सकाळच्या हवेची ताजगी

       

 "Your time is limited,so dont waste it living someone else's life,Don't be trapped by dogma -which is living with the results of other people's thinking.Dont let the noise of other's opinions drown out your own inner voice.And most important,have the courage to follow your heart and intuition.They somehow already know what you truely want to become."
                                        -Steve Jobs
तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका.लोक काय म्हणतात ह्याकडे लक्ष देऊ नका.आणि इतरांच्या मतांनुसार तुमचे जीवन जगू नका.स्वतः च्या हृदयाची आणि अंतरात्म्याची आवाज ऐका तुम्हाला नक्कीच सत्य काय त्याचा शोध लागेल.
रोज सकाळी आणखी थोडा वेळ..थोडा वेळ..10 मिनिटानी नक्की..५ मिनिटांनी नक्की..मम्मी..जाऊ दे ना..आज नको लवकर उठायला,काल मी उशिरापर्यंत तो picture पाहत होतो ना Doremon चा..  माझे पाय दुखतात गं मम्मी..अगं डोकं जड पडल्यासारखे पण वाटते..कुणी शहाण्यांनी हा अलार्म बनवला असेल बरे..अशी चीड येते ना त्या कर्कश्श आवाजाची..सुखाने झोपू पण देत नाही..आलार्म बंद..अर्ध्या तासाने उठून..तसल्या वास सुटलेल्या,अंगाचा घामाचा वास सुटलेल्या अवस्थेत परत टीव्ही चालू झाला Pokemon..तुम्हारा प्यारा प्यारा..(काय...ते  नाव पण येत नाही)आणि अशाच घाणेरड्या अंगाचा वास सुटलेल्या अवस्थेत एक तास भर टीव्ही पहायचा कार्यक्रम झाला.त्यानंतर मी ओरडल्यास ब्रश हातात घेऊन ब्रश झाला..नाहीतर माहित नाही किती वेळ चालला असता हा programme आणि पठठे आता fresh झाले अंघोळ वगैरे करून..परत नष्ट करताना ShinChan..शाळेचे क्लासेस चालू असताना अजून काय...जेवण करताना Doremon...snacks खाताना अमुक तमुक..

      काय हे ?असाच कार्यक्रम चाललाय का तुमच्या पण मुलांचा ? माझा मुलगा तर रोज असेच करतो.रोज किती तास टीव्ही च्या पुढे आपली  मुले आहेत ह्याचा कधी तुम्ही विचार केलात का ?आणि हो एक सांगायचे राहिलेच टीव्ही वरचा कार्यक्रम बोरिंग वाटला तर मम्मीचा Iphone आहेच गेम खेळायला.तुमच्या पण मुलांची अशीच अवस्था असेल तर नक्कीच हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.
   तुमची मुले जर दिवसातले अनेक तास अशाप्रकारे बिनकामाच्या गोष्टींमध्ये वाया घालवत असतील तर नक्कीच त्यांच्यात अनेक शारीरिक,मानसिक,वैचारिक,व्याधी निर्माण होतील त्यावर नक्कीच माझा हा ब्लॉग तुम्हाला उपयोगी पडेल.त्यासाठी माझा हा ब्लॉग पूर्ण वाचा आणि खालील उपायांना अवलंबात आणायला सुरुवात करा.
१)रात्री लवकर झोपा :
रात्री लवकर झोपणे ही सवय नक्कीच चांगली आहे हे आपण अनादी काळापासून ऐकत आलो आहोत.आपल्याला माहित पण  आहे की रात्री लवकर झोपण्याने सकाळी लवकर जाग येतो.मला आजच्या दिवसाचा नक्कीच पुरेपूर फायदा घ्यायचा आहे कारण आजचा दिवस पुन्हा नाही म्हणून काय मग रात्री कितीही वाजेपर्यंत जागी राहायचे.आपल्याला फक्त कारणे हवीत जागी  राहायची.उदा.३१ डिसेम्बर आहे ,शिवजयंती आहे,गणपती उत्सव आहे,वगैरे..वगैरे..म्हणून आपण आपल्या मुलांमध्ये पण हीच संस्कृती रुजवत आहोत ह्याची तुम्हाला कल्पनाच नाही.
   मी जिथे राहते तिथे आमच्या कॉलनीत लहान मुले अगदी १० ते १२ वर्षांची असतील रात्री ११ वाजता घराबाहेर खेळायला पडतात.मला खूप चीड येते कारण त्यावेळी माझा नुकताच डोळा लागलेला असतो.पण कॉल्नितल्या प्रतिष्ठेचा प्रश्न काहीच बोलू शकत नाही ना !
   तुमच्या मुलांना एक ध्येयाधीष्ठीत बनवायचे असेल, तर नक्कीच रात्री लवकर झोपायची सवय लावा.म्हणजे ते आपोआप सकाळी लवकर उठतील.मी कुठेतरी वाचले पण होते की,तुम्हाला जर जगाच्या पुढे राहायचे असेल तर नक्कीच जगाच्या 2 तास अगोदर झोपेतून उठणे गरजेचे आहे.त्यासठी निश्चितपणे जगाच्या 2 तास अगोदर झोपणेही आवश्यक आहे.

2)सकाळच्या हवेची ताजगी अनुभवा :
जवळजवळ २५ %लोक एका चुकीच्या कृतीने दिवसाची सुरुवात करतात ती कृती म्हणजेच सकाळी लवकर उठतात पण उठ्ल्यानंतरच्या एका मिनिटाच्या आतच सेलफोन किंवा टेलीविजन समोर बसतात किंवा फोनवरचे मेसेज पाहत बसतात.म्हणूनच मुलांनी झोपेतून लवकर उठ्ल्यानंन्तर फोन किंवा टीव्ही पाहत बसायचे नाही तर सकाळच्या शुद्ध हवेची ताजगी अनुभवायला बाहेर मैदानावर घेऊन चला.त्या शुद्ध हवेचा गारवा मन,बुद्धी,त्वचा आणि सर्व इंद्रियांमध्ये जायला हवा.मग मुलांच्या बाहुमध्ये,हातांमध्ये,मनगटामध्ये शक्ती संचारेल,आणि मुले आजारी पडण्याचे प्रमाण पण कमी होईल.हा अनुभव घेऊन पहा नक्कीच मुलांच्या शरीरात आणि दिसण्यात तुम्हाला फरक पडलेला जाणवेल.
एका संशोधनानुसार सन २००७ नंतर मुलांमध्ये शारीरिक,मानसिक,वैचारिक,व्यंगत्वाचे प्रमाण तिपटीपेक्षाही जास्त वाढलेले आहे.त्यामुळे मुलांना सकाळच्या ताजगीची जादू अनुभवण्याची सवय लावा.सन २०२० मध्ये तर मुलांसोबतच मोठ्या व्यक्तीसुद्धा खूप आळशी झाल्या आहेत,सकाळ कुणी पाहतच नाही,सकाळच्या हवेची ताजगी कुणी अनुभवतच नाही.
मी गेली १५ वर्ष झाली ह्या सकाळच्या हवेची जादू अनुभवते.खूपच छान अनुभव आहे.माझा श्वास असा खूप मोठा झाल्याचा भास मला होतो,माझी त्वचा त्या सकाळच्या हवेची ताजगी जास्त पसंद करतात.वैज्ञानिक कारणे खूप आहेत की,आपण सकाळी हवा का खायला हवी पण आपण त्याकडे डोळेझाक करतो.

३)कृतज्ञतेचे धडे :
  • कराग्रे वसते लक्ष्मी 
  • करमध्ये सरस्वती
  • करमुले तू गोविन्दम
  • प्रभाते करदर्शनम //
ह्यासारखे श्लोक म्हणून घ्यावेत. म्हणजेच त्यांना ह्या पृथ्वी,जल,वायू,अग्नी,ह्यांचे महत्व कळेल आणि ह्यांच्यामुळेच माणसाचे जीवन समृद्ध आहे ह्याचे धडे आतापासून मिळतील .
सुत्त पितक ह्या बौद्ध ग्रंथात असे सांगितले आहे की,"आम्ही  कृतज्ञ आणि आभारी राहू आणि आमच्यावर केलेल्या अगदी किमान उपकारांकडेही आम्ही दुर्लक्ष करणार नाही."
मी गेली २० वर्ष झाले ही हवेची ताजगी अनुभवते खूप fresh आणि प्रसन्न वाटते.जेवढे मी जास्त ह्या निसर्गाच्या सानिध्यात राहते तेव्हढे जास्त मला secure असल्याची feeling येते.
ह्या कृतज्ञतेची वेळ राखून ठेवा.अमेरिकेतील एका रूढ पद्धतीत ओनोंडांगा मुले शाळेत दिवसाची सुरुवात करताना शाळेच्या सभेत गोळा होऊन कृतज्ञता अशाप्रकारे व्यक्त करतात की,(शिक्षकांच्या मागे मागे म्हणतात )"आपली मनं एक असल्याप्रमाणे त्यांचं एकत्रीकरण करूया आणि आपल्या सर्वात मोठ्या बंधूंचे,सूर्याचे,आभार मानूया.आपल्याला एकमेकांचे चेहरे पाहण्यास प्रकाश देण्यासाठी,बीजांना वाढण्यास उबदारपणा मिळण्यासाठी तो रोज सकाळी उगवतो.
ही कृतज्ञता करायला सुरुवात करा तुम्हाला जे हवे त्या सगळ्या गोष्टी हे ब्रम्हांड देईल.मी जेव्हापासून ही कृतज्ञता मानायला सुरुवात केली तेव्हापासून मी ह्या हवेच्या,पाण्याच्या,ह्या धरत्रीच्या,निसर्गाच्या अक्षरशः प्रेमात पडले.

४)ध्यानाची जादू अनुभवा :
मला माहित आहे की,ध्यान आपल्या सवयीतील एक सवय नाही म्हणूनच, तर आपण ध्यानासाठी  आपल्या दिवसभरातील वेळे पैकी केवळ १५ मिनिट देऊ शकत नाही.कारण तुमच्याकडे ध्यान करायला वेळ नाहीच.सकाळी सकाळी वास सुटलेल्या तोंडाने तुमच्या सेलफोन द्वारे 100 एक जणांना तुम्ही भेटू शकता ,मेसेज करु शकता ,chatting करु शकता ,पण ध्यानासाठी तुमच्याकडे १५ मिनिटे नाहीत.
तुम्ही तुमच्या आत्मिकशांतीसाठी,झोप लागण्यासाठी,एकाग्र चित्तासाठी असे ध्यान करू शकता.तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तर १ते ४ म्हणेपर्यंत तुमचा श्वास आत घ्या आणि १ते४ म्हणेपर्यंत तोच श्वास बाहेर सोडून द्या.तुम्हाला एकदम गाढ झोप लागेपर्यंत असे करू शकता.
अशी ध्यानाची जादू अनुभवण्यासाठी रोज वेळ काढा.ध्यानाची सवय अंगी बाणवा.

तुमच्या ह्या सकाळच्या दिनचर्येची सुरुवात जर अशी केलीत तर तुम्हाला सकाळच्या हवेची ताजगी जीवनाचा तो सर्व आनंद देईल जो तुम्हाला हवा आहे.ही सकाळच्या हवेची ताजगी तुम्हाला शारीरिक मजबुती,मनःशांती,आत्मिक ताकद,मानसिक सुदृढता,वैचारिक सज्जता हे सगळे देईल.ही सकाळच्या हवेची ताजगी नक्की अनुभवा आणि मला comment box मध्ये तुमचे अनुभव कळवा.
माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.🙏 🙏 🙏
माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा,Like,Comments,आणि Share करा.तुमच्या एका sharing मुले ह्याचा कुणालातरी फायदा होऊ शकतो.
    ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स नक्की जॉईन करा.त्याची लिंक इथे खाली देते.
https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share
 


 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय