मनःशक्तीचे जबरदस्त ३ उपाय

 



Come on.. रिया बेटा,तू करू शकतेस....,समोर पहा..समोर पहा..रिया.. yes बेटा,थोडेच अंतर राहिले आता....चल.. चालव पाय..,हाताची move वाढव...Come on..रिया बेटा....!

असा जोरजोरात आवाज आला आणि मी माझ्या सायकलचे ब्रेक कचकन दाबले.अंबाझरी तलावात एक रिया नावाची मुलगी पोहत असताना मी पाहिले,आणि तिचे बाबा तिला चालना मिळण्यासाठी जोरजोरात ओरडत होते.मी ५ मिनिट थांबले. माझी सायकल जवळपास ३५ km चालली होती. म्हणलं थांबावे थोडे आणि मी थांबले.आणि कौतुकाने त्या मुलीचे पोहणे पाहत उभी राहिली.मला काही विशेष वाटले नाही.कारण अंबाझरी तलावात खूप लोक पोहत असतात. मी थांबले आणि त्यात माझा स्वार्थ पण होता, की मला थोडीशी विश्रांती पण हवी होती.थोडावेळ निरीक्षण केले आणि त्या बाबा चे अजून शब्द कानावर पडले "रिया बेटा ,तिकडे..तिकडे.. नको.. जाऊ .तिकडे.. गाळ आहे..,खोली जास्त आहे."म्हणलं , ही मुलगी नेहमीच पोहत असणार मग एवढे सांगायची काय गरज?ती मुलगी काठाला पोहचली आणि मी पाहत च राहिले. कारण ती मुलगी दोन्हीही डोळ्यांनी चक्क अंध होती....तरीही तिचा बाबा तिला समोर पहायला सांगतो. आश्चर्याचा धक्का बसला.त्या मुलीच्या जबरदस्त इच्छाशक्तीवर मला गर्व वाटला.किती जबरदस्त इच्छाशक्ती होती त्या मुलीमध्ये आणि त्या मुलीचा विचार माझ्या डोक्यात सतत घुमू लागला. नंतर दोन दिवसांनी कळले की,ती मुलगी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करत आहे.आपल्याला ईश्वराने एवढी दृष्टी देवूनही आपण..... मलाच माझी लाज वाटायला लागली.किती जबरदस्त इच्छाशक्ती त्या मुलीची .पाण्याचा तळ कसा आहे,खोली किती आहे,पाण्यात काय काय अडथळे येत असतील ?पण तिने ह्या सगळ्या अड्थळयांवर मात केली होती.ती डोळ्यांनी अंध आहे ह्याबद्दल पण तिला कसलेच दुःख नव्हते.तिने तिच्या मनाला खंबीर बनवून स्वतः ला सिद्ध केले होते.त्या प्रसंगानंतर माझी सायकल कधीच ४० km च्या खाली चालली नाही. 

    मनाकडे कधीच न निवडलेल्या जाणीवपूर्वक अन्तः प्रेरणा असतात,ताकद असते.ज्याचा आपण कधीतरीच वापर करतो.त्या मुलीने स्वतः ला सिद्ध केले होते,स्वतः च्या मनाला सशक्त बनवले होते, मनाची शक्ती,ताकद वाढवली होती.म्हणूनच तर तिला तिच्या अंधपणाचे काहीच दुःख नव्हते. तुम्हाला पण तुमच्या मनाच्या शक्तीला सशक्त बनवायचे आहे,मनाला मजबूत बनवायचे आहे, तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.

नमस्कार, मी माया दणके ,माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.

१)मनाची पुनर्रचना करा :

होय, तुम्हाला तुमच्या मनाची पुनर्रचना करण्याची गरज आहे.

"मला आता जमणार नाही,मी ते करू शकत नाही,मी मंद गतीचा आहे,मी आता जाम कंटाळलो आहे,मी पाहिजे तितका चांगला नाही,मला कोणीही समजून घेत नाही,मी दिसायला आकर्षक नाही,मी हुशार नाही."

असे म्हणून तुम्ही  स्वतः च तुमच्यातील केवळ वाईट गोष्टी शोधत असता.आणि तुम्ही स्वतः ला सांगत असता की,आता ह्या गोष्टी काही बदलणार नाही.ह्या तुम्हीच स्वतः वर केलेल्या टीकेची पुनर्रचना तुम्हालाच करायची आहे.तुमच्या मनाची पुनर्रचना करण्यासाठी तुम्ही स्वतःलाच मी सुधारत आहे,मी आता ह्यावर काम करत आहे...असे म्हणून स्वतः ला बळकटी द्यायची आहे,तुमच्या अपयशाला मोठं करण्यापेक्षा तुमच्या प्रगतीला मोठं करा.

मनाची पुनर्रचना करण्यासाठी केवळ शब्दांचा नाहीतर कृतीचा वापर करायला सुरुवात करा.तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रती रोज एक नवीन गोष्ट शिकायची आहे.म्हणजे तुम्ही तुमच्या मनाच्या ह्या नकारात्मक अवस्थेत अडकणार नाही.

युरोप आणि अमेरिका ह्या देशामधील तरुण पिढी सध्या  गांजा,ड्रग्ज ह्याच्या जबरदस्त विळख्यात अडकली आहे.रोज ते ड्रग्ज (Alcohol, cannabisopium, and heroin) घेतल्याशिवाय त्यांचे शरीर साथ देतच  नाही.United States मध्ये सगळ्यात जास्त ड्रग्ज घेणाऱ्यांची संख्या ( ५.८९% )आहे.हे ड्रग्ज जर नाही घेतले तर ही तरुण पिढी म्हणजे जिवंत deadbody च असते.अशी अवस्था तरुणपिढीची आहे.कारण ह्या तरुणानी स्वतः वरचा स्वतःच्या मनावरचा ताबा कधीच हरवला आहे.आणि तो ताबा त्यांनी त्या सारया ड्रग्ज च्या हवाली केला आहे.


म्हणूनच तुमच्या मनाचा ताबा दुसरा कोणी घेण्याच्या अगोदरच तुमच्या मनाची पुनरर्चना करा.

2)मनाची गती कंट्रोल करा :

मन तुफान वारयाचे भीज पावसाचे..

का होते बेभान, कसे गहिवरते 

मन तुफान वारयाचे.....

आकाशी भिरभिरते....

मन नुस्त भिरभिरत असते.कधी क्षणात इथे तर कधी क्षणात तिथे.त्या मनाची गती कंट्रोल करायचे काम तुम्हाला नेहमीसाठीच करायचे आहे.तुमचे मन नेहमी ब्रेक नसलेल्या रेल्वे सारखे धावत असते.तुम्हाला असे वाटले की,मला आता थांबायचे आहे तर कागद आणि पेन घ्या त्यावर तुमच्या भिरभिरणाऱ्या मनात येणारे विअचार सगळे लिहून काढा.

हा प्रयोग कसा करायचा.१५ मिनिटे शांत बसा,मनात जे काही विचार येतील ते सगळे पुढील १५ मिनिटात कागदावर लिहून काढा.परत १५ मिनिटे शांत बसा,परत मनात येणारे सगळे विचार लिहून काढा.हा प्रयोग तुम्ही रोज करा आणि मनाच्या गतीवर नियंत्रण ठेवा.हा प्रयोग काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर करून पाहिला असता,त्यांपैकी ९८% विद्यार्थ्यांनी हा प्रयोग पुन्हा करायला आवडेल असे म्हंटले होते.मनाची गती कंट्रोलमध्ये आणण्याचा खूप चांगला प्रयोग आहे हा.

क्रिस्ता मैकग्रे ह्या लेखिकेला विमान प्रवासाची प्रचंड भीती वाटत होती.म्हणून तिने एक ब्लॉग लिहिला तो ब्लॉग लिहिताना तिच्या असे लक्षात आले की,ती पण तिच्या आज्जीसारखी बनण्याच्या मार्गावर होती.तिच्या आज्जीने पण विमान प्रवास टाळल्यामुळे अनेक गोष्टीना ती मुकली होती.तेव्हांपासून क्रिस्ता ने पण विमानप्रवासात भीती वाटणाऱ्या सगळ्या गोष्टींची यादी  केली.निरीक्षणाअंती तिने ह्या भीतीवर मात करायला शिकले होते.


३)मनावर प्रेम करा :

इतरांबद्दल जितके प्रेम आणि आदर दाखवण्याची तुमची इच्छा असते तितकेच प्रेम आणि आदर स्वतः बद्दल दाखवा.ज्यावेळी तुमच्या मनात चिंता,दुःख, ह्यासारखे विचार येतील त्यावेळी त्या नकारात्मक विचारांना मोकळे सोडून देण्यापेक्षा त्याच विचारांना जर तुम्ही कुरवाळून स्वतः वर प्रेम करून,स्वतः वर द्या दाखवून,कितीही चिंतेत,दुःखात असले तरीही तू हे करू शकतोस,तूच हे काम करू शकतो असे प्रेमाचे शब्द वापरले, तर मनाला स्वतः लाच स्वतः ची द्या येईल आणि तुमचे मन ते काम फत्ते करण्यास तयार होईल करून, दाखवेल.अगोदर स्वतः वर प्रेम करायला शिका, मग तुम्ही इतरांवर नक्की प्रेम कराल.

तुम्ही रोज स्वतः सोबत बोला,आणि स्वतः सोबत बोलून बाहेर पडलेले नकारात्मक विचार कागदावर लिहून काढा.तसेच सकारात्मक विचार पण लिहा.


मनाची ताकद वाढवण्यासाठी चे हे उपाय तुमच्या मनाला शक्ती देतील,ताकद देतील.मन काबूत राहील. तुमच्या  मनासाठी योग्य सारथी मिळेल.तुम्ही उपायांचा रोज सराव करायला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच १५ दिवसात फरक पडलेला जाणवेल.

माझा हा ब्लॉग कसा वाटला ते ब्लॉग खाली comments करून सांगा.तुमचे काही प्रश्न तर तेही comment box मध्ये लिहा त्याचे समर्थन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.Like,Comments,आणि Share पण करा.

ऑलिम्पिक संदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स नक्की जॉईन करा त्याची लिंक इथे खाली दिली आहे.

https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share


टिप्पण्या

  1. खूपच सुंदर शब्दांत उपाय सांगितले आहेत.....
    Thank you so much ma'am....🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय छान आहे. तुमच्या विचारांची खोली जबरदस्त.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Stop Religious Discrimination In Sports

अपयशातूनच यशाकडे झेप

तुमच्या मुलांच्या शारीरिक हालचाली वाढण्यासाठीचे जबरदस्त चार उपाय