भौतिक गोष्टींमध्ये खरेच आनंद आणि समाधान असते का?

 


एकदा मी दक्षिण भारतातील प्रमुख तीन पवित्र मंदिरांपेकी एक असलेल्या श्रीरंगपुरमधील एका मंदिराला भेट दिली.तिथे मंदिराच्या छतावरच्या नाजूक कलाकुसरीच्या नक्षीला सोन्याचा मुलामा चढवत असलेल्या एका कामगारांशी माझी भेट झाली. मी त्याआधी असे काही काम कधीही पाहिले नव्हते, म्हणून मी ते काम बघत तिथेच उभा राहिले. पण वर नजर टाकल्यावर सोन्याची पूड माझ्या डोळ्यात उडाली .मी डोळे धुण्यासाठी मंदिरातून धावतच बाहेर पडले ,त्यानंतर पुन्हा परतल्यावर मी सुरक्षित अंतर ठेवून मी पुन्हा ते काम पाहू लागले. हा अनुभव मला खूप काही शिकवून गेला, एखाद्या ग्रंथातील धड्याचे पान फाडून आणल्यासारखे वाटले.   


        

           सुवर्णपूड सुंदर असते, पण तिच्या फार जवळ गेले तर ती तुमची नजर अंधुक बनवते.मंदिरांना दिला जाणारा मुलामा हे प्रत्यक्ष घनरूप सोनं नसतं, ती एका द्रावणात मिसळलेली सुवर्णपुड असते.ती एक माया असते,दगडांना झाकून टाकून ते एक घनरूप सोनच आहे असे आपल्याला वाटावे,यासाठी दगडांना सोन्याचा मुलामा दिला जातो.तो एक आभास असतो,त्याप्रमाणेच पैसा आणि प्रसिद्धी हा पण एक आभास आहे,मायावी जाल आहे.जो ह्या मायावी जाल,नकली मुलाम्यात  अडकतो तो चिंता,दुःख,आणि त्रासाने कंटाळून जातो.जीवनभर त्या सोनेरी नकली मुलाम्यामागेच धावत राहतो त्याला शेवटी काहीच मिळत नाही.

तुम्ही पण पैसा प्रसिद्धीच्या मागे लागले आहात का ?चिंता दुःख त्रासाने कंटाळून गेला आहात का ?सोनेरी नकली मुलाम्यामागे धावल्याने तुमच्या हाती काहीच मिळत नाही का ?तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

नमस्कार मी माया दणके,माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympic मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे. 

१)भौतिक समाधान हे बाह्य असते :

तुम्ही १५ व्या शतकात सांगितल्या जाणाऱ्या कस्तुरी मृगाची गोष्ट ऐकलीच असणार आहे.संत कबीरांनी सांगितलेली ही कस्तुरीमृगाची गोष्ट  जंगलात सुगंध दरवळणारा कस्तुरी मृगाचे चित्त आकर्षित करते.स्वतः च्या बेंबीतच असणाऱ्या कस्तुरीची त्याला जाणीवच नसते.कस्तुरीच्या शोधात तो सारे जंगल पालथे घालतो,निष्फळपणे फिरत राहतो,आनंद आणि सौख्य समाधानाच्या शोधात फिरत राहतो.परंतु शेवटी कळते की,ते सारे तर त्याच्या आतच सामावलेले आहे.

मी पाहिले आहे की, बरेच खेळाडू थोड्याश्या यशाने इतके हुरळून जातात की,स्वतः च्या आनंदासाठी अशा भौतिक वस्तूंचा आधार घेतात.भौतिक समाधान हे बाह्य आहे,तुमचे सुख आणि आनंद तुमच्या चित्तातच सामावले आहे.तुम्हाला तुमच्या आत्म्याशी सलंग्न होण्यातच ते प्राप्त होऊ शकते.पैसा प्रसिद्धी हे केवळ तात्पुरते सुख देतात पण खरे समाधान तुमच्यातच सामावले आहे.

तुम्हाला थोडासा पैसा मिळायला सुरुवात झाली की, तुमचा  ७०,००० रु.किमतीचा आयफोन आता तुम्हाला boring वाटतो आणि तुम्ही नवीन फोन घेण्यासाठी जाहिराती बघता,त्यातही तुमचे समाधान होत नाही आणि असे खेळाडू ७०,००० रु.चा आयफोन बदलतात आणि दर महिन्याला आयफोन बदलतात.म्हणजेच तो आयफोन तुम्हाला आता आनंद देत नाही.


म्हणूनच भौतिक वस्तूच्या मागे धावू नका.

2)यशाच्या मागे धावू नका :

प्रत्येकाला असे वाटते की,मी जो खेळ खेळेल त्यात मला यश मिळायलाच हवे अशी तुमची धारणा आहे. नाहीतर सगळी मेहनत गेली पाण्यात,त्याचा काय फायदाच नाही,वेळ वाया जातो,खेळ खेळत बसण्यापेक्षा मी एखादी चांगली नौकरी केली तर चार पैसे मिळतील तर,अशी तुमची धारणा असते.तुम्हाला फक्त यश माहित असते.यश म्हणजेच पैसा मिळणे,यश म्हणजेच बंगला गाडी नौकर चाकर  असणे,यश म्हणजेच भरपूर बँक balance असणे,यशाची एवढीच व्याख्या आपल्याला माहित असते.

परंतु तुम्ही जो खेळ खेळता त्याने तुम्हाला आनंद मिळतो,आत्मिक समाधान मिळते,शांती  मिळते,मनाला सुख मिळते,आणि एक आत्मिक ऐश्वर्य मिळते याची जाणीवच तुम्हाला होत नाही.तुमच्या ह्या यशाच्या व्याख्येत केवळ भौतिक वस्तूंचाच समावेश आहे.


आजपासून ही यशाची व्याख्या बदलूया तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी प्राप्त होतील,जर तुम्ही तुमच्या मनापासून कोणताही खेळ खेळाल,मनापासून आनंदी झालात तर नक्कीच तुम्हाला पैसा प्रसिद्धी ह्या सगळ्या गोष्टी शुल्लक वाटतील.म्हणूनच यशाच्या म्हणजेच भौतिक वस्तूंच्या मागे धावू नका.

३)भावनांवर ताबा हवा :

तुम्हाला एखाद्या स्पर्धेच्या वेळी दुखापत झाली ,शारीरिक इजा झाली,मानसिक इजा झाली,सामाजिक इजा झाली,तर तुम्ही स्वतः ला तिथेच थांबवता किंवा झालेल्या घटनेवर विनाकारण चर्चा ,विचार,आणि झालेल्या घटनेला सतत पाघळ लावत बसता की, ज्यामुळे तुमचा वेळ किती वाया जात आहे ह्याची कल्पनाच तुम्हाला येत नाही.प्रत्येक क्षण खूप मौल्यवान आहे त्याचा पुरेपूर वापर करा,झालेल्या अपयशाला चघळत बसू नका,त्याचा काहीएक फायदा होणार नाही.याउलट नुकसानच जास्त आहे म्हणूनच झालेल्या अपयशाच्या पोथ्या परत परत वाचू नका.


स्वतः च्या भावनांवर ताबा ठेवा,कोणत्या प्रसंगाला कोणती कृती महत्वाची आहे ह्यावर लक्ष केंद्रित करा.तुमच्यावर अनेक आक्षेप झाले,अनेक आरोप प्रत्यारोप झाले तरीही,स्वतः च्या भावनांचा बांध कधीच फुटत कामा नये.डोपिंग मध्ये दोषी ठरवले गेले,एखाद्या स्पर्धेत अपात्र ठरलात,तरीही  तुम्ही परिस्थितीला कधीही दोष देऊ नका.तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा,आणि प्रत्येक क्षणाला आपलेसे करा.

४)तुमच्या लक्ष्यावर ध्यान :

तुम्ही सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनाची गोष्ट ऐकलीच  आहे ,जेव्हा गुरु द्रोणाचार्य सर्व धनुर्धारयाना झाडावरील पक्ष्यावर नेम धरायला सांगतात तेव्हा एक अर्जुन सोडला तर सर्व धनुर्धार्यांचे लक्ष स्वतः च्या ध्येयापासून हटले परंतु,अर्जुनाला केवळ आणि केवळ  त्या पक्षाचा डावा डोळाच दिसत होता जिथे अर्जुनाला बाण मारायचा होता.अर्जुनाने त्याच्या धेयायावरचे लक्ष हटू दिले नाही म्हणूनच अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हटले जाते.

तुम्हाला पण तुमच्या ध्येयावरचे लक्ष हटू द्यायचे नाही.शेवटपर्यंत स्वतः च्या ध्येयासाठी प्रयत्नरत राहायचे आहे.अनेक वेळेस अपयश येईल मार्ग बदल पण ध्येय बदलू नका.तुमच्या एकाच अशा ध्येयावर ठाम राहायचे आहे,तरच तुम्हाला तुमचे ध्येय सापडेल आणि भौतिक वस्तूंपासून तुम्ही आपोआप दूर राहाल.


 ५)छोटेशे यश भुलवणारे :

तुम्हाला तुमच्या मार्गावर चालत असताना अनेक छोट्या छोट्या गोष्टी सुखावणारया असतील, आनंद देणाऱ्या  असतील,यशाची अनुभूती देणाऱ्या असतील,पण एक लक्षात ठेवा तुमचे ध्येय ऑलिम्पिक पर्यंत पोहचणे आहे.तुम्हाला National,International ला यश मिळाले की,त्यातच समाधान मानून तिथेच थांबू नका ,त्या छोट्याश्या यशाला भुलून जाऊ नका,तेच छोटेशे यश भुलावणी देणारे ही ठरू शकते.मी छोटेशे यासाठी म्हणत आहे कारण की,तुमचे मुख्य ध्येय तुम्ही विसरता कामा नये.त्या छोट्या यशालाही तितकेच महत्व आहे परंतु त्या छोट्याशा यशाने तुम्ही तिथेच न थांबता तुमच्या मुख्य ध्येयाकडे तुम्हाला सतत मार्गक्रमण करायचे आहे.


म्हणूनच छोट्याश्या यशाने  भुलून न जाता ध्येयाकडे वाटचाल करावी.

ह्या ५ गोष्टींचा तुम्ही जर सातत्याने वापर केलात तर नक्कीच माझी खात्री आहे की,तुम्ही पैसा प्रसिद्धी यासारख्या भौतिक वस्तूंना कधीच बळी पडणार नाही.

माझा हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.🙏 🙏 🙏

ऑलिम्पिक खेळासंदार्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स नक्की जॉईन करा.🙏 🙏 🙏

टिप्पण्या

  1. खूप कमी शब्दात मार्मिक विषलेशन केलं आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय