आज आत्ता आणि आत्ताच..
"मी अवघ्या १५ वर्षांची असताना वडीलांची रवानगी व्यसनमुक्ती गृहात झाली,खूप दारू प्यायचे त्यांचा स्वतः वरच ताबा नसायचा.२६ डिसेंबर रोजी ,एका पाइन लाकडाच्या फळीवर "डोके"..."पाय"...असे शब्द लिहून वरती लाकडाची फळी ठोकण्यात आली होती आणि त्याची एक पेटी बनवण्यात आली होती. आणि त्या आम्ही बनवलेल्या लाकडाच्या पेटीत माझ्या आई चा मृतदेह ठेवला गेला होता. असंख्य अडचणी माझ्यासमोर होत्या मी वयाच्या १५ व्या वर्षीच बेघर झाले होते. मी तरुण असतानाच कुणीच माझ्या जवळ नव्हते.आई वारली तिला AIDS झाला होता आणि वडील व्यसनमुक्तीगृहात गेले. आई आजारी असताना मी तिच्या पायथ्याशी बसायचे,अगदी तिच्या जवळच पलंगावरच..मला ती तिची अनेक स्वप्ने सांगायची..मी शिवणकला शिकणार आहे...मला मोटारकर शिकायची आहे..घर कसे हवे...पैसा कसे कमावणार ते...माझ्याकडून तिच्या काय अपेक्षा होत्या.. ती अगदी सगळे सांगायची..मन मोकळे करायची....माझे लग्न ती कसे करणार ते...वगैरे..ती एक चांगलं आयुष्य कसे जगणार आहे..असे अनेक इमले ती स्वप्नात बांधत होती.मला तिच्या ह्या सगळ्या बोलण्यातून तिच्या शेवटच्या क्षणी जीवनात अनेक गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत आणि खूप काही जगायचे राहिले आहे,असे मला कुठे तरी वाटायचे. अनेक गोष्टी करायच्या बाकी राहिलेल्या आहेतआणि आता ह्या तिच्या शेवटच्या क्षणाला तिचे जगायचेच राहिले की काय ह्याची मला जाणीव व्हायची. आजारातून दुरुस्त झाली की,ह्या सगळ्या गोष्टी ती करणार आहे अशी जाणीव तिच्या प्रत्येक शब्दातून व्हायची . अनेक गोष्टी करायच्या राहून गेलेल्या आहेत तेही केवळ तिच्या "नंतर करेन " ह्या एकाच शब्दामुळे."
"Breaking Night"ह्या आत्मचरित्राची लेखिका Lizz Murray हिने तिच्या ह्या Biography मध्ये लिहिलेले आहे.अनेक सुप्रसिद्ध पुस्तकं तिने लिहिली आहेत,एक जागतिक दर्जाची Motivational speaker पण आहे.Lizz म्हणते की ,
"मला जाणीव व्हायची की, माझ्या आईच्या ह्या वयात इतक्या सारया गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत.मी जगण्यासाठी अन्नाची चोरी करून जगले. मग मी ठरवले की,माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी कधीच थांबणार नाही.आता माझ्याकडे थांबायला वेळ नाही आणि मी झपाटून उठले.मी आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत, टीव्ही मुव्ही काढल्या आहेत. तुमच्याकडे वेळ असू शकतो, पण माझ्याकडे वेळ नाही.माझ्याकडे जीवन खूपच कमी आहे.ह्या थोड्याश्या वेळेत मला खूप काही करायचे आहे.मला खुप काही हाशील करायचे आहे.आज नाही तर कधी नाही.काय ते मला आजच करायचे आहे.मला आजचे जीवन भरभरून जगायचे आहे."
मित्रांनो, आपण आजची किती कामे उद्यावर ढकलत असतो.जाऊ द्या !आज नाहीतर उद्या बघू.तो उद्या कधी येतो का आपल्या जीवनात ? कधीच नाही. कारण त्या उद्याचा कालावधी कधीच संपलेला असतो आणि आपल्या जीवनात कालचे महत्व कधीच संपलेले असते.उदा. मला सांगा तुम्ही दोन दिवसापूर्वी काय जेवण केले होते हे तुम्हाला आज आठवते का ? नक्कीच नाही.तो काळ आपल्या मनातून,विचारांतून,कृतीतून,बुद्धीतून कधीच संपलेला असतो,त्या उद्याच्या चालढकलूपणाचे आपण किती समर्थन करत असतो.ह्या चालढकलूपणाला कुठेतरी लगाम लागायलाच हवा.तुम्हाला जर असे वाटत असेल की,हा माझा चालढकलूपणा बंद व्हायला हवा ,तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार ,मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.
तुम्ही जर आजचे काम उद्यावर ढकलत असाल तर, नक्कीच तुम्ही चालढकलूपणा करत आहात हे लक्षात घ्या. ह्या चालढकलुपणामुळे तुमची कामे वेळेवर तर होतच नाहीत पण तुम्ही जगाच्या खूप मागे असता,हे लक्षात घ्या.तुम्हाला तुमची ध्येये साध्य करायची आहेत तर नक्कीच माझ्या ह्या गोष्टी उपयोगी पडतील.
१)ध्येयाला लास्ट डेट द्या :
तुम्हाला तुमच्या ध्येय सिद्धीची शेवटची तारीख ठरवायची आहे.त्या तारखेपर्यंत तुम्ही ते ध्येय पूर्ण करायला हवे,हा इशारा तुमच्या बुद्धीला,मनाला,आणि कृतीला वारंवार द्या.तुम्ही जेव्हा तुमच्या बुद्धीला त्या विशिष्ट तारखेपर्यंत अमुकतमुक करायचे आहे असे वारंवार सांगत असता, तेव्हा तुमची बुद्धी सगळ्या गोष्टी ग्रहण करत असते,नकार कधीच देत नाही.नकार येतो केवळ तुमच्या कृतीतूनच .म्हणूनच ध्येयाची लास्ट डेट कधीही विसरू नका.ती तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी भिंतीवर चिकटवा , जेणे करून तुमची दृष्टी सतत त्यावर पडेल.
डॉ.अमित समर्थ ह्यांनी ६००० km सायकलिंग करून आपल्या देशाच्या Golden Quadrilateral मार्गाला पार केले,ह्या त्यांच्या अभियानाला त्यांनी १४ दिवसांचाच वेळ दिला होता,म्हणजेच ६०००km सायकल ते केवळ १४ दिवसात चालवणार अशी विशिष्ट तारीख सुरुवात करायची आणि संपवायची अशी दिली होती.त्यांच्या ह्या ध्येयाला त्यांनी last date दिली होती.आणि त्या १४ दिवसातच ते करून दाखवले पण. तसेच ट्रेकर Alex Honald ह्याने अमेरिकेतील जगातील सगळ्यात अवघड चढण त्याने कोणत्याच वस्तूंशिवाय (दोरखंड,लाठ्या-काठ्या इ.) चढण चढली,ह्या अभियानाला त्याने एक last date दिली होती.Alex ने त्याच्या मुलाखतीत सांगितले की,माझ्यापुढे दोनच पर्याय होते,एकतर मी चढण चढणे किंवा मृत्यू ला कवटाळणे.आणि मी पहिला पर्याय चढण चढायचा पर्याय निवडला.
ह्या last date मुळेच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाता येईल.हीच last date तुमच्या मनाला खुणवत असते की,ऊठ..चल..,लाग कामाला..,३० दिवस राहिले..२० दिवस राहिले..वगैरे...वगैरे..
2)भूतकाळाच्या निशाण्या मिटवा :
आपल्यातील प्रत्येकाकडे सुखद तसेच दुःखद स्मृती असतात.आणि त्याच स्मृती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर हटवत असतात.फादर रिचर्ड रोहर म्हणतात की,"सर्वच अध्यात्मिक शिकवणुकी आपल्याला त्या त्या क्षणात राहण्यास शिकवत असतात,असे म्हंटले तर ते सुलभीकरण ठरणार नाही.पण यातील समस्या अशी आहे की,आपण जवळजवळ प्रत्येक वेळीच कुठेतरी दुसरीकडेच असतो,भूतकाळ पुन्हा जगत असतो किंवा भविष्याची चिंता करत असतो."
आपण नेहमीच भूतकाळातच जगत असतो,त्यामुळे भूतकाळातील अपयशाबद्दल आपण नेहमीच विव्हळत असतो.त्या विव्हळण्यामुळेच तुम्ही एक पाऊल मागे पडत असता,हे आधी ध्यानात घ्या. झालेल्या गोष्टींवर विव्हळत बसू नका.आणि सध्याचा आत्ताच्या क्षणावर विश्वास ठेवा.
३)क्षणाचा स्वीकार करा :
मी गेल्या आठ दिवसापूर्वी एका गायिकेचे गाणे ऐकले आणि तिला प्रतिक्रिया दिली की,तुम्ही काल जे गाणे म्हणले होते ते आजच्या पेक्षा छान गायले होते.मी अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे तिला राग आला,कारण मी आजच्या गाण्याला छान म्हणले नव्हते.तर कालच्या गाण्याला छान म्हणले होते.ह्याचा अर्थ असा की,आपल्या दृष्टीने गेलेल्या काळाच्या आठवणी आपल्याला बोचरया वाटतात, तरीही त्या हव्याच असतात.गेलेल्या क्षणाच्या मोहात आपण अडकलेलो असतो. म्हणूनच तर आपण गेलेल्या क्षणाचा नको तितका विचार करत बसतो मग त्यात काळजी,चिंता,आणि नको तितक्या आठवणी.
(उदा. मी ....वर प्रेम करत होते आणि मी त्याच्याशीच लग्न केले असते तर आज मी खूप सुखात असते,....ने माझ्याशी असा वागला म्हणून मी पण आज त्याला बोलणार नाही,त्याने माझा अपमान केला होता ,...ने मला अडचणीच्या वेळी मदत केली नव्हती,मग आज त्याला कशाला मदत मागू..वगैरे..वगैरे..) येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा मनमोकळ्या भावाने आपण कधीच स्वीकार करत नाही,कारण मानवी मन दर तिसरया सेकंदानंतर भूतकाळ आणि भविष्याचा विचार करत असते.
जेव्हा तुम्ही भूतकाळात आणि भविष्यातच रममाण होत असता, तेव्हा स्वतः ला खालील तीन प्रश्न विचारा की,"मी ह्या क्षणातली कोणती गोष्ट गमवत आहे ? आजच्या दिवसाची कोणती गोष्ट चांगली किंवा वाईट घडली ?आणि मला काय बदलण्याची गरज आहे ?हे तीन प्रश्न रोज स्वतः ला विचारा आणि स्वतः ला जास्तीत जास्त वर्तमानात ठेवण्याचा प्रयत्न करा."
४) आताच्या वेळेचा सदुपयोग:
तुम्ही आताची वेळ कशी वापरता ह्यावर तुमचे व्यक्तिमत्व ठरत असते.मी अनेकांना पाहिले आहे की,ध्यानासाठी मला वेळ नाही,व्यायामासाठी मला वेळ नाही,पुस्तके वाचण्यासाठी मला वेळ नाही,लिहिण्यासाठी मला वेळ नाही, असे म्हणणाऱ्या व्यक्ती तासंतास You tube,Instagram आणि नको तितक्या app वर, सोशल मीडिया वर वेळ वाया घालवत असतात,टेलिव्हिजन वर डोळे विस्फारून पाहत बसतात,किंवा मग फोनवर स्वतः ला गुंतवत असतात.तुम्हाला ठरवायचे आहे की,आताची वेळ मी कशासाठी वापरू ? तुम्हाला असे वाटते का की मी एखादी संधी गमावेन किंवा एखादी भीती वाटत असते का की माझ्याकडून ही माहिती घेणे राहून जाईल, ह्यासाठीच तुम्ही स्वतःला आत्ताच्या क्षणात अशा गोष्टींमध्ये अडकवत असता.
सगळ्यात सोपे म्हणजे आजच्या दिवसापेक्षा मी तुम्हाला सांगेन की,आताच्या क्षणांचे नियोजन करा आणि तो एक क्षण तुम्ही तुमच्या ध्येयासाठी कसा वापराल ह्याचा आराखडा बनवा.
माझ्या ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की सांगा.तुम्ही आता ह्या क्षणाला जर हा ब्लॉग वाचत असाल तर तुम्हाला ह्या क्षणाचे महत्व कळेल.तर एकही क्षण वाया घालवू नका.जे काही करायचे ते आज आता आणि आताच करायचे आहे कारण आज माझ्या उर्वरित आयुष्याचा अखेरचा दिवस आहे,तर चला लागा कामाला...
माझा हा ब्लॉग पूर्ण वाचलात ह्याबद्दल धन्यवाद.🙏 🙏 🙏
माझा हा ब्लॉग कसा वाटला ते ब्लॉग खाली comments करून सांगा.तुमचे काही प्रश्न तर तेही comment box मध्ये लिहा त्याचे समर्थन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.Like,Comments,आणि Share पण करा.🙏 🙏 🙏
ऑलिम्पिक संदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स नक्की जॉईन करा त्याची लिंक इथे खाली दिली आहे.
https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share






खूप छान ताई.
उत्तर द्याहटवाएकदम जबरदस्त. 🙏🙏
उत्तर द्याहटवाJabardast Maya mam 👍...keep it up
उत्तर द्याहटवाthank you so much sir
हटवाSuperb 👍👌
उत्तर द्याहटवाGreat start, love you Maya
उत्तर द्याहटवाLoveyoutoo
हटवाKhup chhan Maya Tai..
उत्तर द्याहटवाThanks dear swati
हटवाखूप छान लेख
उत्तर द्याहटवाThank you प्रज्ञा ताई
हटवाStart Now, yes action important
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏🙏😊😊
हटवा