही,आपण सायकल चालवतोच.

तुमच्या मनातील खेळाची ती भीती सातत्याच्या सरावाशिवाय जाणार नाही.म्हणूनच सातत्याने खेळाचा सराव करा आणि मनातील भीती घालवा.


५) स्वतःचे रेकॉर्ड स्वतःच मोडणे :

खेळाच्या स्पर्धामध्ये स्पर्धकाशी वैयक्तिक वैर नको. स्वतः च स्वतः तील प्रगतीवर वारंवार लक्ष केंद्रित करा.स्वतःचे रेकॉर्ड स्वतःच तयार करा आणि स्वतःच मोडण्याचाही विक्रम करा.

Michel Phelps Swimmer हा स्वतःचे रेकॉर्ड एका ब्लॅकबोर्ड वर लिहितो आणि पुढच्या स्पर्धेच्या वेळेस तेच रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड ब्लॅक बोर्ड वर तयार करतो.म्हणजेच तो त्याने स्वतः साठी तयार केलेले रेकॉर्ड स्वतःच मोडतो.तो स्वतःच स्वतःशी स्पर्धा करतो व विश्वविक्रम बनवतो.


   एकूणच ह्या ५ गोष्टीनी  तुम्ही तुमच्या मनातून हे काढा की,ऑलिम्पिक खेळाच्या स्पर्धा खूप अवघड असतात आणि त्या आपण पूर्ण करू शकत नाही.ऑलिम्पिक खेळापर्यंत तुम्ही निश्चित पोहचाल जर या ५ गोष्टी करायला सुरुवात केली तर.

तुम्ही माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात याबद्दल आपले धन्यवाद.🙏 🙏 🙏

ऑलिम्पिक खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स नक्की जॉईन करा.🙏 🙏 🙏


  

                                

                                          

टिप्पण्या

  1. Waw
    जबरदस्त ब्लॉग
    माया मॅडम
    तुमचा ब्लॉग म्हणजेमनातील भीतीवर रामबाण उपाय

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर ब्लॉग....👌👌👌👌
    खुप उपयुक्त टिप्स

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान . भीतीवर मात करण्याचे उपाय जबरदस्त

    उत्तर द्याहटवा
  4. जबरदस्त लिहीले आहे. या पाच गोष्टी आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी खूपच उपयोगी होतीलच.

    उत्तर द्याहटवा
  5. Khup chaan maya tai...
    Khup chaan watle vachun... Mala Pan kahi start Krayche ahe.. Fear ahe... Pan surwat krnar .. Blog wachun nkki ch chaan wattle.. God bless you

    उत्तर द्याहटवा
  6. जबरदस्त सुरुवात केली आहे खूप छान मांडणी केली आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय