सातत्याची जादू
ओम सूर्याय नमः
ओम भास्कराय नमः
ओम हिरण्यगर्भाय नमः
ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतिक सूर्यदेवता ह्यांना नमन करून असे मंत्र म्हणत सूर्यनमस्कार केला की,दिवसभर ऊर्जावाण वाटते. सातत्याचे सगळ्यात मोठे प्रतिक म्हणून आपण आकाशगंगेकडे पाहतो.आणि ह्या आकाशगंगेतील सूर्य हा ह्या निसर्गाची ताकद आहे.गेली ४००० अब्ज वर्षे झाली सूर्य आपल्याला न थकता सतत आणि सतत तेजस्वी ठेवत असतो आणि स्वतः पण सतत तेजस्वी राहतो.जे आपले पृथ्वी शी नाते आहे तेच तर सुर्याशी आहे. सूर्य - पृथ्वी आणि मानवामध्ये आई आणि मुलीसारखे नाते आहे . अमेरिकेतील Tree Circle Research Centre ह्या अंतर्गत डग्लस नावाचा शास्त्रज्ञ गेली ५० वर्षे झाली सूर्याच्या उर्जेवर अभ्यास करत आहे .तुम्ही झाडाच्या बुडातील गोल गोल वर्तुळे पाहिली असतीलच ना,ती का पडतात,निसर्गावर सूर्याच्या उर्जेचा काय परिणाम होतो,सूर्यात एवढी ऊर्जा का असते, ह्याबाबत तो अभ्यास करत आहे.त्याच्या ५० वर्षाच्या अभ्यासात त्याला असे आढळले की,सूर्य ही आपली माता,जननी आहे.सूर्याची मुलगी पृथ्वी,आणि पृथ्वीची मुले आपण आहोत म्हणजेच सूर्य पृथ्वी आणि मानवातले नाते हे एक आई आणि तिची मुले याप्रमाणे नाते असते.अर्थातच आपण सूर्याची मुले आहोत.सूर्य पृथ्वी आणि मानवातले जन्माजन्माचे नाते आहे.निसर्गातील प्रत्येक सजिवावर सूर्याच्या प्रकोपाचा परिणाम होत असतो. असे कधी झाले आहे का की, सूर्य आपल्यावर रागावला आणि आज उगवलाच नाही,अगदी सतत सूर्य आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतो,ऊर्जा देत असतो, शक्ती देत असतो,आणि तेही अगदी न थकता,सातत्याने.आपल्या मातेकडील सातत्याचा गुण आपण ग्रहण करायलाच हवा ना.
मग आपण का आपल्या कामात,आपल्या कर्तव्यात , आपल्या सरावात,आणि आपल्या ऑलिम्पिकच्या ध्येयाविषयी सातत्य टिकवून ठेऊ शकत नाही.तुम्ही ४ ते ५ महिने सराव करतात आणि नंतर तो सराव आपोआप बंद होतो,सातत्य राहत नाही,शेवटपर्यंत लढाई न जिंकताच अर्धवट सोडली जाते.तुमच्या कामातील किती कामे तुम्ही अर्धवट सोडलेली आहेत ह्याचे परीक्षण तुम्हीच स्वतः करा.प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष गुण असतो,परंतु त्या विशेष गुणामध्ये विकास होतच नाही,म्हणून तुम्ही मागे पडता.तुम्हाला जर तुमच्या सततच्या कामात,विशेष कामात,सरावात,सातत्य टिकवायचे असेल ,आणि ते सातत्य कसे टिकवायला हवे हे जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच.
नमस्कार,मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे.
तुम्हाला तुमच्या त्याच त्याच कामांमध्ये boringness आला असेल,सरावात तोचतोचपणा आला असेल, नक्कीच सातत्य कसे टिकवायला हवे हे कळतच नसेल तर नक्कीच माझ्या ह्या टिप्स तुमच्या खूप उपयोगी येतील, अशी मला खात्री आहे.,तर चला पाहूया.
१)नवीन कल्पनाशक्ती :
तुमच्या सकाळी झोपेतून उठ्ल्यापासुनच्या सवयीमध्ये कोणती गोष्ट नवीन आहे हे शोधून काढा. प्रत्येकाच्या दिनचर्येत सकाळची घाईच असते. सकाळच्या व्यायामात थोडेसे नाविन्य आणा ,कधी उठाबशा मारून पहा,तर कधी थोडेसे धावून पहा, तर कधी थोडी वेगळी योगासने करून पहा,तर कधी वजने उचलायची कसरत करू शकता,तुम्ही सकाळी ब्रश करताना टूथपेस्टचा आस्वाद घ्या, सकाळचा नाश्ता करताना टीव्ही,मोबईल ह्यांना दूर ठेवून नाश्त्याचा मनसोक्त आस्वाद घ्या,मग तुम्हाला रोजचा नाष्ता पण एकदम स्वादिष्ट वाटेल.आणि तुम्ही असे प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेत जगा,नवनवीन कल्पनाशक्तीला उजाळा द्या,तर बघा तुमचे जीवन किती सुंदर वाटायला लागेल तुम्हाला.
युक्लाकमधील एका कार्यालयातील काही लोकांवर एक प्रयोग करण्यात आला की, त्यांच्या जवळची अग्निशमन यंत्रणा कुठे आहे हे शोधून काढण्यास सांगण्यात आले,आश्चर्य म्हणजे त्यातील केवळ २४ %लोकांनाच ती यंत्रणा आठवत होती,म्हणजे की, ती अग्निशमन यंत्रणा त्या अंतरापासून काही हाकेच्या अंतरावरच होती आणि त्यातील जवळपास सर्वच जण त्या कार्यालयात अनेक वर्षांपासून काम करत होती.
हे उदा.सांगायचा उद्देश हाच की,आपण त्याच त्याच पणामुळे आपली बुद्धी बोथट होते,मेंदू त्या दृष्टीने विचारपूर्वक निर्णय घेत नाही,त्यासाठी मेंदूला सतत नवनवीन कल्पना,विचार ,हालचाली ह्याचे खतपाणी घालावे लागते.जेणेकरून तुमच्यात सातत्य टिकून राहील.
2)सातत्यातही नाविन्य आणा :
तुम्ही जर तुमच्या कामात सतत च्या त्याच त्याचपणामुळे कंटाळलात तर समजून घ्या की, तुम्हाला त्यात काहीतरी नवीन करण्याची गरज आहे.मी सकाळी ४ वाजता उठते पण माझे रोजचे नित्यक्रम मी वेगवेगळे करते.उठणे ४ वाजताच पण जर तुम्ही रोज सकाळी उठून walk च करत राहाल तर नक्कीच तुम्हाला खूप कंटाळवाणे वाटेल ते, त्यामुळे तुमच्यात सातत्य राहणार नाही. अगदी तुम्ही जर घरातील वस्तूंची हलवाहलव केली तर तुम्हाला तुमच्याच घरात नवीन काहीतरी केल्यासारखे वाटेल.त्या नाविन्यामुळे तुम्हाला तुमच्याच घरावर अजून जास्त प्रेम जडेल .
एखादी गोष्ट पाहणे आणि त्याकडे लक्ष देणे ह्या दोन्हीही गोष्टी भिन्न असतात. त्यामुळे डोळस राहून सततच्या कृतीत थोडेसे नाविन्य आणा.अशाप्रकारे तुम्ही तुमच्या सातत्यात नाविन्य आणू शकता.
३)सातत्याचा विश्वास :
मी काल पिठाच्या चक्कीत गेले होते,अगोदरचे धान्य संपलेले आहे हे त्या केवळ धान्याच्या कडकड आवाजावरुनच मी आता ओळखतो असे ते काका म्हणत होते.एवढेच नाहीतर धान्य किती आहे,धान्य कशा गुणवत्तेचे आहे,ह्याची पोळी लाटली तर त्याची चव कशी असेल हे मी केवळ धान्याकडे पाहूनच सांगू शकतो.म्हणजेच थोडक्यात ह्या सततच्या सरावामुळे त्या काकांनी त्यांच्या पिठाच्या चक्कीत भगीरथ हाशील केली होती.त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ह्या सगळ्या कृतीबद्दल विश्वास दिसत होता.ही सगळी सातत्याची कमाल आहे.एवढेच नव्हे तर त्या काकांनी ह्या सगळ्या पिठाण्बद्द्ल आता लिहायला पण सुरु केले आहे.दर महिन्याच्या मासिकात पिठाबद्दल त्यांचे लेख छापुन येत आहेत.
तुम्ही जी कृती सतत आणि सतत करता त्यामुळे त्या कृतीत तुम्हाला Perfection प्राप्त होते आणि विश्वास निर्माण होतो.
४)सातत्यामुळे विशेषत्व मिळते :
जागतिक दर्जाचा tennis खेळाडू (The best player)आंद्रे आगासीने त्याच्या आत्मचरित्रात एक जगाला हादरवून टाकणारा खुलासा केला की, मला tennis कधीच आवडत नव्हते माझ्या वडिलांनी मला खेळायला शिकवले आणि त्यांच्या सक्तीमुळे मी tennis खेळलो .आणि मी आता माझ्यासारख्या अनेक मुलांना घडवण्याचे काम करत आहे.हे केवळ सातत्यामुले मला विशेषत्व प्राप्त झाले आहे.तुम्ही जी गोष्ट तुमच्या मेंदूवर सतत बिंबवाल त्याच गोष्टींचा स्वीकार तुमचा मेंदू करत असतो,त्याला माहित नसते की,ते तुम्हाला आवडते की नाही.
अक्षय कुमार त्याच्या एका मुलाखतीत सांगतो की,माझ्या जीवनातील अजून असा एकही दिवस गेला नाही की, मी सकाळी सूर्याचे दर्शन घेतले नाही.सूर्यामुळे मला ऊर्जा,शक्ती,आरोग्य तर लाभतेच शिवाय सूर्याने मला रोज नाविन्याने जगण्याची कला शिकवली आहे, मला रोज सकाळी सूर्याचे दर्शन घ्यायची सवयच लागली आहे.
५)अग्नी ज्वलंत ठेवा :
तुम्ही रोज youtube व्हिडीओतून नवीन माहिती प्राप्त करू शकता.google द्वारे तुमच्या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी शिकू शकता.रोज नवनवीन रिसर्च करा आणि नवीन ज्ञानाची अनुभूती घ्या,माझा एक कर्मचारी त्याच्या बायकोने टीव्ही वरची फेसबुकची बेकरीची जाहिरात पाहून तिने जाहिरातीत दाखवतात अगदी तसे केक बनवायला शिकली. आज ती मोठमोठ्या केकच्या ऑर्डर घेते.ती केक बनवण्यात आता खूप expert बनली आहे.केक बनवायची मुळात तिला खूप आवड होती,ती बनवत पण होती पण त्यात नाविन्य येत नव्हते,आणि घर नवरा मुले ह्या सगळ्या मध्ये तिच्या जीवनाला नाविन्याच नव्हते.आता मी तिला पाहते तर, तिच्या चेहऱ्यावर आनंदाची खूण मला दिसते.ती आज स्वतः ला खूप भाग्यवान मानते की, फेसबुकने ही जाहिरात दिली.अशी आव्हाने तुम्हाला तुमच्यातील अग्नी ज्वलंत ठेवण्याचे काम करतात.अशा आव्हानांकडे आपण डोळसपणे पहायला हवे कोण जाणे कोणाचे कधी भविष्य बदलेल.
मी पण गेली एक वर्षे झाली ह्या सातत्याचा अनुभव घेत आहे.सातत्याने माझ्या ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत आहे. तर माझ्यात जबरदस्त आत्मविश्वास वाढला आहे. माझ्या ध्येयाच्या दिशेने मी रोज डोळसपणे वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत असते, जेणेकरून त्यात सतत नाविन्य राहील आणि काम करायला पण तोचतोचपणा राहणार नाही.माझ्या ह्या टिप्स वापरून तुम्ही पण तुमच्या सततच्या कामात,सरावात नाविन्य आणू शकता आणि सातत्याची जादू अनुभवू शकता.तुमच्या सातत्यानेच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचू शकाल.तुमचे सातत्यच तुमची खरी ताकद आहे,त्या सातत्यात नाविन्य आणून नाविन्याने कला जोपासण्याचा प्रयत्न करा आणि सातत्य टिकवा,सातत्याची जादू अनुभवा.
माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचलात ह्याबद्दल तुमचे धन्यवाद.🙏 🙏 🙏
माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच खाली comment box मध्ये comments करून सांगा.Like करा Comments करा आणि Share पण करा.🙏 🙏 🙏
ऑलिम्पिक खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स हा नक्की जॉईन करा.







Great mam
उत्तर द्याहटवाGreat blog. Maya madam
उत्तर द्याहटवाThanks swati ताई
हटवाखूप सुंदर लिहिलंय . तुमच्या कामातील सातत्य जबरदस्त
उत्तर द्याहटवा