ध्येयापर्यंत पोह्चवणाऱ्या जबरदस्त ३ गोष्टी

     




      भोगऐश्वर्याप्रसक्तानां तयापह्रतचेतसां/

     व्यासायित्मिका  बुद्धिः समाधो न  विधीयते/

                               - भगवद्गीता


     असे भगवद्गीतेत म्हटले आहे.जो व्यक्ती भोग आणि ऐश्वर्य याच्याशी attach होत जातो, तो समाधीत कधीच विलीन होत नाही.समाधीत म्हणजेच त्याच्या निश्चित अशा ध्येयापर्यंत,मग तो मध्येच भटकला जातो.थोडे यश प्राप्त झाले की, तिथेच त्याचे मार्ग संपतात.आता सर्व सुख प्राप्त केल्याची feeling त्याला समाधानी बनवते.माझ्याजवळ पैसा, गाडी, प्रसिद्धी,bankbalance सगळे काही आता मला मिळाले.आता मिळालेला पैसा  कसा वाया घालणार यावर जास्त लक्ष द्यायला सुरुवात होते आणि त्यामुळे अनेक वाईट संगतीत लागतो,व्यसनाधीनता वाढते.आणि एकूणच ध्येयापासून तो दूर भटकतो आणि कुठेतरी त्याचा मार्गच बदलतो.तुम्ही पण असे अनेक खेळाडू पाहिले असतील तुमच्या आजूबाजूला.खेळाडूच नाहीतर अशा अनेक व्यक्ती ज्या थोड्याश्या यशाला भुरळून वाहत जातात.मग नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्याचसाठी.

     नमस्कार,मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.

    चला तर मग,भोग , ऐश्वर्य याच्याशी attach न होता आपण आपल्या ऑलिम्पिकच्या  ध्येयापर्यंत कसे पोहचणार.त्यासाठी मी तुम्हाला फक्त तीनच उपाय सांगणार आहे ते तुम्ही नक्की अवलंबा.

१)आंधळे व्हा :

    होय, तुम्हाला आंधळे व्हावे लागेल.तुम्हाला फक्त तुमचे  ध्येय दिसायला हवे.आजूबाजूला काय चाललयं याकडे पाहायला तुम्हाला वेळ  नसायला पाहिजे.

उदा. Michael Phelps हा २००८ च्या ऑलिम्पिक मध्ये उतरला असताना 100 मी.मध्ये गोल्ड मेडल,२०० मी.मध्ये पण गोल्ड घेतो ज्यावेळेस तो 400 मी.बटरफ्लाय स्पर्धेमध्ये उतरतो तेव्हा तो २०० मी.अंतर पार करतो आणि त्याचा डोळ्यांचा गोगल crack होतो. त्याला काहीच दिसत नाही,डोळ्यात पूर्ण पाणी जाते,डोळ्यात पाणी सतत टोचत असते,पण त्याला आजूबाजूला काय चाललयते काहीच दिसत नाही. त्याला दिसते ते फक्त त्याचे ध्येय 400 मी.ची ती रेष जी त्याला कोणत्याही परीस्थितीत पार करायची होती.आणि Yes तो 400 मी. ला पोहचतो आणि गोगल काढून पाहिल्यास त्याला Finish Line World Record एवढेच दिसते.आणि जगातील सगळ्यात जास्त २८ गोल्डमेडल मिळवणारा तो एकमेव Athelete बनतो. 


म्हणूनच आपल्या ध्येयासाठी आपण आंधळे व्हायला  हवे.आजूबाजूला किती negative गोष्टी घडतात याकडे लक्ष देऊ नका.केवळ आपल्या ध्येयाच्यामागे सपाटून लागा निश्चित तुम्हाला ते मिळेल.

2) भीतीला गिळून टाका :

आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की, भीती ही खूप वाईट असते  आणि ती भयानक असते.


 "तुम्ही ज्याच्यापासून दूर पळता तीच गोष्ट तुमच्या समवेत दीर्घकाळ राहते" लेखक चक पाला न्युक यांनी  Invisible Monsters Remix या पुस्तकात म्हंटले आहे.

आपल्याला लहानपणापासूनच अनेक गोष्टींची भीती वाटत असते. त्यामुळे आपण त्या गोष्टीपासून दूर दूर पळतो आणि आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव घेता येत नाही, कारण भीती आडवी येते.

मला नाच करायची आवड आहे, परंतु लोक काय म्हणतील याची भीती. मला गायन करायची आवड आहे,परंतु घरातले काय बोलतील याची भीती. मला सर्फिंग करायची आहे, परंतु समाज काय म्हणेल याची भीती. मला अभिनय करायचा आहे, परंतु मित्र  मैत्रिणी काय म्हणतील याची भीती. अशा अनेक नाना तर्‍हेच्या भीती आपल्या मनात आपण बाळगत असतो.

जर आपण या भीती लाच आपलेसे केले आणि त्या भीतिलाच गीळून टाकलं तर. भीती शिल्लक राहणारच नाही. आपणच आपल्या मनाची समजूत घालत असतो, मनाला समजावत असतो की, तुला याची भीती वाटत आहे. परंतु आपल्या मनाला भीती ही भावनाच माहिती नाही.कारण भीती ही अदृश्य आहे.

उदा.Alex Honald याने २०१७ मध्ये ३००० फुट उंचीची Al Capitan ही चढण कोणत्याही दोरखंडाशिवाय चढतो  

३)संकल्प करा :

आपण आपल्या ध्येयापर्यंत जातो ते केवळ संकल्पामुळेच.संकल्प हा एक संस्कृत शब्द आहे.तुम्ही तुमच्या हृदयाने आणि मनाने एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी  केलेली अर्थपूर्ण कृती म्हणजेच संकल्प  होय.


आपल्याला आपला संकल्प च आपल्या उद्दिष्टापर्यंत घेऊन जातो.म्हणजेच तुम्हाला तुमच्या कृतीतील का हा माहिती पाहिजे.तुम्हाला तो का सापडला की, निश्चितपणे तुम्ही तुमचे ध्येय गाठता.पण फक्त संकल्प करणे अर्थातच पुरेशी गोष्ट नाही तर त्यासाठी तुम्हाला सतत त्याची जोपासना करावी लागेल,सतत वास्तवात तुमच्या संकल्पाला धरून  कृती करावी लागेल.

उदा. मला सांगा जर आपल्याला आपल्या कार्यालयात एखादे extra काम सांगितले तर आपन अनेक करणे पुढे करतो परंतु जर आपल्या मुलाचा वाढदिवस असेल तर,आपल्याला दिवसभर आणि रात्र भर जरी काम केले तरीही आपल्याला कंटाळा येत नाही,म्हणजेच ते काम करण्यामागे आपल्या मन आणि ह्रुद्य जुडलेले असते तसेच जर आपण आपल्या प्रत्येक ध्येयाशी मानाने आणि हृदयाने जर जुडले गेलो तर निश्चितच आपल्याला कारण दिसणार नाहीत .

म्हणजेच आपल्या ऑलिम्पिकच्या ध्येयाशी आपण मन आणि हृद्याने जुडले पाहिजे,तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहचणार.

ह्या जबरदस्त ३ गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहचवतील,ह्याचा अवलंब करायला सुरुवात करा आणि परिणाम तुम्हीच अनुभवा.तुमचे ध्येय निश्चित पणे लवकरच तुम्हाला प्राप्त होईल.परंतु ह्यात सातत्य हवे.

माझा पूर्ण ब्लॉग वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.🙏 🙏

माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच like,Comments,आणि share करायला विसरू नका.

ऑलिम्पिक संदर्भातील अधिक माहितीसाठी माझा मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स हा फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप नक्की जॉईन करा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय