मुलांकडून अवास्तव अपेक्षा का ?
तुम्हालाही होते का असे? आजकाल आपण आपल्या मुलांशी खूप कमी वेळ संवाद साधतो हा विचार कधी केलात का तुम्ही? आपली मुले इतकी अबोल का झालीत ? हा विचार केलात का कधी?मुलांना खूप काही बोलायचे असते पण आपल्याकडे वेळ नसतो असे का ? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का ? तर नक्कीच हा माझा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे की ,येत्या २०२४ च्या Paris ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.
तुम्ही तुमच्याच चिंतेत, कामात,कुठल्यातरी कृतीत व्यस्त असता आणि तुमचे scedule खूप busy असते.पण तुमच्या मुलांना वेळ द्यायला तुमच्याकडे वेळच नाही त्यामुळे मुलाकडून अवास्तव अपेक्षा करतो .तर खालील कृती करायला सुरुवात केली तर निश्चितच तुम्ही तुमच्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा करणे सोडून द्याल.
१)मुलांशी संवाद साधा :
आजकाल ह्या सोशल मेडियाने काय जादू केली माहित नाही आपण एकमेकंशी बोलणेच विसरून गेलोत.संवाद हाच आपल्या भावना व्यक्त करण्याचे मध्यम आहे मग संवादाची भाषा कोणतीही असो.मुल लहान असताना जर आपण त्याच्याशी वारंवार संवाद साधत असू तर मुले लवकर बोलती हातात,हे आपल्याला माहित आहेच.काही काही घरांमध्ये मी पाहते की,संवादाच्या कमतरतेमुळे मुले एकलकोंडी बनलेली आहेत.मुलांचे ऐकून न घेतल्यामुळे त्यांना आपण ग्राह्य धरतो कोणत्याही गोष्टीत मुलांना ग्राह्य धरायची सवय आपल्याला लागते.
तर मुलांशी संवाद साधत नसू तर त्यांना जे काही बोलायचे आहे ते बोलू शकणार नाहीत मग ते टीव्ही ,मोबईल,यांचा आधार घेतात. यासाठी मुलांशी संवाद साधा आणि त्यांच्या भावना समजून घ्या.
2)मुलांना मोकळे खेळू द्या :
मुलांच्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम हे त्यांच्या कृतीतून,शारीरिक हालचालीतून,बोलण्यातून ,ओरडन्यातून वगेरे असते.पण मुले ओरडली,नाचायली,खिदळायली,की आपण त्यांच्यावर ओरडतो त्यांना जी कृती करायची असते त्यापासून तुम्ही त्यांना रोखतो, कारण तुम्ही मुलानाही तुमच्याच वयाचे ग्राह्य धरलेले असते त्यामुळे मुलांकडून अवास्तव अपेक्षा असतात.त्यामुळे मुलांमध्ये शारीरिक व्याधींचे प्रमाण खूप वाढले आहे.२००७ नंतर मुलांमध्ये शारीरिक व्याधींचे प्रमाण खूप वाढले आहे.
याउलट मुलांना मोकळे खेळू द्या त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या कृतीतून त्यांच्या भावना व्यक्त करू द्यात.तरच मुले fresh राहतील.
३)इतरांशी तुलना नको :
शेजारचा अमक्या तमक्या खूप छान खेळतो National वगेरे काय तर झाले मग तुझ्यात त्या abilities का नाहीत तूसुद्धा तसेच व्हायला हवे.अशी अपेक्षा तुम्ही तुमच्या मुलांकडून करता.इतरांशी तुलना करतो मग तो किती वयाचा आहे किंवा तुमच्या मुलात ते गुण आहेत का? याचा विचार पण तुम्ही करत नाही.तुमच्या मुलाची इतरांशी तुलना करू नका. तुमच्या मुलाला कशाची आवड आहे, त्यात कोणते गुण आहेत हे आधी पहायला हवे.इतराशी तुलना केल्याने मुलांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होते,द्वेष निर्माण होतो.तुमच्या मुलांच्या कलागुणांना वाव देऊन अवास्तव अपेक्षांचे ओझें त्यांच्यावर थोपवू नका.
४)सर्वांसमोर मुलांना रागावू नका :
मुलांना पण भावना असतात हे आपण विसरून च गेलो आहोत.जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर तुम्ही मुलांना रागवता तेव्हा त्याला ही अपमानाची भावना निर्माण होते.तुमच्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण होते.त्यासाठी मुलांना एकट्यात गोडीने प्रेमाने समजून सांगा मुले ऐकतात आणि त्यांना आनंद पण वाटतो की ,तुम्ही त्याला इतरासमोर रागावले नाही.
५)निर्णय घेण्यासाठी सज्ज करा :
तुम्ही जर तुमचे परीक्षण केले तर असे दिसून येईल की,तुमच्या मुलांच्या लहानपणापासून ते त्यांच्या carrier पर्यतच्या प्रवासातील सगळे निर्णय तुमचेच आहेत.तुम्ही फक्त त्यांना तुमचे निर्णय झेलण्यासाठी मुलांना सज्ज केले आहे.त्यामुळे मुलांमध्ये स्वतः च्या कृतीबद्दल विश्वासच नसतो.
तोच विश्वास आणण्यासाठी तुम्हाला त्यांना लहानपणापासुनच स्वतः चे निर्णय स्वतः घेण्याची सवय लावायला हवी.मग अगदी छोटे छोटे निर्णय असले तरी.
मग तुम्ही मुलांकडून अवास्तव अपेक्षा करणार नाही.
तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्यासारखीच मोठी व्यक्ती समजता आणि त्यांच्या डोक्यावर अवास्तव अपेक्षांचे ओझे टाकता. तुमचे मुल हे ८ वर्षांचे असेल तर त्याच्याकडून ३८ वर्षाच्या व्यक्तीने कसे वागायला हवे त्याची तुम्ही अपेक्षा करता.तुम्ही लक्षातच घेत नाही की,तो केवळ ८ वर्षाचे लहानसे बाळ आहे त्यामुळेच तुम्ही तुमच्या मुलांशी मुक्तपणे संवाद साधू शकत नाही.
कसे वाटले हे उपाय नक्की सांगा ,खाली comments box मध्ये comments करा.
माझा हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद .
ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स हा ग्रुप नक्की जॉईन करा.







Maya mam khoopch sunder vastav dakhun dile ahe. Great👍👍
उत्तर द्याहटवाखूप छान आहे तुमचे विचार
उत्तर द्याहटवाVery nice blog
उत्तर द्याहटवाThank you madhura
हटवाVery Nice... Every parents loves there kids, but because of lack of awareness, unintentionally they heart their kids... This will help a lot... Thanks for Sharing good thoughts
उत्तर द्याहटवाWa मायताई, किती सहज आणि सुंदरपणे मांडलत
उत्तर द्याहटवाजबरदस्त
खूप छान लिहिला आहे ब्लॉग मायाताई.
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेखन माया madam. I just loved it. ❤️❤️❤️
उत्तर द्याहटवाKhup sunder
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर लिहिले आहे मायाताई.अप्रतिम लिहिलं आहे.
उत्तर द्याहटवाThanks dear Pranita Tai
हटवा