Inner Balance काय असते
क्लेब्यं मा स्म गमः पार्थ नेतृत्त्तव्य्युपपद्धते/
क्षुद्रम दद्द्य्दौर्ब्ल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप//
असे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हटले आहे.याचा अर्थ आहे की,अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, हे भगवान या युद्धभूमीवर माझ्यासोबत लढायला कोण कोण आले आहेत हे मला पाहायचे आहे. तेव्हा माझा हा रथ युद्धभूमी च्या मधोमध घेऊन चला, जेणेकरून मला माझे विरोधी सगळे स्पष्टपणे दिसतील. तेव्हा सारथी असलेल्या श्रीकृष्णाने रथाला युद्धभूमीवर मधोमध घेऊन जातात. तर अर्जुनाला त्याच्यासमोर युद्धभूमीवर सगळे त्याचे आप्तेष्ट दिसतात. तेव्हा अर्जुनासारखा सर्वोत्कृष्ट धनुर्धारी घायाळ होतो, व्याकूळ होतो, भावनावश होतो आणि रडायला लागतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना (क्लेब्यम)असा नपुसंकासारखा करू नकोस तुझ्यासारख्या सर्वोत्कृष्ट क्षत्रियाला हे शोभत नाही.हे अर्जुना, तू युद्धभूमीवर आहेस तुझ्या समोर जे कोणी असतील ते सगळे आता तुझे शत्रू आहेत. तू लढ.तू असा रडू नकोस, व्याकूळ होऊ नकोस. तू तुझ्या शरीराने तर तंदुरुस्त आहेस, परंतु तू तुझ्या मनाने तंदुरुस्त नाहीस, स्वस्थ नाहीस आणि मनाने स्वस्थ असणे हे खूप गरजेचे आहे.शरीरापेक्षा मन स्वस्थ असणे गरजेचे असते.शरीरापेक्षा ती कृती अगोदर मनात होत असते म्हणून मनाला स्वस्थ कर हे अर्जुना.
तुमच्या पण मनाचा स्वस्थपणा हरवतो का ? मन खेळामध्ये तंदुरुस्त,स्वस्थ वाटत नाही का? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार,मी माया दणके माझे मिशन आहे,येत्या 2024 च्या पॅरिस ऑलम्पिक मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर खेळाडू पाठवणे.
तुमच्या Inner Balace ला balanced ठेवणे आवश्यक आहे.मी पाहिले आहे की,बरेच खेळाडूंमध्ये हे balance नेहमी ढासळलेले दिसते.छोट्यामोठ्या यशापयशाला पचवण्याची ताकद खूप कमी असते.त्यामुळे बरेचसे खेळाडूंना आपल्या carrier मध्ये success मिळवता येत नाही. ते balanced ठेवण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी सातत्याने कराव्या लागतील.
१)कृतज्ञता :
ह्या पृथ्वीतलावर तुम्ही जन्म घेता ते तुमच्या हातात आहे का?तर नक्कीच नाही.तुम्ही कुठे, कसे,केव्हा,कोणत्या परिस्थितीत जन्मणार हे सुद्धा तुमच्या हातात नाही.हे सर्व त्या ईश्वराच्या हातात आहे.तुम्ही कधी मरणार हे सुद्धा तुमच्या हातात नाही.तुम्हाला ह्या निसर्गाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता मानायची आहे.हा ईश्वर आपल्याला सुंदर निसर्ग ,शुद्ध हवा,पाणी,अग्नी,पाहिजे तेव्हा उपलब्ध करून देतो.ईश्वराने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल हवा ,पाणी,निसर्ग,नातेवाईक, घर, जमीन,हे दिलेले सुंदर सुदृढ शरीर,श्वास,शरीरातील प्रत्येक अवयव,अशी प्रत्येक गोष्ट जी मला ईश्वराने कुठल्याही मोबदल्याविना दिली आहे.
तुम्ही ही कृतज्ञता मानायला सुरुवात केली तर, तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, ती फक्त प्रामाणिक पणे ह्या ईश्वराला मागा नक्कीच ती तुम्हाला मिळेल.ही ह्या कृतज्ञतेची जादू आहे.मी स्वतः गेले बरेच दिवस झाले ह्या कृतज्ञतेची ही जादू अनुभवत आहे.
तुम्हाला ह्या कृतज्ञतेची जादू जाणून घ्यायची असेल तर,नक्कीच Secret हे Rhonda Byrne ह्यांचे पुस्तक नक्की वाचा.
२) भीतीवर हसा :
मैदानात स्पर्धेच्या वेळी आपली किती घाबरगुंडी सुटते. जर तुम्हाला १००/२०० मीटर पळायचे आहे, ती ॲक्शन घ्यायची आहे, हा विचार करूनच तुम्हाला घाम सुटतो.तुमच्या शरीरातील न्यूरॉन्स मधील रक्तप्रवाहाचा वेग खूप वाढतो. आणि भीतीमुळेच ती स्पर्धा तुमच्या हातून ती स्पर्धा निसटून जाते.जर तुम्ही त्या भीतीच्या क्षणाला सहज हसतखेळत स्वीकारले, तर निश्चितच ते यश तुमचे असेल.पण आपण उगीचच घाबरतो.
Usain Bolt जगद्विख्यात खेळाडू हा जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा त्याचा मूड अगदी आनंदी, उत्साही आणि मौजमध्ये असतो.त्याच्या अशा वागण्यावर अनेक संशोधन पण झाले आहे.स्पर्धेच्या अगोदर Get,Set,Go,.1.2.3...असे म्हणण्याच्या अगोदर तो खूप हसतो, आनंदी होतो आणि त्या क्षणाला तो कधीच tense मध्ये नसतो,त्या क्षणाला तो खूप enjoy करतो.म्हणूनच ती स्पर्धा त्याची होते.परंतु त्याच्याच सोबतचे इतर खेळाडू हे त्यावेळी खूप घाबरलेले,भ्यायलेले आणि चिंताग्रस्त असतात,ते हसतखेळत आव्हानाला स्वीकारत नाहीत.त्या भीतीवर हसायला सुरुवात करा. निश्चित ती भीती तुम्हाला घाबरून पळून जाईल.ती भीतीच तुमच्यातील क्षमताना नाहीसे करत असते.
३) ध्यानधारणा :
कोणत्याही स्पर्धेच्या अगोदर ध्यानधारणा करा.ही ध्यानधारणा फक्त पाच मिनिटांची केली तरीही चालेल.ध्यानधारणा अनेक वेगवेगळ्या प्रकारे करता येते.
जसे,१)अनपानसती ध्यान - यामध्ये तुम्हाला तुमच्या श्वासाचे निरीक्षण करायचे आहे.हे ध्यान करणे खूप सोपे आहे.2)Spiritual Meditation _ यामध्ये तुम्ही कोणतीही एक प्रार्थना म्हणत त्यावर concentrate करायचे आहे. ३)Focused Meditation - यामध्ये तुम्हाला तुमच्या पंचेद्रीयांवर concentrate करायचे आहे.हे ध्यान थोडेसे अवघड आहे.परंतु सरावाने ते शक्य आहे. ४)Mantra Meditation - यामध्ये एखादा मंत्र म्हणत त्यावर concentration करायचे आहे. ५)Dynamic Meditation :हे थोडे आधुनिक ध्यानाचा प्रकार आहे.
ह्या प्रकारांपेकी तुम्ही कोणताही एक ध्यान करू शकता आणि स्वतः च्या मनाला स्वस्थ ठेवू शकता.ध्यान करण्याने तुमचे concentrate केवळ स्पर्धेवर राहील,स्पर्धेबाबत वाटणारी भीती पण पळून जाईल.आणि तुमचे Inner Balace हे balanced राहील.
४)Visualisation :
तुम्ही त्या स्पर्धेत यश प्राप्त केले आहे,तुम्ही ती स्पर्धा यशस्वीपणे पार पडली आहे,सर्व लोक तुम्हाला congratulate करत आहेत,तुमचे अभिनंदन करत आहेत,असे चित्र डोळ्यासमोर आणा.तुमच्या मनाला तीच दिशा दाखवा जी तुम्ही आता visualise केली.visualisation तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा तुम्ही तसा विचार प्रामाणिकपणे तुमच्या मनात उतरवाल.इथे प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे,तरच तुम्हाला त्याचा effect जाणवेल.
Ann Ashworth ही Comrad Marathon Winner 2018 ही तिच्या घेतलेल्या मुलाखतीत म्हणते की,जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती अगोदर स्वप्नात उतरावा,नंतर मनात मग ती गोष्ट नक्कीच तुमची होते.माझ्या यशामागे visualization चाच सगळ्यात मोठा भाग आहे, असे ती म्हणते.
म्हणून तुमच्या Inner Balance साठी visualiztion करायला सुरुवात करा.नक्कीच ती स्पर्धा तुमचीच ठरेल.
५)The Power Of Now :
तो एक क्षण खुप मोलाचा असतो त्याच क्षणात स्वतः ला ठेवा विनाकारण भूतकाळाचा विचार करत बसू नका.तो क्षण तुमच्या हातून निसटला तर तो क्षण परत कधी येईल हे माहित नसते यासाठी त्या क्षणाचा पुरेपूर वापर करा.मी कालचा दिवस घालवला त्यापेक्षा कितीतरी सुंदर आजचा दिवस मला आज करायचा आहे.
तुम्ही LanceArmstrong याचे Every Second Counts हे पुस्तक वाचा नक्कीच तुम्हाला एक एक क्षण किती मौल्यवान असतो याचा अंदाज येईल.
तसेच The Power Of Now हे Vokart Toley यांचे पुस्तक वाचा अप्रतिम पुस्तक आहे.मग तुम्ही तो तुमच्या हातातील तो क्षण कधीच सोडणार नाही,ही माझी खात्री आहे.म्हणूनच स्पर्धेतील तो क्षण जो तुम्हाला यश मिळेल किंवा अपयश परंतु तो क्षण पुरेपूर जगा.
स्पर्धेच्यावेळी तुम्ही तुमचे Inner Balance टिकवण्यासाठी हे उपाय तुम्हाला कसे वाटले नक्कीच कळवा.तुम्ही ह्या गोष्टींचा अवलंब सुरु केलात तर नक्कीच तुमचे Inner Balance संतुलित होईल आणि तुम्ही स्पर्धेत कितीही वाईट प्रसंग आले तरीही,खचून जाणार नाही.मी अशा अनेक खेळाडूना पहिले आहे, जे एखाद्या स्पर्धेत हरल्याने पूर्णपणे खचून जातात.
माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.आता पटापट comments करा like करा आणि share पण करा.
ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स नक्की जॉईन करा.






सुंदर ब्लॉग. भगवद्गीतेतील श्लोकाची सुरुवात आणि उदाहरण अतिशय सुंदर. फक्त खेळाडूंसाठीच नाही सर्वांसाठी उपयुक्त असा हा ब्लॉग आहे
उत्तर द्याहटवाखूपच छान मायाताई एकदम सोप्या शब्दात समोरच्याला समजेल असा हा ब्लॉग तुम्ही लिहिलेला आहे त्याबद्दल मी तुमचे खरच खूप खूप धन्यवाद 💐💐🙏
उत्तर द्याहटवाKhup chan blog 👍👍
उत्तर द्याहटवामायाताई, हा तुमचा ब्लॉग खरोखरच छान लिहीला आहे. या मध्ये सुचवलेल्या टिपा खरोखरच उपयुक्त आहेत. धन्यवाद.
उत्तर द्याहटवाखुप छान लिहिलंय आहे.
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर ब्लॉग मॅडम अतिशय छान टिप्स
उत्तर द्याहटवाThank you