तुमच्या अंतर्मनातील अदृश्य कलात्मकता
एक दंतकथा सांगते की,एक महिला पिकासोला बाजारात पाहते आणि त्याच्याजवळ जाऊन म्हणते की, पिकासोजी माझ्यासाठी एक चित्र तयार करून द्याल का ? त्यावर पिकासो तयार होतो आणि त्याने अवघ्या ३० सेकंदात एक सुन्दरसे चित्र त्या महिलेच्या हातात ठेवतो आणि सांगतो ह्या चित्राची किमंत ३० हजार डॉलर आहे.त्या महिलेला आश्चर्य वाटते ती म्हणते तुम्ही तर केवळ ३० सेकंदात हे चित्र तयार केले आणि एवढी मोठी किमंत माझ्याकडून कशी काय वसूल करू शकता ? त्यावर पिकासो म्हणतो,मला ह्यासाठी ३० वर्ष घालावी लागली आहेत. त्यामुळेच मी ३० सेकंदात अशी कलाकृती तयार करू शकलो.
आपल्याला कोणत्याही गोष्टी मागच्या परिश्रमाचे मोल वाटत नाही,सातत्याने तुम्ही त्यावर काम करायला हवे तर त्यात तुम्ही प्रवीण होऊ शकता,तुम्ही त्यात मास्टर होऊ शकता.आपल्या सर्वांकडेच अंतर्यामी एक अशी बुद्धिमत्ता असते. तिथपर्यंत आपण पोहचतच नाही.कारण ती अदृश्य असते ती अदृश्य कलात्मकता आपल्या थेट दिसणाऱ्या दृश्य मार्गावर नसते.जो त्या अदृश्य कलात्मकतेला आपलेसे करतो त्याला जीवनाचे पूर्ण समाधान,अर्थपूर्णता,आणि सर्वकाही मिळते.
तुम्हाला पण तुमच्या अदृश्य कलात्मकतेला शोधायचे आहे का ? तुमच्यात खरेच कोणता खेळ लपलेला आहे हे शोधायचे आहे का ? कोणत्या खेळाची कलात्मकता दडलेली आहे ह्याची तुम्हाला जाणीवच होत नाही.तुमच्यातल्या खेळाडूला तुम्ही कसे ओळखाल? असे प्रश्न तुम्हाला सतत पडत असतील, तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
पिकासोने ज्याप्रमाणे त्याच्या जीवनाची ३० वर्ष त्याच्या चित्र काढण्याच्या कलेसाठी घालवली म्हणूनच तो अवघ्या ३० सेकंदातच सुन्देरसे चित्र काढू शकतो.म्हणजेच सातत्याने ती कला त्याने जोपासली आणि वाढवली,त्या कलेवर सातत्याने प्रेम केले.
१)अंतर्मनाची हाक :
तुमच्या उत्कट इच्छेला कोणत्या खेळाची आवड जाणवते,अगदी मनापासून कोणता खेळ तुम्हाला आत्मिक समाधान देतो,जो खेळ खेळताना तुम्हाला आतून खूप आनंद ,समाधान वाटते ,असाच खेळ निवडा.तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची हाक ऐकण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनापर्यंत जाणे आवश्यक आहे. अंतर्मनापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला दररोज ध्यानधारणा करावी लागेल.मुलांना ध्यानधारणा शिकवून रोज किमान ५ मिनीट करायला सांगा.फक्त मुलेच नाहीतर प्रत्येकाने ध्यानधारणा करणे आवश्यक आहे.
मी पाहिलेले आहे की,बरेचसे पालक इतर मुलं जो खेळ खेळतात तोच खेळ आपल्या मुलाने पण खेळायला हवा अशी जोरजबरदस्ती मुलांवर करतात. मुलांची आवड किंवा इच्छेचा तिथे विचारच होत नाही.यामुळे मुलांना जो खेळ आवडतो तो न खेळता इतर खेळ खेळावे लागतात आणि त्यांच्या मनातून तो न खेळल्यामुळे त्याचा performance पण तितकासा समाधानकारक होत नाही.तुम्हाला कोणता खेळ आवडतो,तुम्ही कोणता खेळ खेळू इच्छित होता,त्याचीच जबरदस्ती तुम्ही तुमच्या मुलांवर टाकत असता,तीच तुमच्या मुलांची आवड बनते मग त्यांना तो आवडला नाही तरीही चालेल.
म्हणूनच मुलांना ते freedom द्या की, ते त्यांच्या आवडीनुसार आणि छंदानुसार खेळ निवडतील आणि ते त्यांच्या अंतर्मनाची हाक ऐकतील.त्यांना कोणत्या गोष्टीत आनंद मिळतो तीच गोष्ट त्यांना करू द्यात.मग खेळ असो किंवा इतर कलाप्रकार.
२)सातत्य :
तुम्हाला जे साध्य करावयाचे आहे त्यात सातत्य असायला हवे.वरती सांगितलेली पिकासोची गोष्ट तुम्हाला हेच सांगते की,कोणत्याही कौशल्यात सातत्य हवे तरच तुम्ही त्यात निपुण बनता तरच ती तुमची कलात्मकता बनू शकते आणि ती कलात्मकता तुमची इच्छाशक्ती बनते.तुमच्यातील इच्छेला सातत्याची साथ दिली तर नक्कीच ती इच्छा तुमचे कौशल्य बनते.
मायकेल जॉर्डनला सातत्याने मिळवलेल्या कौशल्याने त्याला अशा उंचीवर नेऊन ठेवले की, त्याच्या त्या कौशल्याने मायकेल जॉर्डन ला The God Of Basketball बनवले.सातत्याने दररोजची १०ते१२ तास basketball सराव केला,म्हणूनच तर तो जगजेत्ता खेळाडू बनला.
केवळ सातत्याच्याच जोरावर तुम्ही कोणत्याही गोष्टीत प्राविण्य प्राप्त करू शकता.ते कौशल्य आपलेसे करू शकता.
३)इच्छा आणि आवड दोन्हीही असलेले खेळालाच प्राधान्य :
८ वेळेस Grand Slam जिंकलेला आंद्रे आगासी साऱ्या जगाला त्याच्या आत्मचरित्राद्वारे सांगतो की, जर तुमची इच्छा आणि आवड असेल तरच तो खेळ तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवतो की,तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही.प्रत्येक खेळासाठी आतून उत्कट इच्छा यायला हवी तरच त्याचा performance प्रेक्षकाचे मन जिंकून घेतो.मी माझ्या tennis खेळाला माझ्या उत्कट इच्छेत रुपांतरीत केले आणि tennis ने मला जगज्जेता बनवले.तुम्हाला ज्या खेळात आवड आहे असेच खेळ तुम्ही निवडा,अशाच खेळांना आपलेसे करा.तुम्हाला तो खेळ अत्युच्च उंचीवर घेऊन जाईल.म्हणून पालकांनी पण मुलावर जबरदस्ती करून कोणतेही खेळ लादु नयेत.
याचाच अर्थ असा की,तुमची आवड आणि उत्कट इच्छाच तुम्हाला तुमच्या खेळातील मास्टर बनवत असते.तुमची प्रबळ इच्छा तुम्हाला त्या खेळात यशस्वी बनवत असते.
४)प्रसिद्धीच्या मागे धावू नका :
छोट्या यशात पण तुम्हाला प्रसिद्धी हवी वाटते,त्यासाठी तुम्ही अनेक वेगवेगळ्या मिडिया चा आधार पण घेता.अनेक सोशल मीडियाच्या आधारावर स्वतः ला सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असतो,आणि ती प्रसिद्धी जर मिळाली नाही तर निराशा पण पदरी पडते.म्हणजेच तुमचा आनंद हा पूर्णपणे तुम्ही दुसर्यावर अवलंबून ठेवला आहे.जर तुम्हाला इतरांनी म्हत्व दिले तरच तुम्ही आनंदी राहता नाहीतर आत्महत्या,निराशा,आजारपण,दुःख ह्यांना तुम्ही आपलेसे करता.
ह्यासाठी कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे पळू नका,स्वतः वर विश्वास ठेवा,स्वतः च्या कृतीवर विश्वास ठेवा,तुम्हाला यश तर प्राप्त होईलच शिवाय तुम्ही करत असलेल्या कामाचे समाधान,आनंद,तुमच्या खेळावर तुमचे प्रेम जडेल,तोच खेळ तुम्हाला आपोआप प्रसिद्धी देईल.ह्यासाठी प्रसिद्धी माध्यमाच्या मागे धावू नका.
निश्चितच ह्या गोष्टी जर तुम्ही दररोज नित्यनियमाने करायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या अंतर्मनात जाऊन तुमच्या अदृश्य कलात्मकतेला तुम्ही खरा न्याय देऊ शकता.
माझा हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.🙏 🙏 🙏
ऑलिम्पिक खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स हा ग्रुप नक्की जॉईन करा.




Thank you maya madam .khup avashyak mahiti ahe.
उत्तर द्याहटवाVery Important points... Many talented players are ending up their career in glamorous approach...
उत्तर द्याहटवाThank you so much sir
हटवाखूपच छान info! .
उत्तर द्याहटवा4points खूपच मार्गदर्शन करणारे आहेत.
Thank you Maya madam
Thanks dear 😊
हटवाखूपच छान माहिती दिली आहे
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिले आहे.
उत्तर द्याहटवाअतिशय उत्तम मार्गदर्शन
उत्तर द्याहटवा