अहंकाराचा मेरू

 


एक झाड जे खूप हिरवेगार होते त्याच्या फांद्या, फळे, पानं सगळेच कसे लोभसवाणे.त्या झाडाच्या सावलीत एक मुलगा रोज खेळायचा. त्याला ते झाड खूप आवडायला लागले,त्याची पाने, फळे, फांद्या सगळे त्याचे अगदी जिवलग बनले.त्या मुलाला त्या झाडाशिवाय करमतच नव्हते. दिवसभर त्या झाडाच्या सावलीत खेळणे हा त्याचा नित्यक्रमच बनला  होता.झाड आणि मुलगा यांच्यात एक वेगळेच नाते निर्माण झाले होते.त्या लहान मुलाला ते मोठेसे झाड खूप आवडू लागले.तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. त्याचे शाळेच वर्ष संपून कॉलेज चालू झाले, मुलाचे झाडाकडे येणे पण कमी कमी होत गेले.एकेदिवशी मुलगा झाडाकडे येतो तेव्हा झाड म्हणते अरे, तू माझ्याकडे येणे आता खूप कमी केले आहेस असे का ?मुलगा म्हणतो, तुझ्याकडे आता काय आहे ? मला पैसे पाहिजे, आहेत का तुझ्याकडे ?झाड म्हणतो, पैसे आम्हा झाडांना पैसे माहित नाहीत बाळा,आम्हाला फक्त झाडाची फळे,फांद्या,आणि लाकडे एवढेच माहित आहे. तुम्हा माणसाकडे पैसे असतात. म्हणूनच  तुमच्यात अशांतता ,दुःख,चिंता आहे.जर तुला पैसेच पाहिजे असतील तर नक्कीच तू माझी ही फळे तोडून त्याचे पैसे करू शकतोस.मुलाने वेळ न दवडता पटापट फळे तोडली आणि ती विकायला घेऊन निघाला.झाड खूप आनंदात होते कारण त्या मुलाच्या माझी फळे उपयोगी आली म्हणून.पण त्या मुलाने एकदा पण धन्यवाद म्हणला नाही.परत त्या मुलाचे झाडाकडे येणे कमी झाले.मग मुलगा नौकरीसाठी धावू लागला.एकेदिवशी झाडाने त्या मुलाला विचारले, "तू माझ्याकडे आता खूप कमी येत आहेस".मुलगा म्हणतो," आता तुझ्याकडे काय आहे मला घर बांधायचे आहे, तू मला काय देणार ? तुझ्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही." झाड तरीही आनंदातच होते. कारण तो मुलगा कधी तरी का होईना पण त्याच्याकडे येतच होता.मग झाड म्हणाले," तू माझ्या ह्या फांद्या तोडून ने. आणि  त्याचा घर बांधण्यासाठी वापर कर. मला खूप आनंद वाटेल."मुलाने त्या झाडाच्या फांद्या तोडल्या तरीही झाड आनंदातच होते.कारण त्याने मुलाला मदत केली होती.झाडाचे हृद्य प्रेमाने ओतप्रोत भरलेले  होते.तरीही त्या मुलाने झाडाला कसल्याही प्रकारचा धन्यवाद वगेरे म्हंटले नाही. कारण मुलाचे मन अहंकाराने तुडूंब भरलेले होते.परत तो मुलगा खूप दिवसानंतर येतो,आणि झाडाला म्हणतो की मला विदेशात जायचे आहे आणि मला नाव हवी आहे. तेव्हाही झाड अत्यंत आनंदातच होते, कारण तो मुलगा त्याच्या कडे आला होता.तो मुलगा झाडाकडे आला की, झाडाला खूप आनंद व्हायचा.झाड म्हणते,तू माझे हे खोड तोडून त्याची नाव बनव आणि  त्यात बसून तू विदेशात जाऊ शकतोस.मुलाने कसलाही विचार न करताच त्या झाडाचे खोड तोडून टाकले आणि त्याची नाव बनवली.आणि विदेशात गेला. पण त्या मुलाने झाडाला एकदाही धन्यवाद म्हणला नाही,तरीही झाड अत्यंत आनंदातच होते.झाडाकडे आता काहीच नव्हते ना फळे , ना फांद्या, ना खोड.झाडाला माहित होते की, आता  माझ्याकडे काहीच नाही आणि तो मुलगा आता काय माझ्याकडे येणार नाही,तरीही झाड आनंदातच होते कारण त्याला आनंद होता की, मी त्या मुलाच्या काहीतरी उपयोगी आलो.पण त्या मुलाने एकदाही झाडाला धन्यवाद म्हणले नाहीत.कारण मुलाचे मन अहंकाराने भरलेले होते.




निसर्ग आपल्याला भरभरून देतो पण आपण त्याचे दिवसातून कितीवेळेस धन्यवाद मानतो ?माणसाजवळ आपले असे काहीच नाही तरीही कसला हा अहंकार ?ना जन्म घेण्याची वेळ माहित ,ना ह्या जगातून जाण्याची वेळ माहित ,ना हवा,ना पाणी, कोणतीच गोष्ट माणसाच्या हातात नाही, ना मालकीची नाही,तरीही अहंकार कसला ? 

तुम्हाला तुमचा अहंकार गिळता यायला हवा नाहीतर तुमचा अहंकारच तुम्हाला गिळून टाकेन.तुम्हाला ह्या अहंकाराला नष्ट करायचे असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.

अनेक खेळाडू जे त्यांच्या खेळाच्या क्षमतांवर अहंकार करतात,शरीरयष्टीवर अहंकार करतात,खेळाच्या skill वर अहंकार करतात,खेळातील मिळणाऱ्या बक्षीसांवर अहंकार करतात,आणि त्या अहंकाराचा मेरू इतका मोठा होतो की, त्या अहंकारामुळे खेळाडू पुढे प्रगती करतच नाहीत तिथेच अडून राहतात. अहंकार तुम्हाला मागे खेचत असतो .तुम्हाला जर जास्तीत स्वतःचा विकास,स्वतः ची प्रगती करायची असेल, तर हा अहंकार गाढावा लागेल.त्यासाठी तुम्हाला खालील गुण तुमच्यात वरचेवर वाढवणे गरजेचेच आहे.

१)कृतज्ञता :

होय कृतज्ञता. तुम्हाला रोज फुकटात मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आभार मानायचे आहेत.मग हे ब्रम्हांड आहे, निसर्ग आहे,तुमचे सुदृढ शरीर आहे,तुमचा निर्धोकपणे चालणारा श्वास आहे,हवा,पाणी,जल,वायू,ही सगळी पंचमहाभूते,तुमचे नातेवाईक,तुमचे आप्तेष्ट,तुमचे मित्र,शत्रू,ह्या सगळ्यांमुळेच तुमचे दररोजचे जीवन व्यवस्थित चालत आहे.घरातील प्रत्येक वस्तू जी तुम्हाला सेवा देते,प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला न थकता,कोणतीही तक्रार न करता विनामुल्य सेवा देते, त्या सगळ्यांचे तुम्हाला रोज आभार मानायचे आहेत. तुम्ही जेव्हा सकाळी  झोपेतून डोळे उघडता, तेव्हा उठल्याबरोबर ही कृतज्ञता मानायला सुरुवात करा.आणि ह्या ब्रम्हान्डाकडून जे हवे ते मागा पण अहंकाराने नव्हे तर कृतज्ञ भावाने.




ThankYou हा तुमचा कोडवर्ड बनवा.

2)नम्रता :

मी वर सांगितलेल्या गोष्टीतील मुलगा हा शेवटपर्यंत नम्र नव्हता,तर अहंकारी होता.निसर्गाने त्याला कुठल्याही मोबदल्याविना फळे दिली,फांद्या दिल्या,खोड दिले तरीही तो मुलगा त्या झाडासमोर नम्र झाला नाही.त्याच्या अहंकाराचा मेरू इतका उंच गेला होता की,तेव्हढे मोठे महाकाय झाड पण त्याला छोटे च वाटले.

अमेरिकन Cyclist Lance Armstrong ह्याने जगातील अद्वितीय असे record बनवू शकला, कारण त्याचे हृद्य cancer ग्रस्तान्बद्द्ल प्रेमाने ओतप्रोत भरलेले होते.आणि त्याच्यात विनम्रता होती.त्याने ६ Tour The France जिंकल्या, आपल्या संघाला सोबत घेऊन तो एवढी मोठी कामगिरी करू शकला.आणि आजही तो cancer ग्रस्तांसाठी काम करतो.

तुमच्यात नम्रता असेल तर तुम्ही कितीही मोठी कामगिरी करू शकता.




३)नम्रतेचा सराव :

तुम्ही म्हणाल हा नम्रतेचा सराव कसा करायचा.मी पोलीस ट्रेनिंग ला असताना आम्हाला ट्रेनिंग मध्ये मैदानावरचे गवत काढणे,भांडी घासणे,भाजीपाला आणणे,मैदानावरचे दगड काढणे,संडास साफ करणे,कचरा उचलणे, अशी कामे करावी लागत.ही कामे कमी महत्वाची नक्कीच नाहीत,आणि कमी दर्जाची पण नाहीत.तुमच्या काही कामामधून दर्जाची, तर काही कामांमधून चारित्र्याची उभारणी होत असते.आम्हाला ट्रेनिंग दरम्यान ही कामे करायला काहीच अहंकार वगैरे वाटत नव्हता.ही कामे करण्यामागे आमच्यात नम्रता ठासून भरली जावी हाच उद्देश होता.जर तुम्ही सतत तुम्ही करत असलेल्या उत्कृष्ट कामांवरच तुमचे लक्ष तुम्ही खिळवून ठेवत असाल, तर नक्कीच तुमच्यात अहंकाराचे बीज पेरले जाणार त्यासाठी आपले पाय जमिनीवरच ठेवावे.त्यासाठी स्वतः च्या आणि इतरांच्या दृष्टीने कमी दर्जाची आणि कमी चारित्र्याची कामाचा सराव करायला सुरुवात करा.तुमच्यातील अहंकार आपोआप गळून पडेल.




४)तू एक पुरुष आहेस हे लक्षात ठेव :

रोमन सेनाधिकारी युद्धात विजयी होऊन आले की,त्यांच्या मागे कानात पुटपुटण्यासाठी एका गुलामाला ठेवले जायचे.तो गुलाम काय पुटपुटत असेल बर ! त्या राजाने कितीही मोठी लढाई जिंकली तरीही लढाईहून आल्यानंतर तो गुलाम कानात म्हणायचा की,"तू एक पुरुष आहेस,हे लक्षात ठेव."म्हणजेच त्या राजाने कितीही मोठी लढाई जिंकली तरी तो  इतर पुरुषांसारखाच एक पुरुष होता.त्याचा अहंकार वाढू नये म्हणूनच असे कानात पुटपुटले जायचे.





तुम्ही एखादे इतरांपेक्षा वेगळे काम केले की, तुमचा अहंकार आपोआप फुलतो,तुम्ही खास आहात ही भावना तुमच्यात उद्भवते.तुम्ही जेव्हा स्वतः ला काहीतरी खास समजता तेव्हाच तुम्हाला स्वतःला सांगायचे आहे की,तू एक पुरुष आहेस,हे लक्षात ठेव आणि स्त्री असेल तर स्वतः ला सांगायचे आहे की तू एक स्त्री आहेस,हे लक्षात ठेव.त्यावरचा हा खूप चांगला उपाय आहे. 

५) शांतता :

एखाद्या गोष्टीचा एखाद्या घटनेचा मनापासून कधी कधी खूप राग येतो,तेव्हा शांत राहून तो राग मला का आला ह्याचे निरीक्षण करा,आणि तो राग येण्यात माझाच दोष आहे.हे स्वतःला समजावून शांत रहा.कोणत्याही घटनेला कसे सामोरे जायचे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही 10 मिनिट शांत राहा,डोळे मिटून शांत बसा, आपोआप सगळे मार्ग तुम्हाला सुचतील. 




आणि तो अहंकार आपोआप गळून पडेल.राग म्हणजेच शेवटी अहंकारच ना.जर तुम्ही तुमच्या अहंकाराला बुडातून कापले नाहीतर, नक्कीच तो अहंकार तुम्हाला गिळून टाकेल.म्हणूनच गौतम बुद्धांनी सांगितलेल्या शांततेला आपलेसे करा.तुमचा अहंकार गळून तर पडेलच पण तुम्हाला तुमची नव्याने ओळख होईल.

म्हणून प्रत्येक खेळाच्या स्पर्धेपुर्वी स्वतः ला शांत ठेवून लक्ष्यावर लक्ष केंद्रित करा.जरी तुम्हाला स्पर्धेतील यश नाही मिळाले, तरी तुम्हाला तुमचे आत्मिक समाधान नक्कीच मिळेल.

तुमच्या अहंकाराला गाळून पाडण्यासाठी ह्या गोष्टींचा तुम्हाला सराव करावाच लागेल.त्याशिवाय तुमचा अहंकार गळून पडणार नाही,लुळा पांगळा होणार नाही.आणि म्हणतात ना गर्वाचे घर खाली होणार नाही.

 माझा हा ब्लॉग  पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.

ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स हा नक्की जॉईन करा.

  


 

टिप्पण्या

  1. WA... Maya tai, kupach sundar blog.khup motivated tumchysarkhya lokanbarobar amhi rahat ahot.thank u.

    उत्तर द्याहटवा
  2. माया ताई खुपच प्रेरणा दायी ब्लाॅग आहे. धन्यवाद coadward बनवला.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय