ध्येयाशी एकाग्रता
अथ केन प्रयुक्तो यं पापं चरती पुरुषः/
अनिछ्न्नपी वार्ष्णेय बलादिव नियोजितः //
महान ग्रंथ भगवद्गीतेच्या तिसरया अध्यायात ३६ व्या श्लोकात सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की, हे भगवान, माझी इच्छा नसताना ही माझ्याकडून हे अघोर पाप कोण करून घेत आहे.माझी इच्छा नसतानाही मला माझ्याच आप्तेष्ठाण्सोबत लढावयास कोण प्रवृत्त करते. अशी कोणती माणसाच्या आतली शक्ती आहे जी इच्छा नसतानाही अशी पापे करायला प्रवृत्त करते.मी माझ्या ध्येयाला चिकटून राहू शकत नाही. माझे ध्यान भटकते. हे ,श्रीकृष्णा ,मी focused का राहू शकत नाही ?.मी माझ्या मनावर ताबा/ कंट्रोल का ठेवू शकत नाही ?माझे मन सतत भटकत आहे.मी माझ्या ध्येयाव्यतिरिक्त इतर गोष्टींवर लक्ष देत आहे असे का होत आहे ? हे भगवान कृपया माझी मदत करावी.
जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन स्वतः च्या मनावरील ताबा हरवून बसतो.त्याच्या ध्यायाशी तो चिकटून राहु शकत नाही.हा मनावरचा ताबा का हरवत असेल बरे !तुम्हालाही असेच होत असेल ना ! तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार,मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.
कौन्तीय पुत्र,सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनाच्या ह्या प्रश्नावर भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये खूप छान सांगितलेले आहे की,हे अर्जुना कितीही ज्ञानी व्यक्ती ह्यापासून वाचू शकला नाही.मानवाची पाच इंद्रिये,मन आणि बुद्धी ही ह्या द्वेष,मत्सर,राग ह्याची वसतिस्थाने आहेत.(इंद्रियाणि मनो बुद्धीरस्याधीष्ठानमुच्यते /एतैर्वीमोह्त्येषज्ञानमावृत्य देहिनम // ) तो lust (काम ) इंद्रिये ,मन आणि बुद्धी इथे वास करून माणसाच्या मनावर ताबा मिळवतो आणि ध्येयापासून मानवाला दूर ठेवत असतो.मित्रानो,focused जीवन जगणे खरेच खूप कठीण असते का ? तुम्ही पण तुमच्या ध्येयापासून दूर जात आहात का ?, तर नक्कीच खालील गोष्टी तुम्हाला खूप उपयोगी पडतील.तुमच्या ऑलिम्पिकच्या ध्येयासाठी माझ्या ह्या गोष्टी खूप प्रभावी ठरतील ह्याची मला खात्री आहे.
१) ऑलिम्पिकचे ध्येय मनात सजवा :
तुमची पंचेंद्रिये म्हणजेच तुमचे कान,नाक,त्वचा,जीभ,आणि डोळे ह्याच्यावर ताबा मिळवा.तुमच्या ह्या ५ इंद्रियांवर जर तुम्ही ताबा ठेवू शकलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवू शकता.तुमचे मन हेच तुमचा मित्र तसेच तुमचा शत्रू पण असतो.ज्याप्रमाणे रथाचा सारथी रथाला बरोबर ताब्यात ठेऊन अस्ताव्यस्त इकडे तिकडे पळू देत नाही त्याप्रमाणेच मानवी मनाला सतत काबूत आणवे लागते.
Matheu Record ह्या जगातील सर्वात आनंदी माणसाने सांगितले आहे की,"तुम्ही जर तुमच्या डोक्यात दुःखाचे आणि नकारात्मकतेचे विचार घोळवत असाल तर,तुमच्या मनात तीच दुःखाची आणि नकारात्मकतेची भावनाच जास्त बळकट होईल.तुम्ही जर आनंद,उत्साह,सुखाची भावना डोक्यात आणत असाल तर तशीच भावना तुमच्या मनात बळकट होईल."
ह्यासाठी तुमच्या वर आधारित आहे की,तुम्हाला तुमच्या डोक्यात कोणती भावना आणायची ते.तुम्ही जर National स्पर्धापर्यंतच थांबायचे ठरवले तर तुमचे मन तिथेच थांबेल.तुम्ही पुढचा ऑलिम्पिकचा विचार करणारच नाही.ह्यासाठी ऑलिम्पिकचे ध्येय मनात सजवा.
2)मनाशी सूर जुळवा :
तुमच्या मनाचे सूर तुम्ही जितके जास्त जुळवाल तितके कमी परिश्रम तुम्हाला करावे लागतील.तुम्ही जेव्हा तुमचा आवाज सुंदर - मधुर होण्यासाठी गायनाचा वर्ग करता आणि तुमच्या कंठावर म्हणजेच आवाजावर काम करता.तेव्हा जरी तुमचा आवाज घोगरा किंवा मधुर नसेल तर सरावाने तो मधुर बनतो.किंवा तुम्हाला चित्र काढायला खूप आवडत असेल आणि तुम्ही चित्र काढण्याचे वर्ग करून तुमची चित्रकला तुम्ही अधिक सुधारवता.
त्याप्रमाणेच मनाचे ही असते.तुम्हाला तुमच्या मनाशी असेच सूर जुळवावे लागतात.तुम्हाला तुमच्या ध्येयाशी उपयुक्त नसणाऱ्या विचाराना अशाचप्रकारे बाजूला काढून टाकायचे आहेत.आणि केवळ ध्येयाशी निगडीत विचाराना मनात प्रवेश द्या.
ज्याप्रमाणे तुम्ही घर स्वच्छ् दिसण्यासाठी घर झाडून पुसून चकाचक करता त्याप्रमाणेच मनालाही स्वच्छ करा. मनाशी निगडीत हे काम तुम्हाला रोज करायचे आहे नक्कीच नवीन आव्हाने अनेक पटीने मोठी बनून येण्याअगोदरच तुम्ही तुमच्या मनाशी सूर जुळवलेले असणार.केवळ ध्येयाशी निगडीत सूर तुमच्या मनाच्या घरात वाजू द्यात.रोज तुमचे ध्येय लिहून काढा आणि त्याप्रमाणे मनाला decorate करा.
सचिन तेंडूलकरने ज्याप्रमाणे त्याच्या मनात क्रिकेट खेळाच्या प्रत्येक skill मध्ये perfect बनण्याचे सूर मनात वाजवले होते आणि निश्चितच त्याने त्याच्या मनाशी सूर जुळवले.म्हणूनच एक यशस्वी महाराष्ट्रीयन क्रिकेट खेळाडू बनला.
३)संकल्प जगा :
मी म्हणते केवळ संकल्प करू नका तर संकल्प जगा.मी खरे तर इथे म्हणेन केवळ संकल्प तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जात नाहीत.त्यासाठी तुम्हाला रोज रोज त्यादृष्टीने कृती करावीच लागते.
मार्टिन ल्युथर किंग ह्यांनी असे म्हटले आहे की,"ज्यांना शांतता प्रिय आहे,त्यांनी युद्धप्रिय लोकांइतक्याच प्रभावीपणे संघटीत होण्यास शिकलेच पाहिजे."ज्यावेळी अनेक लोक मला मार्गदर्शनासाठी विचारायचे, त्यावेळेस बरयाच जणांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायचो ते म्हणजे,माझी अशी इच्छा आहे की,.....माझी अशी इच्छा आहे की,....मला नौकरी मिळावी...मला जास्त पैसे मिळावेत....वगैरे ..पण आपण असे कधीच असे म्हणत नाही की,मला अजून जास्त कठोर परिश्रम करायला हवे होते...मला अजून जास्त एकाग्रपणे सराव करायला हवा होता...वगैरे..
म्हणजेच तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, त्यादृष्टीने आणखी जास्त परिश्रम प्रत्यक्षात करायला हवेत हे आपण विसरून जातो. आणि आपल्या अपयशाचे खापर इतरांवर फोडून मोकळे होतो.तुम्हाला तुमचा संकल्प जगायला शिकायलाच हवे. केवळ संकल्प करून जमत नाहीतर ते प्रत्यक्षात आणण्यासाठीची तयारी जोरदार करायला हवी.आणि तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने रोज एक छोटेशे पाऊल टाकायचे आहे.ते एक टाकलेले पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाईल.
४)ध्येयाशी एकाग्र होणे :
जैन ऋषीजी श्रील प्रभुपाद जी म्हणतात की,
"जब मै पाणी पिता हुं तब मै केवल पाणीही पिता हुं /" म्हणजेच मी पाणी पिताना केवळ पाणीच पितो पाणी पिताना माझ्याकडे दुसरा option मी ठेवत नाही.आपण टीव्ही पाहत,मोबईल पाहत,कुणाशी बोलत,किंवा कुठल्यातरी एखाद्या (बिनाकामाच्या)विचारात मग्न होत पाणी पीत असतो.तुम्ही पाण्याचा आस्वाद घेत पाणी कधी पिल्याचा अनुभव घेतला आहे का ? नक्कीच नसणार.
सांगायचा मुद्दा हा की,तुम्ही जे काही काम करत असाल त्यात मग्न होऊन,त्याचा आस्वाद घेत ते काम पूर्ण करावयाचे आहे.तरच त्यात तुम्हाला समाधान,आनंद,आणि कामगिरी पूर्ण केल्याची एकाग्रता प्राप्त होईल.
खेळाच्या सर्वात जीव ओतून खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये आपण पेले (The God of Football) ह्याचे नाव घेतो.परिस्थिती कधीच अनुकूल नसते ती तुम्हाला तुमच्या नुसार अनुकूल बनवायची असते.म्हणूनच कोणताही खेळ खेळताना एकाग्रचित्ताने,आणि स्वतः शी प्रामाणिक राहूनच खेळा, नक्कीच तुम्हाला ते सगळे प्राप्त होईल ज्याचा कधीच तुम्ही विचारही केला नाही.
मित्रानो,मी सांगितलेल्या ह्या गोष्टी नक्कीच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील ह्याची मला खात्री आहे.ह्याचा रोज नियमितपणे अवलंब करायला सुरुवात करा आणि तुमच्या ध्येयात येणाऱ्या अजात शत्रूना दूर करा.तुमचे अजात शत्रू म्हणजेच तुमच्याच मनात,बुद्धीत आणि इंद्रियांत निर्माण होणारे दोष ह्या दोषांना दूर करणे काहीच अवघड नाही तुम्ही जर ह्या उपायांना आपलेसे केले तर.
माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.🙏 🙏 🙏
ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स नक्की जॉईन करा त्याची लिंक इथे दिलेली आहे.🙏 🙏 🙏





तुमचा ब्लॉग खूप छान लिहिला गेला आहे त्यातून खूप प्रेरणा मिळते आणि उस्ताह वाढला आहे आहे नैराश्य कमी झाले आहे पुन्हा एकदा धन्यवाद मायाताई
उत्तर द्याहटवाThank you Dada
हटवाExcellent writting
उत्तर द्याहटवाThanks dear
हटवाछान लिहिलंय👌👌
उत्तर द्याहटवाFantastic 👌🚵♂️🤸♀️🏋️♀️🚣♂️
उत्तर द्याहटवाThank you nehal tai
हटवाJabardast
उत्तर द्याहटवाएकदम छान Maya tai GrwGr Going
उत्तर द्याहटवाजबरदस्त माया ताई
उत्तर द्याहटवाअतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन
खूपच jabardast Maya tai👌👌
उत्तर द्याहटवा