श्वासांची उलथापालथ का ?
शांतता...शांतता...
श्वास घ्यायचा...श्वास सोडायचा...मनातले सगळे विचार सोडून द्या...
शांतता...शांतता...
अरे देवा,काय करावे...माझ्या पाठीला खाज सुटली..आता काय.. शिंक पण आताच यायची होती का ?(आक..छी SSSS....)
हे कसले कसले विचार येतात ,कुणाचे काय कर्ज,कुणाची बारावी,अरे आज दहावीचा निकाल आहे...त्या पिंट्याला किती मार्क पडतील बरे ! जाऊ द्या त्याने काय चांगला अभ्यास केला नव्हता...जाऊ द्या किती ही मार्क घेऊ दे ,मला काय करायचे.....
श्वास घ्या ....श्वास सोडा....
शांतता...शांतता....
अरे,मला तर आज भिशीचा हफ्ता भरायचा.. गाडी सर्विसिंग ला पण टाकायची...मग काय रिक्षाने जायचं ऑफिसला...अरे १५ मिनिट झाले असतील की आता ध्यानाला ...बघू का एकदा घड्याळाकडे...
श्वास घ्या...श्वास सोडा...
शांतता...शांतता...
श्वासावर लक्ष केंद्रित करा...Inhale... and ..Exhale...
अरे,हे काय ?ध्यानाला बसल्यावर इतके विचार.मग माझ्या ध्यानाचा काय उपयोग होणार अशाने.मग ध्यान पाहिजे तितके प्रभाव माझ्या मनावर करणार नाही.मला माझ्या ह्या ध्यानाने एकाग्र चित्त ,शांतता,Concentration दिले नव्हते,तर मला ध्यानाने केवळ चिंता,दुःख,असमाधानी मन, आणि केवळ विचारांचा गोंधळ दिला होता .ध्यानाला बसले की नको तितक्या विचारांची गर्दी होते मनात,ध्यानाला बसायला अवघडलेपण वाटणे, ध्यानाला बसणे म्हणजे गैरसोयीचे,कंटाळवाणे आणि Boring वाटायचे.मला असे वाटायचे की, माझी बसण्याची पद्धत चुकत असेल किंवा श्वासावर लक्ष द्यायची पद्धत चुकत असेल.मग मी कुठे तरी वाचले होते की,ध्यान म्हणजे दरवर्षी मंदिरांमध्ये काही पुजारी येऊन मंदिराचा कानाकोपरा धुंडाळून स्वच्छ करतात आणि ते मंदिर स्वच्छ करताना ते त्यांची मने पण पूर्णपणे स्वच्छ करतात असेच ध्यान असते,असे मला कळले.त्यानंतर मी माझ्या ध्यानात माझ्या मनाचा कानाकोपरा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असे.पण तो कानाकोपरा स्वच्छ करणे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठे दिव्य होते.तुम्हाला माहित आहे,मानवी शरीराची ध्यान ही सवय नाही,तर खाणे ही सगळ्यात मोठी आवडती सवय आहे.जी मानवी शरीराची सवयच नाही ती सवय लागायला तर वेळ लागणारच ना ! कारण मानवी शरीराला वाईट सवयी लवकर जडतात.
मी प्रत्येक खेळाडूना सांगते की,तुम्हाला प्रत्येक स्पर्धेच्या अगोदर ध्यान करायचे आहे,visualisation करायचे आहे. मनाचा कानाकोपरा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला मी ह्या ब्लॉग मध्ये सांगितलेल्या गोष्टी नक्कीच उपयोगात येतील.
मनाचा कानाकोपरा स्वच्छ न करता जर ध्यान केले तर त्या ध्यानाचा काय उपयोग ?ध्यान करताना तुमचीही अवस्था माझ्यासारखीच होत असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या paris ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.
१) दीर्घःश्वास :
ध्यानाची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे तुमचा श्वास ! तुमचा श्वास हाच तुमच्या जन्मापासून ते मरणापर्यंतचा सोबती असतो.श्वासाने जर तुमची साथ सोडली तर तुम्ही जगाची साथ सोडाल. तुमच्या श्वासावरच ठरते की, तुम्ही जिवंत आहेत की मृत झालात ते.तुम्ही मोटरकार मध्ये असाल,तुम्ही विमानात असाल, तुम्ही जहाजात बसले असाल, तुम्ही कुठे प्रदेशात गेला असाल,तरीही तुमचा श्वास तुमची साथ सोडत नाही.
तसेच तुमच्या भावनांना व्यक्त करण्याचे कामसुद्धा श्वास करतो.तुमचे रडणे,रागावणे,हसणे,रुसणे,अव्यक्त होणे,एकाग्र होणे ह्यासारख्या भावनांना तुमचा श्वासच तर व्यक्त करत असतो आणि ह्या तुमच्या भावनांनुसार तुमचा श्वास सुद्धा बदलतो.कधी संथ गतीने,कधी जोरजोरात,कधी फुरफुरतो,कधी मुसमुसतो,तर कधी अड्खळत पण चालतो.
मग तुमच्या ह्या श्वासाला मनमोकळे जगू द्यायलाच हवे ना.तुमच्या श्वासाला मोकळी,शुद्ध ,स्वच्छ हवा खूप आवडते.तुमच्या श्वासावर तुमच्या विचारांचे,भावनांचे पण संघटन होत असते. जितका जास्त आणि मोकळा श्वास तुम्ही घ्याल तितके तुमचे विचारसुद्धा शुद्ध होतील.त्यासाठी तुम्हाला सकाळच्या शुद्ध हवेची जादू अनुभवावी लागेल.भारतात प्राचीन काळापासूनच वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये शुद्ध,स्वच्छ् हवेचे महत्व सांगितलेले आहे.तुम्हाला तुमच्या ध्यानासाठी लागेल तुमचा मोकळा ,शुद्ध श्वास.जेव्हा वाटेल तेव्हा मोकळा श्वास घ्या,जोरजोरात श्वास घ्या,मनमोकळा श्वास घ्या.
Inhale सोबत शुद्ध स्वच्छ मोकळे विचार आत ओढून घ्या.आणि Exhale सोबत नको असलेले विशुद्ध विचार बाहेर सोडून द्या.
2)हलके फुलके अन्न :
माणसाचे शरीराचे केंद्र म्हणजे तुमची नाडी.थायलंड मध्ये गौतम बुद्धाचे मूर्तीचे पोट हे छोटेच असते तर याउलट भारतात गौतम बुद्धाचे मूर्तीचे पोट हे भले मोठे दाखवतात.ज्यावेळी गौतम बुद्धांनी ध्यान करून सारया जगाला दुःखाचे कारण समजून दिले.तेव्हा त्यांनी मिळवलेले हे दिव्य केवळ नाडी वर केंद्रित झाल्याने प्राप्त झाले होते आणि त्यांचे पोट छोटे छोटे झाले होत कारण अनेक महिने त्यांच्या पोटात अन्नाचा कणच नसायचा. म्हणूनच थायलंड मध्ये गौतम बुद्धाचे मूर्तीचे पोट हे छोटे दाखवतात जसे होते तसेच दाखवतात.
भगवान महावीर यांनी त्यांच्या जीवनात केवळ ३६५ दिवसच अन्न ग्रहण केले होते.बाकीचे दिवस कधी १५ दिवसाला कधी महिन्याला त्यांनी अन्न ग्रहण केल्याच्या नोंदी आहेत.त्यांनी ठरवले असते तर त्यांनी नानातऱ्हेचे उपहार मागवून खाऊ शकले असते.
ह्याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला अन्न ग्रहण करू नका असे म्हणत आहे.ही उदा.देण्याचा माझा उद्देश की, तुम्हाला ध्यान करण्यासाठी ह्या ब्रम्हांडाशी एकरूप होण्यासाठी तुम्हाला हलके फुलके अन्न ग्रहण करायचे आहे.पोट हलके असायला हवे, तेव्हाच तुम्ही ध्यानात मग्न व्हाल.मग तुम्ही सकाळी उपाशीपोटी,किंवा मग सायंकाळी उपाशीपोटी असताना ध्यान केले तर नक्कीच तुम्हाला ध्यानात मग्न होता येईल.
३)एकाग्रता :
ऋग्वेदात श्वसनाला स्वत्वाच्या पलीकडे जाण्याचा मार्ग आणि जाणीवांपर्यंत जाण्याचा मार्ग असे वर्णन श्वसनाचे केले आहे.तुमचा श्वास जर नियंत्रित असेल तर नक्कीच तुमचे चित्त एकाग्र होते.एकाग्र चित्तासाठी तुम्हाला तुमचा श्वास अगोदर नियंत्रित करायचा आहे.श्वासच एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला स्थिर करते,शांत ठेवते,आणि एकाग्र ठेवते.तुमचा श्वास तुमच्या जीवनाचा सवंगडी आहे,सोबती आहे.त्याच्याशी एकाग्र होणे म्हणजे तुम्हाला दिव्य वाटता कामा नये.नको त्या म्हणजेच मी तर म्हणेल ध्यान करताना सगळ्याच विचाराना तुमच्या श्वासापासून दूर करा.विचार सोडून द्या आणि श्वासामध्ये हरवून जा.जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीराच्या अवयवाची जाणीव होते तेव्हाच कळते की,अरे मला हा अवयव आहे.ध्यानात गेल्यानंतर शरीराच्या जाणीवा पण हळूहळू सोडून द्या.आणि तुमच्या ध्यानाचा आनंद घ्या.
भारतीय संस्कृती मध्ये अनेक सह्स्त्रकांपासून योगी पुरुषांनी एकाग्रचित्त होण्यासाठी, वर्तमानात राहण्यासाठी, श्वासावर नियंत्रणाचा मार्ग सांगितलेला आहे. श्वासावर एकाग्रचित्त होणे हे खरेतर मानवासाठी सोपी गोष्ट असायला हवी.पण दुर्भाग्याने तीच गोष्ट माणसाला अवघड वाटते.
तुम्ही तुमच्या श्वासाशी एकाग्र झालात की,नक्कीच चिंतामुक्त होणे,दुःख दूर करणे,आपल्या लक्षावर एकाग्र होणे, तणावमुक्त होणे, मन शांत करणे, सहज शक्य आहे.त्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासाशी एकाग्र होणे गरजेचे आहे. मी तर म्हणेन श्वासाशी एकाग्र होण्यासाठी तुम्हाला निश्चित अशा वेळेची,निश्चित अशा जागेची,निश्चित अशा आरामदायी आसनाची काहीच गरज नाही.तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा बसमध्ये,रेल्वेमध्ये, कार्यालयात, खुर्चीवर बसून,खेळाच्या मैदानावर, एखाद्या पार्टीत तुम्ही तुमचा सवंगडी श्वास याच्याशी कधीही एकाग्र होऊ शकता.
४)शब्द कमी वापरा :
तुमची पाच इंद्रिय जीभ,डोळे,कान,नाक,आणि त्वचा ह्यांच्यावर तुम्ही दिवसातून किती वेळेस नियत्रण ठेवू शकता आणि किती वेळेस तुम्ही तुमचे नियंत्रण हरवता ह्याचे निरीक्षण करायला सुरुवात करा. आणि तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही तुमचे नियंत्रण हरवता त्याला सगळ्यात जास्त कारणीभूत तुमच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द असतात.जर तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त वेळा तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवले तर नक्कीच एकाग्रता वाढेल. दिवसातून कमीतकमी शब्दांचा वापर करायला सुरुवात करा.
मी गेली ७ महिने झाले स्वतः वर हा प्रयोग करते तर माझे लक्ष माझ्या ध्येयावर एकाग्र होण्यास खूप मदत होते.दिवसातून कमीत कमी शब्दांचा वापर करायला सुरुवात करा.नक्कीच तुम्ही तुमचे ऑलिम्पिक चे ध्येय सहजरीत्या गाठाल.तुम्ही तुमच्या ध्येयाशी चिकटून राहाल.आणि तुमचे चित्त बिनाकामाचे शब्द वापरून विचलित होणार नाही.
तुम्ही जर मी वर सांगितलेले उपाय रोज वापरायला लागलात तर नक्कीच तुमचे चित्त एकाग्र राहील,तुम्ही ध्येयाशी चिकटून राहाल,तुम्ही तणावमुक्त राहाल.लहानपणापासून जर तुम्ही तुमच्या मुलांना श्वासावर नियंत्रण करण्यास शिकवले तर, निश्चितच भारतात अनेक गौतम बुद्ध,अनेक रजनीश ओशो,अनेक रामकृष्ण परमहंस,अनेक सचिन तेंडूलकर ,अनेक मायकेल जोर्डन, अनेक Paavo Nurmi,अनेक Michael Phelps घडतील.
माझा हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.🙏 🙏 🙏
ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स नक्की जॉईन करा.🙏 🙏 🙏






जबरदस्त ब्लॉग माया ताई
उत्तर द्याहटवाखूप छान लिहीले आहे, मायाताई, खूप आभारी अशा मौल्यवान टिप्स दिल्या बद्दल
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय माया मॅडम. अगदी योग्य सुचवलंय तुम्हीं
उत्तर द्याहटवाधन्यवाद धन्यवाद
हटवाYou are Great
उत्तर द्याहटवाThank you thank you
हटवा